Latest Post


बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील जे टी एस हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री बबनराव लक्ष्मण  गाडे सर यांचे चिरंजीव   सुधीर गाडे यांनी देहदान केल्यामुळे त्यांच्या मृत्यू पश्चात त्याचा मृतदेह प्रवरा नगर येथील मेडीकल ट्रस्टला देण्यात आला.  बेलापुर  येथील सेवानिवृत्त शिक्षक बबनराव गाडे सर यांचा  मुलगा  सुधीर याचे काल अल्पशा आजाराने निधन झाले जैन संघटनेच्या वतीने राबविण्यात येणार्या देहदान संकल्पात बबनराव गाडे सर व सुधीर गाडे यांनी देहदान करण्याचा संकल्प केला होता काल  बबनराव गाडे सर यांचा मुलगा सुधीर याचे निधन झाले देहदानाचा संकल्प केल्यानंतरही जर नातेवाईकांची ईच्छा असेल तर ते मृतदेहाचा अंत्यसंस्कार करु शकतात मुलाने देह दानाचा संकल्प केल्यामुळे आपण तो देह प्रवरा नगर येथील मेडीकल ट्रस्टला देणार असल्याचे बबनराव गाडे यांनी जैन संघटनेचे गौतम साबडा व प्रविण राका यांना तसेच जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई  अशोक पवार पोलीस पाटील अशोक प्रधान यांना कळविले त्या प्रमाणे प्रवरा मेडीकल ट्रस्टचे डाँ .जे ऐ पटेल संदीप ठोंबरे दादासाहेब दुंशिग हे बेलापुर येथे आले व काही कागदोपत्री सोपास्कार पार पाडून सुधीर गाडे  यांच्या ईच्छेनुसार देहदानाचा संकल्प पुर्ण करण्यासाठी देह ताब्यात घेतला यांवेळी बबनराव गाडे सर यांना तुम्हाला दुंःख झाले का असे विचारले असता सुधीर याने मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला असुन ती संकल्पपूर्ती मी करत आहे सुधीर याचे देहदान मी करत आहे अन कुठलेही दान करताना शोक करायचा नसतो दान हे आनंदाने करायचे असते असेही गाडेसर म्हणाले या वेळी जि प सदस्य शरद नवले प ,स ,सदस्य अरुण पा नाईक भरत साळुंके आलम शेख उत्तमराव आमोलीक विष्णूपंत डावरे आदिंनी श्रध्दांजली पर मनोगत व्यक्त केले या आगोदर प्राध्यापक विनायकराव बंगाळ यांनी मरणोत्तर देहदान केले होते प्राध्यापक विनायकराव बंगाळ यांच्या मृत्यू नंतर बंगाळ कुटुंबीयांनी त्याचा देह प्रवरा मेडीकल ट्रस्टला दिला होता त्या प्रमाणेचा मरणोत्तर देहदान करणारे सुधीर गाडे यांचा मृतदेह आज त्यांचे वडील गाडे सर यांनी मेडीकल ट्रस्टच्या स्वाधीन केला या वेळी अजय डाकले अशोक पवार अशोक प्रधान किरण भांड आदि उपस्थित होते.

राहुरी :प्रतिनिधी मिनाष पटेकर-राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ देशमुख-गिते वस्तीच्या रस्त्यावर नगर-मनमाड महामार्गापासून चाळीस फूट अंतरावर तरुणीचा मृतदेह पडलेला होता. काल (रविवारी) मध्यरात्री अकरा ते दोनच्या दरम्यान खूनाची घटना घडली असावी.  स्थानिक शेतकरी विशाल गिते यांचे पोल्ट्रीसाठी मध्यरात्री दोन वाजता कोंबडी खाद्याचे वाहन येणार होते. त्यासाठी गिते नगर-मनमाड रस्त्याकडे दुचाकीवर चालले होते. दुचाकीच्या उजेडात त्यांना मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांच्या गस्ती पथकाला माहिती दिली.  पहाटे चार वाजता वाजता पोलीस

उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक मधुकर शिंदे, उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, कॉन्स्टेबल जालिंदर साखरे, वैभव साळवे, उत्तरेश्वर मोराळे, दिनेश आव्हाड, जानकीराम खेमनर, अण्णासाहेब चव्हाण, गृहरक्षक दलाचे सचिन पवार घटनास्थळी दाखल झाले. सकाळी सहा वाजता नगरवरुन फॉरेन्सिक पथक, ठसेतज्ञ व रक्षा नावाच्या श्वानासह पोलीस पथक दाखल झाले. श्वानाने नगर-मनमाड रस्त्यावर पर्यंत माग दाखविला. घटनास्थळी आढळलेल्या फुटलेल्या दारूच्या बाटलीवरील ठसे व मृतदेहाच्या शेजारी पडलेल्या दगडावरील रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. मृताच्या अंगावर पंजाबी ड्रेस असून, नारंगी रंगाची सलवार व गर्द आकाशी रंगाचा कुर्ता आहे. डाव्या हातावर मनगटाच्या खाली इंग्रजी अक्षरात "शितल" व डाव्या हाताच्या अंगठ्या खाली इंग्रजीत "एस.पी." असे गोंदलेले आहे. मृताच्या पायातील चप्पल घटनास्थळी आढळली नाही.  आसपासच्या परिसरातील नागरिकांना तरुणीची ओळख पटली नाही. चारचाकी वाहनातून तरुणीला घटनास्थळी आणून खून केला असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व लॉजींगमध्ये जाऊन मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. परिसरातील नगर-मनमाड रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू असून, तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.  याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वैभव साळवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात  व्यक्तींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.


श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील राऊत वस्ती परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ दोन दिवसांपूर्वी घरात मृतदेह आढळून आला होता.त्याची हत्या करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्या मारेकर्‍यांना जेरबंद केले आहे.राऊत वस्ती परिसरातील घरातून वास सुटल्याने परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती श्रीरामपूर पोलीस ठाणे याठिकाणी कळविली. यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी धाव घेत सदर व्यक्तीचा घरातील मृतदेहाबाबत माहिती घेतली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, अप्पर पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देत सदर मृतदेहाची पाहणी केली.यावेळी पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे, पो. कॉ. किरण पवार तसेच पोलीस नाईक दत्तात्रेय दिघे यांनी सदर व्यक्ती बाबत परिसरात व नातेवाईक यांच्याशी चर्चा विनिमय करून माहिती मिळविली. यावरून अमोल कसबे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाणे याठिकाणी खबर दिली वैद्यकीय तपासणी नुसार सदर व्यक्तीचा घातपात असल्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी दिली होती.यावरून पोलीस नाईक संजय दुधाडे यांनी परिसरात सापळा लावून जॅक ओहोळ यास ताब्यात घेत चौकशी केली असता जॅक ओहोळ या गुन्हेगाराने गुन्हा कबुल केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे तात्काळ गुन्ह्याचा उलगडा झाल्याने परिसरातून प्रशासनाचे व पोलीस नाईक संजय दुधाडे यांचे कौतुक होत आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे पुढील तपास करत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवडगाव येथील गट नंबर 16 या शेतामध्ये ऊस तोड सुरू असताना ऊसतोड कामगारांना सरीत पांढरे वस्त्र आढळून आले.यावेळी जवळून पाहिले असता अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याचे दिसून आले. याबाबत ऊसतोड कामगारांनी संबंधित क्षेत्र मालक परसराम आसाराम गायधने यांना कळवले.त्यांनी गावातील कामगार पोलीस पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास माहिती कळवली. पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे तसेच पोलीस नाईक दत्तात्रेय दिघे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने सदर व्यक्तीचा मृतदेह ओळखीचा आहे का? यासंदर्भात माहिती घेतली.यावेळी गावातील गोरक्षनाथ गंगाधर मोरे (वय 65) हे दोन ते तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. यासंदर्भात श्री. एकनाथ मोरे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दाखल केली होती. यावरून पोलीस नाईक संंजय दुधाडे यांनी नातेवाईकांना मृतदेह दाखविताच सदर मृतदेह हा आमच्या वडिलांचा असल्याबाबत एकनाथ मोरे यांनी माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी श्रीरामपूर येथे हलविण्यात आला आहे.यावेळी पोलीस पाटील श्री. गायधने यांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाला सहकार्य केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे व दत्तात्रय दिघे करत आहेत.

बेलापुर (प्रतिनिधी  )- राज्यभर गाजलेले गौतम हिरण अपहरण व हत्याकांड प्रकरणात अखेर खरे गुन्हेगार शोधण्यात पोलीसांना यश आले असुन  चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहीती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली      बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व खूनाच्या गुन्ह्यात खरे मुख्य गुन्हेगारांना जेरबंद केल्यानंतर  पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी व्ही आय पी गेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद घेवुन सर्व घटनेची माहीती दिली या वेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे अनिल कटके अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप या वेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत माहीती देताना पोलीस अधिक्षक पाटील म्हणाले की दिनांक १ मार्च रोजी गौतम हिरण यां व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले तेव्हा पासुन सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी गुन्हे अन्वेषण विभागातील सर्व कर्मचारी डोळ्यात तेल घालुन दिवस रात्र तपास करत होते सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या पध्दतीने तपास करण्यात आला याच दरम्यान गौतम हिरण यांचा मृतदेह सापडला आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय हिरण परिवार व बेलापुर ग्रामस्थ व्यापारी यांनी घेतला होता त्याच दरम्यान पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली या दोन आरोपींना अटक केल्यामुळे खरे गुन्हेगार मोकळे झाले या गुन्ह्याचा सर्व बाजुंनी तपास करत असताना एक गाडी उक्कलगाव मार्गे आल्याचे सी सी टी व्हीत दिसले त्यावरुन पुन्हा तपास सुरु केला असता ती गाडी सिन्नर येथील निघाली गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेवुन तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे संदीप मुरलीधर हांडे राहणार माळेगाव तालुका सिन्नर यास ताब्यात घेतले त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने जुनेद उर्फ जावेद बाबु शेख वय २५ वर्ष रा नायगाव रोड सिन्नर अजय राजु चव्हाण वय २६ वर्ष रा मारुती मंदिरा समोर सिन्नर नवनाथ धोंडू निकम वाय २९ वर्ष रा उक्कडगाव तालुका कोपरगाव व एक २२ वर्षीय आरोपी यात सहभागी आसल्याचे निष्पन्न झाले आहे या आरोपींना अटक करण्यात आली असुन आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती व्हँन एम एच १५ जी एल ४३८७ हिरन यांचा मोबाईल जप्त केलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके सपोनि मिथुन घुगे गणेश ईंगळे सोन्याबापु नानेकर मनोहर गोसावी दत्तात्रय गव्हाणे विजयकुमार वेठेकर संदिप घोडके विश्वास बेरड शंकर चौधरी विशाल दळवी रवि सोनटक्के विजाय ठोंबरे सचिन अडबल संतोष लोंढे ज्ञानेश्वर शिंदे दिपक शिंदे विशाल गवांदे योगेश सातपुते संदिप दरंदले रविंद्र घुंगासे शिवाजी ढाकणे सागर ससाणे मयुर गायकवाड मेघराज कोल्हे राहुल सोळूंके रोहीत येमुल आकाश काळे उमाकांत गावडे भरत बुधवंत अर्जुन बडे बबन बेरड चंद्रकांत कुसळकर फुरकान शेख प्रमोद जाधव यांनी केलेली आहे.

श्रीरामपूर -
बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या प्रकरणी काल पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले.असून त्यात नाशिकच्या चार जणांचा समावेश आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेल्या श्रीारामपूरच्या दोघा आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर काल त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे दि. 1 मार्च 2021 रोजी अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. सात दिवसानंतर त्यांचा मृतदेह वाकडी रोडवरील यशवंतबाबा रेल्वे चौकीजवळ आढळून आला. त्याचदिवशी पोलिसांनी बिट्टु वायकर व सागर गंगावणे यांना अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. काल त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासाठी वेगवेगळी चार पथके पाठविण्यात आली होती. त्यात नाशिक येथील चार व अन्य ठिकाणचा एक़ अशा पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज (शनिवारी) त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.



अहमदनगर: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव  रोखण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे थेट रस्त्यावर उतरले. विनामास्क फिरणार्‍या आणि प्रवास करणार्‍या नागरिकांवर आणि शासकीय कार्यालयात विनामास्क

वावरणार्‍या कर्मचार्‍यांवर थेट दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.  शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढत आहे. बेजबाबदार नागरिकांमुळे जिल्ह्याचे आरोग्य धोक्यात येत असून अशा नागरिकांवर दंडाची कारवाई करण्यात आली. ज्या दुकानात विनामास्क नागरिक आढळून येतील, अशा दुकानांवर महिनाभर बंदी घालण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील,  मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदींची यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी थेट भिंगारवाला चौक गाठला. तेथील  दुकानांत तसेच रस्त्याने विनामास्क फिरणार्‍या नागरिकांना फटकारले आणि नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. ज्या व्यक्ती विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास आले त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.तेथून अचानक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख थेट पुण्याकडे जाणार्‍या बसेस थांबतात, त्या स्वस्तिक स्टॅन्ड येथे दाखल झाले. तेथे आलेल्या शिवशाही बसमध्ये असणार्‍या विनामास्क प्रवाशास इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करण्याबद्दल फटकारले आणि त्यांना दंड भरण्यास सांगितले. तेथे आलेल्या इतर बसेसचीही तपासणी करण्यात आली. नागरिकांनाही त्यांनी आवाहन करुन, कोरोना संसर्ग रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ दंड भरला म्हणजे जबाबदारी संपत नाही, तर प्रत्येकाने स्वताबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी. शासकीय कार्यालयात 'मास्क नाही-प्रवेश नाही' अशी मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आज अचानक त्यांनी पोलीस अधीक्षकांसह जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यावेळी तेथे विनामास्क आढळलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली.तेथून थेट त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि समोर असलेल्या इमारतीतील कार्यालयांना भेट दिली. यावेळी काही कर्मचारी विनामास्क आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला.सध्या कोरोना संसर्ग वाढत असून नागरिकांनी स्वताच्या आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही, तर जिल्हावासियांसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. शहरातील काही दुकानांत दुकानमालक तसेच कर्मचारी विनामास्क असल्याचे दिसतात. तर दुकानात जाणारे काही नागरिकही विनामास्क आढळून येत आहेत. यापुढे असे प्रकार घडल्यास संबंधित दुकान पुढील महिनाभर बंद ठेवण्याची कारवाई करण्याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कारण, केवळ दंड वसूल करणे हे उद्दिष्ट नसून वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सर्व यंत्रणा कार्यरत असल्याचे ते म्हणाले.दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख श्री. पाटील म्हणाले, पोलिसांनी ज्या ठिकाणी लग्न समारंभ होत आहेत, अशा मंगल कार्यालयांना भेटी देऊन ज्याठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे, अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget