बेलापुर (प्रतिनिधी )-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन स्वस्त धान्य दुकानदार यांच्या जिवीतास धोका वाढला आहे त्यामुळे धान्य दुकानदारांच्या अंगठ्यावरच कार्डधारकांना धान्य देण्याची मुभा द्यावी तसेच कोरोनाने मयत झालेल्या दुकानदारांच्या वारसांना विमा देण्यात यावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांना केली आहे अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांना पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की जिल्ह्यात कोरोना रुग्णंची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे जिल्ह्यातील १८०० दुकानदारांचा जिव टांगणीला लागला आहे दुकानात धान्य घेण्यास येणाऱ्या कार्डधारकांचा अंगठा हातात धरुनच तो पाँज मशिनवर ठेवावा लागतो एकदा अंगठा जुळला नाही तर अनेक वेळा तिच प्रक्रिया करावी लागते अशा वेळेस एखादी बाधीत व्यक्ती दुकानात आल्यास दुकानदारही बाधीत होवु शकतो तसेच त्या पुढील येणारा कार्डधारकही बाधीत होवु शकतो धान्य वाटप करताना मास्क सँनिटायझर सोशल डिस्टन्सींगचा वापर केला तरी कार्डधाराकांचा पाँज मशिनशी सरळ सरळ संपर्क येत असल्यामुळे दुकानदार बांधीत होण्याची दाट शक्यता आहे तसेच कोरोना पसरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कोरोनावर जो पर्यंत नियंत्रण येत नाही तो पर्यंत धान्य दुकानदारांना त्यांच्या अंगठ्यावरच धान्य देण्याची मुभा द्यावी जेणे करुन कोरोनाचा प्रसार होणार नाही व धान्य दुकानदारांच्या जिवीतासही धोका पोहोचणार नाही तसेच कोरोना काळात आपला जिव धोक्यात घालुन धान्य वाटप करताना मयत झालेल्या दुकानदारांच्या कुटुंबीयाना विमा संरक्षण देण्यात यावे तसेच यापुढील काळात जर कोरोनाने एखादा दुकानदार दगावला तर त्यांच्या कुटुंबीयांना विमा संरक्षण देण्यात यावे शासनाने ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरीकांना कोवीड लस देण्याचा निर्णय घेतला असला तरी आमचे बरेचसे धान्य दुकानदार ४५ वर्ष वयाच्या आतील असल्यामुळे त्यांना तसेच मदतनीसालाही प्राधान्याने कोवीड लस देण्यात यावी असेही देविदास देसाई यांनी निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति मा जिल्हाधिकारी मा जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठविलेल्या आहेत या निवेदनावर देसाई यांच्यासह सचिव रज्जाक पठाण सुरेश उभेदळ मिनाताई कळकुंबे बाबा कराड बाळासाहेब दिघे शिवाजीराव मोहीते विश्वासराव जाधव गजानन खाडे बजरंग दरंदले चंद्रकांत झुरंगे भाऊसाहेब वाघमारे विजयराव गायकवाड सुखदेव खताळ गणेश ऐलम रावसाहेब भगत सुरेश कोकाटे गोपीनाथ शिंदे गणपत भांगरे कैलास बोरावके रविंद्र बागुल ज्ञानदेव वहाडणे आदिंच्या सह्या आहेत.
Post a Comment