Latest Post

श्रीरामपूर /प्रतिनिधी-वॉर्ड नं-2 मधील नई दिल्ली परीसर, जैनब नगर परिसर व अत्तरी मस्जिद परिसर या भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या कॅनॉल वरील पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, या करिता भागातील युवक कार्यकर्ते अल्प संख्याक काँग्रेसचे जिल्हा समन्वयक जफर शाह यांनी आ.लहुजी कानडे यांचे कडेस निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा करून सदर प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले,याकामी परीसरातील नागरीकांनी वेळोवेळी निवेदने देऊन या प्रश्नावर लक्ष वेधले होते आ.कानडे साहेबांनी आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत तात्काळ सदर पुलास मंजुरी देऊन लवकरच काम सुरू होईल याबाबत खात्री दिल्याने भागातील सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.सदर पुलासाठी भागातील सामाजिक कार्येकर्ते जाफर शाह यांनी अनेक वेळा पाठपुरावा केल्यामुळे पुलास मंजुरी मिळाली आहे, असे अनेक कामे जे लोकप्रतिनिधी मार्फत होत नाही त्या कामास तडीस नेण्याचे कार्य जाफर शाह यांनी केले असे भागातील जनतेत बोललं जातंय. याचीच पोच पावती म्हणून पक्षाने या भागातून जाफर शाह यांना नगरसेवक पदाची उमेदवारी द्यावी असेही लोकांची मागणी आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-राज्यभर गाजलेले बेलापुरचे व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण व खुनाचा तपास लावण्यात पोलीसांना यश आले असुन केवळ सी सी टी व्ही च्या अधारे पोलीसांना आरोपी पकडण्यास मदत झाली त्यामुळे गावातील सी सी टी व्हीची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल असे अश्वासन उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिले.बेलापुर येथील व्यापारी हिरण यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली त्या गुन्ह्याचा तपास करुन आरोपींना अटक केल्याबद्दल बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने एल सी बी व बेलापुर पोलीसांचा सन्मान करण्यात आला त्या वेळी बोलताना उपसरपंच खंडागळे म्हणाले की   गुन्हा अन्वेषण विभागाची टिम तसेच श्रीरामपुरातील सर्व पोलीस यंत्रणा या तपास कामी दहा बारा दिवस डोळ्यात तेल घालुन तपास करत होते अखेर सी सी टी व्ही फुटेजच्या अधारे आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले त्यामुळे गावातील सर्व नादुरुस्त कँमेरे तातडीने दुरुस्त करण्यात येतील तसेच आवश्यक त्या ठिकाणी आणखी  कँमेरे बसवुन ते सुस्थितीत राहतील याची दक्षता घेतली जाईल या वेळी बोलताना पत्रकार देविदास  देसाई म्हणाले की व्यापाऱ्याच्या अपहरणा नंतर सर्व गावाने एकजुट दाखविली हा प्रश्न विधानसभेत गाजला त्यामुळे गुन्ह्याची उकल करणे पोलीसापुढे मोठे अव्हानच होते परंतु राज्यात अव्वल असणार्या एल सी बी टिमने व तालुक्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय कठोर मेहनत घेतल्यामुळेच खरे आरोपी जेरबंद झाले पोलीसांनी केलेल्या कामगीरीबद्दल बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे हे आपले कर्तव्य  आहे या वेळी मोहसीन सय्यद यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी एल सी बी चे मनोज गोसावी बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल निखील तमनर हरिष पानसंबळ पोपट भोईटे आदिंचा ग्रामस्थांच्या वातीने सत्कार करण्यात आला या वेळी रफीक शेख ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक  मुस्ताक शेख तहसील कार्यालयातील शिवाजी वायदंडे लहानु नागले  महेश कुर्हे  पत्रकार  दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम  तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे सागर साळवे राज गुडे आदि उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी )-बाहेरगावहुन व्यवसाय करण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर एका ईसमाने चाकुसारख्या धारदार हत्याराने हल्ला केला आहे तो व्यापारी जखमी झाला असुन प्रचंड दहशतीखाली वावरत आहे                 

 या बाबत समजलेली माहीती अशी की बेलापुर येथे व्यवसाय करण्यासाठी बाहेरगावहून रामेश्वर पालीवाल हे बेलापुर येथे आले भाडोत्री खोली घेवुन त्याने आपला व्यवसाय सुरु केला असताना दोन दिवसापुर्वी  बाहेरगावच्या एका व्यक्तीने पालीवाल यांना मारहाण केली त्या नंतर दुसर्या दिवशी पुन्हा त्याच व्यक्तीने पालीवाल यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला त्यात पालीवाल यांना दोन तीन ठिकाणी जखमा झालेल्या आहे या हल्ल्यामुळे पालीवाल हे प्रचंड मानसिक तणावाखाली आहे या हल्ल्यामागे नेमके कारण काय असावे या बाबत वेगवेगळी चर्चा चालू आहे.

श्रीरामपुर( प्रतिनिधी रईस शेख )श्रीरामपुरात हानिफ भाई पठान यांच्या संपर्क कार्यलवर भारतीय लहुजी सेना या संघटनेच्या श्रीरामपुर   शहर उप अध्यक्ष निवड करण्यात आली आहे.कमरान तांबोळी  गेल्याकाही वर्षा पासून संघटनात कामं करत आहे . त्यांचा कामगिरी बघुन  मा बाळासाहेब बागुल राष्ट्रीय अध्यक्ष, मा हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव,

मा रज्जाक भाई शेख नगर जिल्हा अध्यक्ष, शेख अहमद नसीर राज्य संपर्क प्रमुख,  यांच्या  आदेशानुसार यांना भारतीय लहुजी सेना श्रीरामपुर शहर उपअध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे 

 सदर नियुक्ती पत्र द्याला बाळासाहेब बागुल राष्ट्रीय अध्यक्ष, हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव, रज्जाक भाई शेख नगर जिल्हा अध्यक्ष, शेख अहमद नसीर राज्य संपर्क प्रमुख, रईस शेख युवा प्रसिद्धी प्रमुख,  अमीत कुकरेजा, रमेज पोपटी, आदी कार्यकरते उपस्थित होते.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील जे टी एस हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री बबनराव लक्ष्मण  गाडे सर यांचे चिरंजीव   सुधीर गाडे यांनी देहदान केल्यामुळे त्यांच्या मृत्यू पश्चात त्याचा मृतदेह प्रवरा नगर येथील मेडीकल ट्रस्टला देण्यात आला.  बेलापुर  येथील सेवानिवृत्त शिक्षक बबनराव गाडे सर यांचा  मुलगा  सुधीर याचे काल अल्पशा आजाराने निधन झाले जैन संघटनेच्या वतीने राबविण्यात येणार्या देहदान संकल्पात बबनराव गाडे सर व सुधीर गाडे यांनी देहदान करण्याचा संकल्प केला होता काल  बबनराव गाडे सर यांचा मुलगा सुधीर याचे निधन झाले देहदानाचा संकल्प केल्यानंतरही जर नातेवाईकांची ईच्छा असेल तर ते मृतदेहाचा अंत्यसंस्कार करु शकतात मुलाने देह दानाचा संकल्प केल्यामुळे आपण तो देह प्रवरा नगर येथील मेडीकल ट्रस्टला देणार असल्याचे बबनराव गाडे यांनी जैन संघटनेचे गौतम साबडा व प्रविण राका यांना तसेच जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई  अशोक पवार पोलीस पाटील अशोक प्रधान यांना कळविले त्या प्रमाणे प्रवरा मेडीकल ट्रस्टचे डाँ .जे ऐ पटेल संदीप ठोंबरे दादासाहेब दुंशिग हे बेलापुर येथे आले व काही कागदोपत्री सोपास्कार पार पाडून सुधीर गाडे  यांच्या ईच्छेनुसार देहदानाचा संकल्प पुर्ण करण्यासाठी देह ताब्यात घेतला यांवेळी बबनराव गाडे सर यांना तुम्हाला दुंःख झाले का असे विचारले असता सुधीर याने मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला असुन ती संकल्पपूर्ती मी करत आहे सुधीर याचे देहदान मी करत आहे अन कुठलेही दान करताना शोक करायचा नसतो दान हे आनंदाने करायचे असते असेही गाडेसर म्हणाले या वेळी जि प सदस्य शरद नवले प ,स ,सदस्य अरुण पा नाईक भरत साळुंके आलम शेख उत्तमराव आमोलीक विष्णूपंत डावरे आदिंनी श्रध्दांजली पर मनोगत व्यक्त केले या आगोदर प्राध्यापक विनायकराव बंगाळ यांनी मरणोत्तर देहदान केले होते प्राध्यापक विनायकराव बंगाळ यांच्या मृत्यू नंतर बंगाळ कुटुंबीयांनी त्याचा देह प्रवरा मेडीकल ट्रस्टला दिला होता त्या प्रमाणेचा मरणोत्तर देहदान करणारे सुधीर गाडे यांचा मृतदेह आज त्यांचे वडील गाडे सर यांनी मेडीकल ट्रस्टच्या स्वाधीन केला या वेळी अजय डाकले अशोक पवार अशोक प्रधान किरण भांड आदि उपस्थित होते.

राहुरी :प्रतिनिधी मिनाष पटेकर-राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ देशमुख-गिते वस्तीच्या रस्त्यावर नगर-मनमाड महामार्गापासून चाळीस फूट अंतरावर तरुणीचा मृतदेह पडलेला होता. काल (रविवारी) मध्यरात्री अकरा ते दोनच्या दरम्यान खूनाची घटना घडली असावी.  स्थानिक शेतकरी विशाल गिते यांचे पोल्ट्रीसाठी मध्यरात्री दोन वाजता कोंबडी खाद्याचे वाहन येणार होते. त्यासाठी गिते नगर-मनमाड रस्त्याकडे दुचाकीवर चालले होते. दुचाकीच्या उजेडात त्यांना मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांच्या गस्ती पथकाला माहिती दिली.  पहाटे चार वाजता वाजता पोलीस

उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक मधुकर शिंदे, उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, कॉन्स्टेबल जालिंदर साखरे, वैभव साळवे, उत्तरेश्वर मोराळे, दिनेश आव्हाड, जानकीराम खेमनर, अण्णासाहेब चव्हाण, गृहरक्षक दलाचे सचिन पवार घटनास्थळी दाखल झाले. सकाळी सहा वाजता नगरवरुन फॉरेन्सिक पथक, ठसेतज्ञ व रक्षा नावाच्या श्वानासह पोलीस पथक दाखल झाले. श्वानाने नगर-मनमाड रस्त्यावर पर्यंत माग दाखविला. घटनास्थळी आढळलेल्या फुटलेल्या दारूच्या बाटलीवरील ठसे व मृतदेहाच्या शेजारी पडलेल्या दगडावरील रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. मृताच्या अंगावर पंजाबी ड्रेस असून, नारंगी रंगाची सलवार व गर्द आकाशी रंगाचा कुर्ता आहे. डाव्या हातावर मनगटाच्या खाली इंग्रजी अक्षरात "शितल" व डाव्या हाताच्या अंगठ्या खाली इंग्रजीत "एस.पी." असे गोंदलेले आहे. मृताच्या पायातील चप्पल घटनास्थळी आढळली नाही.  आसपासच्या परिसरातील नागरिकांना तरुणीची ओळख पटली नाही. चारचाकी वाहनातून तरुणीला घटनास्थळी आणून खून केला असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व लॉजींगमध्ये जाऊन मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. परिसरातील नगर-मनमाड रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू असून, तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.  याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वैभव साळवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात  व्यक्तींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.


श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील राऊत वस्ती परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ दोन दिवसांपूर्वी घरात मृतदेह आढळून आला होता.त्याची हत्या करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्या मारेकर्‍यांना जेरबंद केले आहे.राऊत वस्ती परिसरातील घरातून वास सुटल्याने परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती श्रीरामपूर पोलीस ठाणे याठिकाणी कळविली. यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी धाव घेत सदर व्यक्तीचा घरातील मृतदेहाबाबत माहिती घेतली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, अप्पर पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देत सदर मृतदेहाची पाहणी केली.यावेळी पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे, पो. कॉ. किरण पवार तसेच पोलीस नाईक दत्तात्रेय दिघे यांनी सदर व्यक्ती बाबत परिसरात व नातेवाईक यांच्याशी चर्चा विनिमय करून माहिती मिळविली. यावरून अमोल कसबे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाणे याठिकाणी खबर दिली वैद्यकीय तपासणी नुसार सदर व्यक्तीचा घातपात असल्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी दिली होती.यावरून पोलीस नाईक संजय दुधाडे यांनी परिसरात सापळा लावून जॅक ओहोळ यास ताब्यात घेत चौकशी केली असता जॅक ओहोळ या गुन्हेगाराने गुन्हा कबुल केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे तात्काळ गुन्ह्याचा उलगडा झाल्याने परिसरातून प्रशासनाचे व पोलीस नाईक संजय दुधाडे यांचे कौतुक होत आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे पुढील तपास करत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget