पालकमंत्र्याच्या स्टाफ पैकी अकरा जण पॉझिटीव्ह सर्वावर तातडीने उपचार सुरू.

नाशिक - नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ सोमवारी करोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मनपा वैद्यकिय विभागाकडुन भुजबळ फार्म येथील ६० जणांचे स्वॅब घेत ते चाचणीसाठी पाठविले होते..यापैकी पालकमंत्र्यांच्या स्टाफ पैकी 11 जण पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. या सर्वावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. दरम्यान शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी महापालिकेकडुन तातडीने 5 ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्याचे केंद्र सुरू करण्यात आले आहे.नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसापासुन करोना बाधीतांचा आकडा वाढत असतांना सोमवारी (दि.22) रोजी बाधीतांचा आकडा कमी झाल्याचे समोर आली आहे. मात्र शहरात समारंभ, कार्यक्रम, लग्न याठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता करोनाचा संसर्ग वाढण्याची भिती कायम आहे. यातच पालकमंत्री छनग भुजबळ यांनी रविवारी (दि.21) रोजी शहरात अनेक कार्यक्रम व बैठकांना हजेरी लावल्यानंतर ते करोना बाधीत झाले होते.भुजबळ यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर मनपाच्या वैद्यकिय पथकाने भुजबळ फार्मवर जाऊन भुजबळ यांचे कुटुंबिय, स्टॉफ, त्यांच्या संपर्कातील कार्यकर्ते, बदोबस्तांतील पोलीस अशा संपर्कातील 60 जणांची यादी तयार करीत त्यांचे स्वॅबचे नमुने घेतले. या सर्व नमुन्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला असुन यातील 11 जण करोना बाधीत असल्याचे समोर आले आहे.या बाधीत बहुतांशी जण हे पालकमंत्री यांच्या निवासस्थानावरील स्टाफ पैकी आहे. यात चालक, अंगरक्षक यांचा समावेश असुन त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु असुन उर्वरित 9 जणावर घरीच उपचार सुरु करण्यात आले आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget