Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी )- बेलापुर येथील प्रतिष्ठीत व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरणाचा तातडीने शोध घेवुन आरोपींना जेरबंद करावे व गौतम हिरण यांची सहीसलामत सुटका करावी अशी मागणी बेलापुर ग्रामस्थ व्यापारी यांच्या वातीने करण्यात आली असुन तपास योग्य दिशेने चालु आहे तपासात व्यत्यय येईल असे कृत्य करु नये असे अवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी केले आहे                                            बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे सोमवार दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी अज्ञात ईसमांनी अपहरण केले होते पोलीसांनी तातडीने मिंसिंगचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता आज सकाळी श्रीरामपुर व बेलापुर येथील व्यापारी तसेच बेलापुर ग्रामस्थ हे बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयापासुन मुक मोर्चाने बेलापुर पोलीस स्टेशनला आले तेथे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच आभिषेक खंडागळे  बेलापुर पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई  खजिनदार सुनिल मुथा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा भरत साळुंके जि प सदस्य शरद नवले यांनी या घटनेचा बारकाईने तपास करुन आरोपींना जेरबंद करावे व व्यापारी गौतम हिरण यांची सुखरुप सुटका करावी अशी मागणी केली या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी सांगितले की पोलीसांचा सर्व बाजुंनी तपास सुरु आहे तपासासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे पोलीस तपासात अडथळा होईल असे कृत्य कुणी करु नये आरोपींना अटक करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत दरम्यान अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी सकाळी बेलापुरला भेट दिल्यानंतर तपासाला गती मिळाली पोलीसांनी आगोदर मिसींगचा गुन्हा दाखल केला होता नतंर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असला तरी या गुन्ह्याचा तपास तातडीने लावावा या गुन्ह्यातील आरोपीना लवाकरात लवकर अटक करुन व्यापारी गौतम हिरण यांची सुखरुप सुटका करावी अन्यथा बेलापुर ग्रामस्थ व व्यापारी आंदोलन करतील असा ईशाराही या वेळी देण्यात आला  या वेळी कांतीलाल मुथा रमन मुथा बाजार समितीचे संचालक सुधीर नवले रवि खटोड अजय डाकले प्रकाश कुर्हे रमेश लोढा अनिल नाईक  मुस्ताक शेख भूषण चेंगेडीया अभिषेक राका हीतेश धाडीवाल अजिज शेख गोपाल जोशी शरद सोमाणी गणपत मुथा अनिल पवार अशोक गवते किरण भांड रत्नेश बोरा मिथुन मुथा अभिजीत नवलखा राजेश खटोड प्रसाद खरात सचिन जोशी राहुल लखोटीया प्रशांत शहाणे रमेश अमोलीक आदिसह व्यापारी बांधव उपस्थित होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- मनुष्याच्या मृत्यू नंतर करण्यात येणारी मृत्यू भोजन परंपरा खंडीत करुन गावातील सप्तशृंगी मातेच्या मंदिराचा संभा मंडप बांधुन देण्याचा निर्णय बेलापुरातील चायल परिवाराने घेतला असुन या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे                                       बेलापुर येथील किराणा मर्चड असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मदनलाल चायल यांचे कमी वयात निधन झाले ते सप्तशृंगी मंदिराचे अध्यक्ष होते या मंदिरापुढे सभा मंडप व्हावा अशी त्यांची ईच्छा होती त्या करीता त्यांची धडपड चालु होती परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले त्यांची राहीलेली ईच्छा पुर्ण करण्याचा निर्णय चायल परिवाराने घेतला तारुण्यात योगेशचा मृत्यू झाल्यामुळे चायल परिवाराने बाराव्याचे भोजन न देण्याचा निर्णय घेवुन  सप्तशृंगी मंदिराचा सभामंडप बांधुन  देण्याचा निर्णय घेतला आहे  बदलत्या काळानुरुप व प्रसंगानुरुप बदलण्याचा निर्णय चायल परिवाराने घेतला आहे या सभा मंडपासाठी सव्वा ते दिड लाख रुपये खर्च येणार आहे  या सभा मंडपाचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन स्वर्गीय योगेश चायल यांच्या बाराव्याच्या दिवशी दिनांक ७ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता सभामंडपाचा लोकार्पण सोहळा करण्याचा निर्णय कैलास चायल व त्यांच्या परिवाराने घेतला आहे या निमित्ताने योगेश चायल यांच्या स्मृती चिरंतर जपण्याचा  चायल परिविराचा एक छोटासा प्रयत्न आहे

बेलापुर  (प्रतिनिधी ): श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर येथील  प्रसिद्ध व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण हे काल सोमवारी सायंकाळी सात वाजेपासुन अचानक बेपत्ता झाले. या व्यापाऱ्याचे अपहरण झाले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

काल सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता हा व्यापारी नेहमीप्रमाणे आपले गोडाउन बंद करून हिशोबाच्या वह्या व रोख रक्कम देऊन दुचाकीवरुन घराकडे निघाला असता बेलापुर बायपास येथे त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना एका चारचाकीत बळजबरीने कोंबून त्यांचे अपहरण केले.असावे अशी शक्यता आहे एका चार चाकी वाहनात एका व्यक्तीला नेत असताना काहींनी पाहीले आहे ती व्यक्ती सोडा सोडा असे म्हणून दरवाजाला लाथा मारत असल्याचेही काहींनी सांगितले असुन पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत तीच कार श्रीरामपुरच्या दिशेने गेली असल्याचे सी सी टि व्हीत ही आढळून येत आहे त्यामुळे या व्यापाऱ्याचे अपहरण झाले की काय अशी शंका सर्वांना येत आहे रात्रभर गावातील नेतेमंडळी सदर व्यापाऱ्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनला ठाण मांडून होते  व्यापाऱ्याचे अपहरण करून ही चार चाकी श्रीरामपूर च्या दिशेने  निघून गेली. पोलिस तिचा शोध घेत आहेत.गौतम हिरण यांची मोटारसायकल श्रीरामपुर बेलापुर बायपासला लावलेली आढळली त्या गाडीला चावी तशीच होती शिवाय हीशोबाची कागदापत्रे असलेल्या वह्यांची पिशवीही गाडीलाच होती त्यामुळे पैशाकरीता तर या व्यापार्याचे अपहरण केले नसावे ना अशी शंका नातेवाईकांना येत आहे त्या दृष्टीने बेलापुरचे पोलीस तपास करत आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- पुर्वीच्या सत्ताधार्यांनी चुकीच्या पध्दतीने कामे करुन गैरप्रकार केल्यामुळे जनतेने आपल्या हाती सत्ता दिली असुन आता आपली जबाबदारी वाढली आहे  सर्वांना बरोबर घेवुन आपल्याला विकास कामे करुन गावाची वेगळी ओळख निर्माण करावयाची आहे असे मत जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले  बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत आपल्या दारी या उपक्रमाचा शुभांरभ प्रभाग क्रमांक एक मधील मळहद येथुन करण्यात आला त्या वेळी नवले बोलत होते कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी रमेश वाबळे हे होते  जि प सदस्य शरद नवले पुढे म्हणाले की मिळालेल्या सत्तेचा उपयोग  रस्ते पाणी विज आरोग्य गटारी या व्यतीरीक्त अपंग निराधार विधवा परित्यक्त्या अशा गोर गरीबांची कामे आपल्याला करावयाची आहे सार्वजनिक कामा बरोबरच सर्व सामन्य नागरीकांच्या समस्या सोडवा लवकरच गावात एक कोटी रुपयाची विकास कामे  सुरु करण्यात येणार आहे असेही नवले म्हणाले सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की प्रभाग निहाय ग्रामपंचायत आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असुन आम्ही घरोघर जावुन नागरीकांच्या समस्या समजावुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करु  असे सरपंच साळवी म्हणाले उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती करण्यात येणार असुन प्रभाग निहाय स्पर्धा वृक्षारोपण निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा आदि उपक्रम राबविण्यात येतील या वेळी पत्रकार देविदास देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले या उपक्रमांतर्गत मळहद बोरुड गल्ली तकीया मोहल्ला केशवा गोविंदा गल्ली धनगर गल्ली कुंभार वेस येथील नागरीकांच्या घरोघर जावुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या केवळ समस्या जाणून त्यावर उपाय योजनाही केली जाणार असल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे  यांनी सांगितले  या वेळी प्रफुल्ल डावरे गोविंदराव खरमाळे तबसुम बागवान मुस्ताक शेख रमेश अमोलीक माधुरी ढवळे दिलीप दायमा रमेश वाबळे सजंय रासकर तसवर बागवान संजया गोरे मोहम्मंद शेख रमेश काळे अजिज शेख विशाल आंबेकर अमोल गाढेकिरण गागरे श्रीहरी बारहाते विक्रम नाईक रत्नेश गुलदगड हुसेन शेख अन्वर बागवान भरत जाधव निलेश वाबळे शरद म्हैस शफीक बागवान दादा कुताळ कासम बागवान श्रीकांत अमोलीक ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे सचिन वाघ सचिन नगरकर रविंद्र मेहेत्रे महेश कुर्हे  उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक साहेबराव वाबळे यांनी केले तर रामदास वाबळे यांनी आभार मानले.


बेलापुर ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाकडून  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरणाचे रक्षण व संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातही या अभियानाला सुरुवात झाली आहे. बेलापुर येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली  तालुक्यातील निपाणी वडगाव व बेलापूर या दोन गावांचा सदर अभियानात समावेश आहे, पैकी बेलापूरगाव हे नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे हे अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिली.

       गावांतील पर्यावरणाचा समतोल साधावा, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. ज्या गावांची लोकसंख्या जास्त आहे, प्रदूषणाची शक्यता जास्त आहे, अशा गावांची निवड या अभियानात करण्यात येत आहे. श्रीरामपूर  तालुक्यातील बेलापूर गावामधून अभियानास प्रारंभ झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांनुसार पर्यावरण रक्षणाच्या हेतूने सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, प्लास्टिक , घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन , देशी वृक्षारोपन आदिंसह हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. राज्यात या अभियानाअंतर्गत पंचतत्त्वानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र शासनाकडून गौरव करण्यात येणार आहे. अशी माहितीही गटविकास अधिकारी आभाळे यांनी दिली. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून अंगणात एकतरी देशी झाड लावावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी आपल्या भाषणातून केले. सरपंच महेंद्र साळवी यांनीही पर्यावरण संवर्धनासंदर्भात आपले मत प्रकट केले.

      यावेळी पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. उपमुख्याध्यापिका श्रीमती विजया दहिवाळ यांनी शपथ वाचन केले. याप्रसंगी जिप सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,पंचायत समिती गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे,जलील जनाब, रमेश अमोलिक, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे पत्रकार सुहास शेलार, कासम शेख यांचेसह जिल्हा परिषद मराठी, उर्दू  मुला-मुलिंच्या शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

अहमदनगर-करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने वेगाने पावले उचलली आहेत. नागरिकांनीही नियमांचे पालन करावे. रात्रीची संचारबंदी आधीपासूनच आहे.मात्र करोना वाढत असल्याने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता आवश्यक बनली आहे. आवश्यकता पडली तर करोना प्रतिबंधासाठी निर्बंध अधिक कडक केले जातील, अशा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.करोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी व्हीडिओद्वारे नागरिकांना केले आहे. नागरिकांनी लग्न व इतर सोहळ्यांसाठी असणारी निर्बंधाची मर्यादा पाळावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी करोना प्रादूर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. बाजारपेठांसह इतर गर्दीच्या ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश डॉ. भोसले यांनी दिले आहेत.जिल्ह्यात सध्या रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर 12 टक्के आहे. त्यात आता वाढ होताना दिसते आहे. 29 जानेवारीचा आदेश 28 फेब्रुवारीपर्यंत होता. तोच आदेश 15 मार्चपर्यंत वाढविण्यात आला आहे. आवश्यकता पडली तर त्या आदेशात आणखी निर्बंध लादण्याचा विचार केला जाईल. मंदिरे सुरूच राहतील.मात्र शिर्डीप्रमाणे सर्व मंदिरात नियमांचे पालन होईल, याकडे लक्ष द्यायचे आहे. कोणत्याही मंदिरात गर्दी होणार नाही, याची दक्षता संबंधित व्यवस्थापाने घ्यायची आहे. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करीत मास्क वापरावेत.जिल्हयात सध्या 5 हजार 500 बेड उपलब्ध आहेत. व्हॉन्टीलेटर, ऑक्सिजन सिलेंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. आयसीयू सज्ज आहेत. कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. सोमवारी नगरमधील मंगल कार्यालयांमध्ये जावून कारवाई केली आहे. आता या पुढे मंगल कार्यालयात गर्दी दिसली तर ते सील केले जातील. पुढील काही दिवस हे सील उघडले जाणार नाही. मास्क वापरलेले दिसले नाही तर नागरिकांवरही दंडात्मक कारवाई होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

नाशिक - नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ सोमवारी करोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मनपा वैद्यकिय विभागाकडुन भुजबळ फार्म येथील ६० जणांचे स्वॅब घेत ते चाचणीसाठी पाठविले होते..यापैकी पालकमंत्र्यांच्या स्टाफ पैकी 11 जण पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. या सर्वावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. दरम्यान शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी महापालिकेकडुन तातडीने 5 ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्याचे केंद्र सुरू करण्यात आले आहे.नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसापासुन करोना बाधीतांचा आकडा वाढत असतांना सोमवारी (दि.22) रोजी बाधीतांचा आकडा कमी झाल्याचे समोर आली आहे. मात्र शहरात समारंभ, कार्यक्रम, लग्न याठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता करोनाचा संसर्ग वाढण्याची भिती कायम आहे. यातच पालकमंत्री छनग भुजबळ यांनी रविवारी (दि.21) रोजी शहरात अनेक कार्यक्रम व बैठकांना हजेरी लावल्यानंतर ते करोना बाधीत झाले होते.भुजबळ यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर मनपाच्या वैद्यकिय पथकाने भुजबळ फार्मवर जाऊन भुजबळ यांचे कुटुंबिय, स्टॉफ, त्यांच्या संपर्कातील कार्यकर्ते, बदोबस्तांतील पोलीस अशा संपर्कातील 60 जणांची यादी तयार करीत त्यांचे स्वॅबचे नमुने घेतले. या सर्व नमुन्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला असुन यातील 11 जण करोना बाधीत असल्याचे समोर आले आहे.या बाधीत बहुतांशी जण हे पालकमंत्री यांच्या निवासस्थानावरील स्टाफ पैकी आहे. यात चालक, अंगरक्षक यांचा समावेश असुन त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु असुन उर्वरित 9 जणावर घरीच उपचार सुरु करण्यात आले आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget