श्रीरामपूर-प्रतिनिधी-करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ती चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही साखळी तोडण्यासाठी सध्या विकेंड लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र त्यास श्रीरामपूर शहर व तालुक्यात पोलीस व महसूलची अधिकारी कर्मचारी नसताना हा विकेंड लॉकडाऊन 100 टक्के यशस्वी केला. काल मेडिकल व रुग्णालये सुरु होती. अन्य दुकाने पूर्णपणे बंद होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुुकाट दिसून आला. हीच स्थिती नगर शहरासह संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासा आदी शहरातही होती. स्वत: नागरिकांनीच लॉकडाऊनसाठी पुढाकार घेतल्याने रस्ते ओस पडले होते. मात्र त्यासोबत यंत्रणेवरचा ताणही काहीसा कमी होता. त्यामुळे विकेंड लॉकडाऊन एकप्रकारे ‘जनता लॉकडाऊन’ ठरला.मागल वर्षी जो लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यावेळी चौकाचौकात 10-10 पोलीस तसेच महसूलचे अधिकारी व कर्मचारी शहरात फिरुन लॉकडाऊनचे पालन करत होते. त्यावेळी पोलिसांनी अनेकांना मारले, कोणाच्या गाडीच्या काचा फोडल्या व्यावसायिकांना त्रास दिला. त्यामुळे मागील लॉकडाऊन हा व्यावसायिकांचा व नागरिकांना त्रासदायकच गेला होता.मात्र विकेंड लॉकडाऊन म्हणजे शुक्रवारी सायंकाळी 8 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे काल सकाळपासूनच रस्त्यावर कोणताही पोलीस विभागाचा किंवा महसूल विभागाचा अधिकारी व कर्मचारी फिरण्याची वेळ लोकांनी येवू दिली नाही. लोकांनी स्वतःहून काल आपली दुकाने बंद ठेवून घरातच राहण्याचा विचार केल्यामुळे संपूर्ण शहर बंद राहून रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला होता.
Post a Comment