श्रीरामपूर - करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने कालपासून रात्री उशिरा लॉकडाऊन जाहीर केले होते. परंतु काय सुरु आणि काय बंद.याबाबत संभ्रमात असणार्या व्यापार्यांनी काल पोलीस स्टेशन गाठत तेथे असलेल्या प्रांताधिकार्यांची भेट घेतली. व्यापार्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.त्यावेळी प्रांताधिकार्यांनी आजपासून शहरात कडक अंमलबजावणी करणार असल्याचे व्यापार्यांना सांगितले. काल तहसीलदारांनी पंजाबी कॉलनी, मोरगे वस्ती कानिफनाथ रोड व सरस्वती कॉलनी या तीन ठिकाणी कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर केले.जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी काल रात्री जिल्हाभर जिल्हाभर अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर श्रीरामपुरात त्याची अंमलबजावणी सुरू झाली. काल मंगळवारी सकाळपासून मेडिकल, किराणा दुकान,भाजीपाला, दूध, बेकरी, दवाखाने वगळता इतर दुकाने बद होती. श्रीरामपूर शहरातील मेनरोड, शिवाजी रोड, नेवासा रोड, संगमनेर रोड, या सर्व स्त्वावरील अत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने वगळता सर्व छोटे मोठे व्यवसाय बंद होते. हातगाड्या, पानटपर्या, सलून, कापड दुकाने, वाईन शॉप, परमिट रुम, शूज दुकाने, यासह इतर छोटे मोठे सर्व दुकाने बंद होती. 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. अत्यावश्यक सेवेची दुकानेही सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.25 दिवस लॉकडाऊन म्हणजे छोटे मोठे लहान व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले असल्याने सर्व व्यापार्यांनी या लॉकडाऊनबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उगाचच कारवाई नको म्हणून अनेकांनी आपली दुकान स्वतः बंद ठेवली होती. शहरात नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. मात्र बेलापूर रोड पुलावर तसेच चौका चौकात गर्दीच दिसून येत होती. भाजीपाला खरेदीसाठीही गर्दी होती. प्रशासनाने काही ठिकाणी दुकाने सील करण्याची कारवाई केली. मात्र नॉदर्न ब्रॅच भागात काही दुकाने सुरु होती. रेल्वेच्या पलीकडे आणि अलिकडे असे भेदभाव केला जात आहे. नेहमीच पालिकेचे कर्मचारी अधिकारी तसेच पोलीस प्रशासन रेल्वेच्या अलिकडच्या बाजार पेठेतील व्यापार्यांवर अन्याय करत आले आहेत. याबाबत प्रांताधिकारी म्हणाले, आजपासून शहरातील सर्वच भागात कडक निर्बंध लावले जाणार असून हे नियमांची अंमलबजावणी करण्यात येवून कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रांताधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.काल प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी शहरात फिरून परिस्थितीची पाहणी केली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर जी दुकाने सुरू होती, अशा दुकानांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. पाचपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आल्याने तहसीलदार प्रशांत पाटील यांनी श्रीरामपूर शहरातील पंजाबी कॉलनी, सरस्वती कॉलनी, मोरगे वस्ती (कानिफनाथ रोड परिसर) अशी तीन ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली आहे. या ठिकाणांची पालिकेच्या अधिकार्यांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार यांनी दिले आहेत.
Post a Comment