Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन स्वस्त धान्य दुकानदार यांच्या जिवीतास धोका वाढला आहे त्यामुळे धान्य दुकानदारांच्या अंगठ्यावरच कार्डधारकांना धान्य देण्याची मुभा द्यावी तसेच कोरोनाने मयत झालेल्या दुकानदारांच्या वारसांना विमा देण्यात यावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांना  केली आहे                                    अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांना पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की  जिल्ह्यात कोरोना रुग्णंची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे जिल्ह्यातील १८०० दुकानदारांचा जिव टांगणीला लागला आहे दुकानात धान्य घेण्यास येणाऱ्या कार्डधारकांचा अंगठा हातात धरुनच तो पाँज मशिनवर ठेवावा लागतो एकदा अंगठा जुळला नाही तर अनेक वेळा तिच प्रक्रिया करावी लागते अशा वेळेस एखादी बाधीत व्यक्ती दुकानात आल्यास दुकानदारही बाधीत होवु शकतो तसेच त्या पुढील येणारा कार्डधारकही बाधीत होवु शकतो धान्य वाटप करताना मास्क सँनिटायझर सोशल डिस्टन्सींगचा वापर केला तरी कार्डधाराकांचा पाँज मशिनशी सरळ सरळ संपर्क येत असल्यामुळे दुकानदार बांधीत होण्याची दाट शक्यता आहे तसेच कोरोना पसरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कोरोनावर जो पर्यंत नियंत्रण येत नाही तो पर्यंत धान्य दुकानदारांना त्यांच्या अंगठ्यावरच धान्य देण्याची मुभा द्यावी जेणे करुन कोरोनाचा प्रसार होणार नाही व धान्य दुकानदारांच्या जिवीतासही धोका पोहोचणार नाही तसेच कोरोना काळात आपला जिव धोक्यात घालुन धान्य वाटप करताना मयत झालेल्या दुकानदारांच्या कुटुंबीयाना विमा संरक्षण देण्यात यावे तसेच यापुढील काळात जर कोरोनाने एखादा दुकानदार दगावला तर त्यांच्या  कुटुंबीयांना विमा संरक्षण देण्यात यावे शासनाने ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरीकांना कोवीड लस देण्याचा निर्णय घेतला असला तरी आमचे बरेचसे धान्य दुकानदार ४५ वर्ष वयाच्या आतील असल्यामुळे त्यांना तसेच मदतनीसालाही  प्राधान्याने  कोवीड लस देण्यात यावी असेही देविदास देसाई यांनी निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति  मा जिल्हाधिकारी मा जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठविलेल्या आहेत या निवेदनावर देसाई यांच्यासह सचिव रज्जाक पठाण सुरेश उभेदळ मिनाताई कळकुंबे  बाबा कराड बाळासाहेब दिघे शिवाजीराव मोहीते विश्वासराव जाधव गजानन खाडे बजरंग दरंदले चंद्रकांत झुरंगे भाऊसाहेब वाघमारे विजयराव गायकवाड सुखदेव खताळ गणेश ऐलम रावसाहेब भगत सुरेश कोकाटे गोपीनाथ शिंदे गणपत भांगरे कैलास बोरावके रविंद्र बागुल ज्ञानदेव वहाडणे  आदिंच्या सह्या आहेत.

श्रीरामपूर- तालुक्यातील निपाणी वडगाव लाटे वस्तीजवळ शिरसगाव पाटाच्याकडेला वळदगाव हद्दीतील सरकारी विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.याबाबत पोलीस पाटील संदीप हरिदास वेताळ यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी खबर दिली आहे. त्यावरून आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दत्तात्रय दिघे, पोलीस कॉन्स्टेबल किरण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी सदर व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचा आढळून आले. दोरीच्या साह्याने सदर मृतदेह वरती काढून याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती विचारली आहे.सदर इसमाचे अंदाजे 40 ते 45 वर्ष वय असून सदर इसमाच्या अंगामध्ये पांढरा रंगाचा शर्ट परिधान केला आहे.

तसेच अंगामध्ये लाल रंगाची अंडरवेअर असून व डाव्या पायामध्ये काळा करदोरा आढळून आला आहे. तसेच गळ्यामध्ये लाल रंगाचा रूमाल बांधलेला होता व खिशामध्ये दोन पान्हे सापडले आहेत. तसेच बाजूला पिवळ्या रंगाची टोपी व चप्पल जोड दिसत आहे.तरी सदर इसमास कोणी ओळखत असल्यास तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा 02422222666. तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री समाधान सुरवाडे   ९९७५४१०२५९ तसेच पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील पोलीस नाईक दत्तात्रय दिघे पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव किरण पवार यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.



श्रीरामपूर-प्रतिनिधी-
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ती चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही साखळी तोडण्यासाठी सध्या विकेंड लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र त्यास श्रीरामपूर शहर व तालुक्यात पोलीस व महसूलची अधिकारी कर्मचारी नसताना हा विकेंड लॉकडाऊन 100 टक्के यशस्वी केला. काल मेडिकल व रुग्णालये सुरु होती. अन्य दुकाने पूर्णपणे बंद होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुुकाट दिसून आला. हीच स्थिती नगर शहरासह संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासा आदी शहरातही होती. स्वत: नागरिकांनीच लॉकडाऊनसाठी पुढाकार घेतल्याने रस्ते ओस पडले होते. मात्र त्यासोबत यंत्रणेवरचा ताणही काहीसा कमी होता. त्यामुळे विकेंड लॉकडाऊन एकप्रकारे ‘जनता लॉकडाऊन’ ठरला.मागल वर्षी जो लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यावेळी चौकाचौकात 10-10 पोलीस तसेच महसूलचे अधिकारी व कर्मचारी शहरात फिरुन लॉकडाऊनचे पालन करत होते. त्यावेळी पोलिसांनी अनेकांना मारले, कोणाच्या गाडीच्या काचा फोडल्या व्यावसायिकांना त्रास दिला. त्यामुळे मागील लॉकडाऊन हा व्यावसायिकांचा व नागरिकांना त्रासदायकच गेला होता.मात्र विकेंड लॉकडाऊन म्हणजे शुक्रवारी सायंकाळी 8 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे काल सकाळपासूनच रस्त्यावर कोणताही पोलीस विभागाचा किंवा महसूल विभागाचा अधिकारी व कर्मचारी फिरण्याची वेळ लोकांनी येवू दिली नाही. लोकांनी स्वतःहून काल आपली दुकाने बंद ठेवून घरातच राहण्याचा विचार केल्यामुळे संपूर्ण शहर बंद राहून रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला होता.

श्रीरामपूर -प्रतिनिधी -माळवाडगावसह परिसरातील गावांच्या शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे देणे बुडवून कुटुंबियासह पसार झालेल्या मुथ्था प्रकरणातील सर्व आरोपींना जेरबंद करण्यात श्रीरामपूर तालुका पोलिसांना यश आले असून आरोपींची प्रॉपर्टी पतसंस्था, बँकांकडे तारण असली तरी आम्ही केआरपीसी अधिकार वापरून 160 ची नोटीस पाठवून शेतकर्‍यांना अगोदर प्राधान्याने पैसे कसे मिळतील यासाठी कोर्टापुढे शेतकर्‍यांचे बाजूने भरभक्कम पुरावे सादर करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.शेतकरी फसवणूक मुथ्था प्रकरणातील सर्व आरोपी जेरबंद केल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गुन्ह्यांची माहिती देताना संदीप मिटले म्हणाले की 9 फेब्रुवारी 2021 रोजी विजय सिताराम आसने यांनी फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी गु.र.नं.21/2021 भा.द.वि.क.420,406 464,471,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.गावात गेल्या 20 वर्षांपासून राहत असलेल्या व्यापारी रमेश रामलाल मुथ्था, चंदन रमेश मुथ्था, गणेश रामलाल मुथ्था, आशा गणेश मुथ्था, चांदनी चंदन मुथ्था या सर्वांनी भुसार माल सोयाबीन हरभरा,मका खरेदी करताना बाजार भावापेक्षा जादा भाव देण्याचे आमिष दाखवून 100 ते 200 शेतकर्‍यांना वायदा करून माल विक्रिच्या वहीत नोंद करत चिठ्ठ्या दिल्या काहींना एचडीएफसी, बँक ऑफ महाराष्ट्रचे रक्कम शिल्लक खोटे चेक दिले, दोन कोटी रुपयांची फसवणूक करून 6 फेब्रुवारी 2021 रोजी कुटुंबियांसह पसार झाले होते.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस पथके तयार करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार नव्याने पदभार स्विकारलेल्या पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, हे.का.नवनाथ बर्डे,हे.का राजेंद्र लवांडे,पो.का अशोक पवार, पो.का.प्रशांत रणवरे,पो.का.दादासाहेब लोंढे,हे.का सतीश गोरे, श्रीकांत वाबळे, काकासाहेब मोरे, अनिल शेंगाळे, महिला पोलीस बबिता खडसे,वंदना पवार, प्रियंका शिरसाठ ,असे पथके तयार करण्यात येऊन आरोपींचा गुजरात सह ठाणे,जळगाव, धुळे, आदी ठिकाणी शोध घेत अखेरचे आरोपी जालन्यात जेरबंद करून काम फत्ते केले.यातील रमेश मुथ्था, चंदन मुथ्था व गणेश मुथ्था यांना 15 एप्रिल प्रथमतः पोलीस कोठडी तर आशा मुथ्था व चांदनी मुथ्था यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या शोधमोहिमेत टेक्निकल एक्स्पर्ट, सायबर एक्सपर्टची मोलाची मदत मिळाली.गुन्ह्यातील रकमेची व्याप्ती वाढणार असून आरोपीकडून मालमत्तेची जास्तीत जास्त रिकव्हरी करण्यात येणार आहे.

श्रीरामपूर करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने कालपासून रात्री उशिरा लॉकडाऊन जाहीर केले होते. परंतु काय सुरु आणि काय बंद.याबाबत संभ्रमात असणार्‍या व्यापार्‍यांनी काल पोलीस स्टेशन गाठत तेथे असलेल्या प्रांताधिकार्‍यांची भेट घेतली. व्यापार्‍यांनी आपल्या व्यथा मांडल्या.त्यावेळी प्रांताधिकार्‍यांनी आजपासून शहरात कडक अंमलबजावणी करणार असल्याचे व्यापार्‍यांना सांगितले. काल तहसीलदारांनी पंजाबी कॉलनी, मोरगे वस्ती कानिफनाथ रोड व सरस्वती कॉलनी या तीन ठिकाणी कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर केले.जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी काल रात्री जिल्हाभर जिल्हाभर अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर श्रीरामपुरात त्याची अंमलबजावणी सुरू झाली. काल मंगळवारी सकाळपासून मेडिकल, किराणा दुकान,भाजीपाला, दूध, बेकरी, दवाखाने वगळता इतर दुकाने बद होती. श्रीरामपूर शहरातील मेनरोड, शिवाजी रोड, नेवासा रोड,
संगमनेर रोड, या सर्व स्त्वावरील अत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने वगळता सर्व छोटे मोठे व्यवसाय बंद होते. हातगाड्या, पानटपर्‍या, सलून, कापड दुकाने, वाईन शॉप, परमिट रुम, शूज दुकाने, यासह इतर छोटे मोठे सर्व दुकाने बंद होती. 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. अत्यावश्यक सेवेची दुकानेही सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
25 दिवस लॉकडाऊन म्हणजे छोटे मोठे लहान व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले असल्याने सर्व व्यापार्‍यांनी या लॉकडाऊनबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उगाचच कारवाई नको म्हणून अनेकांनी आपली दुकान स्वतः बंद ठेवली होती. शहरात नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. मात्र बेलापूर रोड पुलावर तसेच चौका चौकात गर्दीच दिसून येत होती. भाजीपाला खरेदीसाठीही गर्दी होती. प्रशासनाने काही ठिकाणी दुकाने सील करण्याची कारवाई केली. मात्र नॉदर्न ब्रॅच भागात काही दुकाने सुरु होती. रेल्वेच्या पलीकडे आणि अलिकडे असे भेदभाव केला जात आहे. नेहमीच पालिकेचे कर्मचारी अधिकारी तसेच पोलीस प्रशासन रेल्वेच्या अलिकडच्या बाजार पेठेतील व्यापार्‍यांवर अन्याय करत आले आहेत. याबाबत प्रांताधिकारी म्हणाले, आजपासून शहरातील सर्वच भागात कडक निर्बंध लावले जाणार असून हे नियमांची अंमलबजावणी करण्यात येवून कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रांताधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.काल प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी शहरात फिरून परिस्थितीची पाहणी केली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर जी दुकाने सुरू होती, अशा दुकानांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. पाचपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आल्याने तहसीलदार प्रशांत पाटील यांनी श्रीरामपूर शहरातील पंजाबी कॉलनी, सरस्वती कॉलनी, मोरगे वस्ती (कानिफनाथ रोड परिसर) अशी तीन ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली आहे. या ठिकाणांची पालिकेच्या अधिकार्‍यांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार यांनी दिले आहेत.


बेलापुर (प्रतिनिधी  )- कोरोनाच वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचा आदेश असताना बेलापुरात अचानक रविवारचा भरलेला  आठवडे बाजार सरपंच  महेंद्र साळवी रमेश अमोलीक हवालदार अतुल लोटके यांनी बंद पाडला                                             

 कोरोना नियमावली बाबत उद्या कोरोना कमीटीची बैठक घेण्यात येणार असुन त्या बैठकीत कोरोनावर उपाय योजनेचा निर्णय घेण्यात येणार आहे आठवडे बंदचा निर्णय मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिलेला असल्यामुळे तो पाळणे आपणास बंधनकारक आहे असे अवाहन सरपंच महेंद्र साळवी यांनी केले  बेलापुरला रविवारचा आठवडे बाजार भरतो मा जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यामुळे बेलापुर ग्रामपंचायतीने गाव व परिसरात दवंडी देवुन तसेच व्हाँटस्अप द्वारे गावात फलक लिहुन सर्व व्यवसायीकांना  बाजार बंद असल्याबद्दल सुचना दिली होती असे असतानाही व्यापारी व भाजीपाला विक्रेत्यांनी आपली  दुकाने अचानक कोल्हार चौकात थाटली त्यामुळे त्या चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगुन देखील भाजीपाला विक्रेते व्यापारी उठण्यास तयार नव्हते अखेर सरपंच  महेंद्र साळवी यांनी बेलापुर  पोलीस स्टेशनला फोन करुन हवालदार अतुल लोटके यांना बोलावुन घेतले पोलीस सरपंच पत्रकार ग्रामपंचायत  सदस्य यांनी झालेली गर्दी कमी करुन व्यापाऱ्याची समजुत काढली त्या वेळी काही शेतकरीही आपला माल विकण्यास घेवुन आलेले होते त्यांनी आम्हाला ठराविक वेळ ठरवुन द्या  आमचा माल लगेच खराब होणारा आहे तसेच इतर गावातही आम्हाला दोन तास माल विकण्यास परवानगी देतात त्यामुळे गावातही तशीच परवानगी द्यावी अशी मागणी केली.

श्रीरामपूर शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा हीशहरातील समस्त नागरिकांची आग्रहाची मागणी आहे.या मागणीसाठी श्रीरामपूर शहरातील मुस्लीम समजाचा कधीही विरोध नव्हता व नाही.आम्ही शिवाजी चौकातच महाराजांचा आश्वारुढ पुतळा उभारावा यासाठी आग्रही आहोत.तरी आपणास विनंती की,छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा शिवाजी

चौकाशिवाय अन्यत्र कोठेही बसविण्यात येवू नये त्यास आमचा व मुस्लिम समाजाचा तिव्र विरोध आहे याची नोंद घ्यावी.पुतळ्याची जागा बदलण्याच्या प्रस्तावास अगर पुतळा अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न झाल्यास आम्हास नाईलाजाने लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन वगैरे करावे लागेल व मग त्याचे होणाऱ्या परिबणामची जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी.असे अवाहन समस्त मुस्लिम समाजातील बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget