तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या कार्यतत्परतेमुळे दिव्यांग व्यक्तीला मिळाले ताबडतोब रेशनकार्ड.
बेलापुर (प्रतिनिधी )- श्रीरामपुरचे कर्तव्यदक्ष तहसीलदारांच्या कार्य तत्परतेमुळे दिव्यांग व्यक्तीला झटपट रेशन कार्ड मिळाले असुन आधार दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना धन्यवाद दिले आहे. रामकृष्ण नगर शिरसगाव येथील रहीवासी संदिप गोपीनाथ गंभीरे हे रेशनकार्ड मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते पुरवठा विभागात गेल्यानंतर त्यांना आठ दहा दिवसांनी या असे सांगितले त्यामुळे निराश झालेले पायाने अधु असलेले दिव्यांग गंभीरे जड अंतकरणाने तहसील कार्यालयाचा जिना उतरत होता त्याच वेळेस तहसीलदार प्रशांत पाटील कार्यालयात जाण्यासाठी जिना चढत होते एक दिव्यांग व्यक्ती जिना उतरताना त्यांनी पाहीले या दिव्यांग व्यक्तीचे नक्कीच काही तरी महत्वाचे काम असणार आहे अशी शंका त्यांना आली त्यांनी दोन पावले मागे घेत त्या दिव्यांग व्यक्तीची अस्थावाईकपणे चौकशी केली त्या वेळी त्या दिव्यांगाला हे माहीत नव्हते की हेच तहसीलदार आहेत व यांच्या सहीनेच आपल्याला रेशनकार्ड मिळणार आहे तहासीलदार प्रशांत पाटील यांनी चौकशी केल्यानंतर दिव्यांग व्यक्ती संदीप गंभींरे यांनी सांगितले की रेशनकार्ड मिळावे या करीता हेलापाटे मारत आहे त्या वेळी तहसीलदार पाटील यांनी गंभीरे यासं हाताला धरुन मागे फिरविले अन माझ्या बरोबर चल मी तुला रेशनकार्ड देतो असे म्हणाले या वाक्यामुळे गंभीरे यांना नवल वाटले की पुरवठा अधिकार्यांनी नाही म्हटले मग हे कोठुन देणार तहासीलदार पाटील यांनी गंभीरे यांना हाताला धरुन पुरवठा विभागात नेले व तातडीने रेशनकार्ड तयार करण्याचा आदेश दिला अन काही वेळातच गंभीरे यांचे रेशनकार्ड तयार झाले तहसीलदार पाटील यांनी सही करुन ते त्यांच्या हातात दिले त्या वेळी संदिपं गंभीरे याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता ही आनंदाची बातमी गंभीरे यांनी आधार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण खडके यांना सांगितली त्यांनीही संघटनेच्या वतीने तहसीलदार पाटील यांचे आभार मानले.