श्रीरामपूर- तालुक्यातील निपाणी वडगाव लाटे वस्तीजवळ शिरसगाव पाटाच्याकडेला वळदगाव हद्दीतील सरकारी विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.याबाबत पोलीस पाटील संदीप हरिदास वेताळ यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी खबर दिली आहे. त्यावरून आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दत्तात्रय दिघे, पोलीस कॉन्स्टेबल किरण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी सदर व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचा आढळून आले. दोरीच्या साह्याने सदर मृतदेह वरती काढून याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती विचारली आहे.सदर इसमाचे अंदाजे 40 ते 45 वर्ष वय असून सदर इसमाच्या अंगामध्ये पांढरा रंगाचा शर्ट परिधान केला आहे.
तसेच अंगामध्ये लाल रंगाची अंडरवेअर असून व डाव्या पायामध्ये काळा करदोरा आढळून आला आहे. तसेच गळ्यामध्ये लाल रंगाचा रूमाल बांधलेला होता व खिशामध्ये दोन पान्हे सापडले आहेत. तसेच बाजूला पिवळ्या रंगाची टोपी व चप्पल जोड दिसत आहे.तरी सदर इसमास कोणी ओळखत असल्यास तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा 02422222666. तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री समाधान सुरवाडे ९९७५४१०२५९ तसेच पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील पोलीस नाईक दत्तात्रय दिघे पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव किरण पवार यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.
Post a Comment