Latest Post

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- अभिरुप युवा संसद यांच्या वतीने आयोजीत युवक बिरादरी स्पर्धेत श्रीरामपुर येथील चंद्ररुप डाकले काँलेजने दुसरा क्रमांक मिळविला असुन या काँलेजचा विद्यार्थी विशाल नवनाथ देसाई याने प्रखर वक्ता हा बहुमान मिळविला आहे                                                  एम आय टी काँलेज पुणे येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातुन स्पर्धक आलेले होते या स्पर्धेत पहीला क्रमांक मुंबईच्या टिमने मिळविला द्वितीय क्रमांक श्रीरामपुर येथील सी डी जे काँलेजने मिळविला सी डी जे काँलेज मधील विद्यार्थी विशाल नवनाथ देसाई याची प्रखर वक्ता (संसद पटु )म्हणून निवड झाली आहे दिनांक १२ जानेवारी रोजी मुंबई येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे महाराष्ट्रातुन एकुण ३८ स्पर्धकांची निवड करण्यात आली असुन त्यातुन प्रखर वक्ता निवडण्यात येणार आहे  विशाल देसाई यास नाऊर येथील रविंद्र देसाई सी डी जे काँलेजचे घोडके सर पुणे येथील इंगोने सर याचे मार्गदर्शन लाभले  विशाल देसाई यांच्या यशाबद्दल जेष्ठ साहित्यिक नामदेवराव देसाई पत्रकार देविदास देसाई पत्रकार संदीप जगताप प्रगत प्राथमिक सोसायटी नाऊरचे चेअरमन माणीक देसाई प्रताप देसाई आदिंनी अभिनंदन केले आहे.



बेलापुर (प्रतिनिधी  )-कार्यकर्त्यांना दमबाजी करण्याची भाषा बंद करा अन कोण नालायक कुणाचे काय धंदे आहे हे सार्या गावाला ठाऊक आहे त्यामुळे आमच्या नादी लागाल तर जशास तसे उत्तर देवु  असे अवाहन जनता विकास अघाडीचे रविंद्र खटोड यांनी दिले आहे                              जनता विकास अघाडीच्या प्रचाराचा शुभारभ श्री हरिहर केशव गोविंद मदिर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव वाबळे हे होते   रविंद्र खटोड पुढे म्हणाले की सुस्कृंत असल्याचा आव आणू नका कोण लायक कोण नालायक ही जनता ठरवेल आपली पायरी ओळखुन बोला आमची जिभ घसरली तर बरेच काही बाहेर येईल अन किती दिवस एकच कँसेट जनतेसमोर घासणार आम्ही शनि देवाचे भक्त आहोत हे सांगण्याची कुणाला गरज नाही  आमचे तोंड उघडण्यास भाग पाडू नका नाही तर बरेच काही बाहेर येईल असेही खटोड म्हणाले बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले म्हणाले की गावात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली परंतु विरोधकांनी केवळ दबाव तंत्राचा वापर करुन त्रास देण्याचे काम केले बेलापुर ग्रामपंचायतीची २७ वेळा चौकशी केली परंतु एक रुपयाचाही भ्रष्टाचार आढळला नाही जि प सदस्य असताना आपण काय दिवे लावले केवळ लोकांची उणे-दुणे काढण्याचेच काम केले प्रत्येक कामात अडथळा आणला गावाच्या पाणी पुरवठ्याची सर्वात मोठी चार कोटी १७ लाख रुपयाची पाणी पुरवठा योजना काही काळ रखडली होती आता त्या कामाला पुन्हा गती येणार आहे त्या करीता जनता विकास अघाडीच्या सर्व १७ उमेदवारांना निवडणूक द्या असे अवाहन नवले यांनी केले  आपल्या भाषणात बोलताना भरत साळुंके म्हणाले की काळजी करु नका सर्वांचा हिशोब चुकता करु या अघाडीच्या माध्यमातून जुन्या नव्यांचा मेळ घालुन सर्वा जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला मुस्लिम कब्रस्थानचा प्रश्न सोडविला दहावा घाटाचा प्रश्न मार्गी लावला त्यातही विरोधकांनी अडथळे आणले ग्रामपंचायतीत काम करताना चुकीचे काम केले नाही चुकीच्या कामाला पाठीशी घातले नाही अन एक रुपयाही खाल्ला नाही असेही साळुंके म्हणाले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक म्हणाले की कै मुरलीधर खटोड व कै जयंतराव ससाणे हे विकास पुरुष होते त्यामुळे त्यांचे फोटो लावले त्यात कुणाला त्रास होण्याचे कारण नाही आरोप विचारा पूर्वक कराआम्ही आज पर्यत जनतेशी ईमान राखण्याचेच काम केले त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे असेही पाटील म्हणाले या वेळी गोविंद वाबळे शैलेश पवार चंद्रकांत नाईक हैदरभाई सय्यद आदिंनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलन अभिजित राका यांनी केले


बेलापुर (प्रतिनिधी  )-गावात चाललेली दादागीरी भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी गावकरी मंडळाला विजयी करा गावकरी मंडळाची सत्ता आल्यास गावाची दशा बदलुन योग्य दिशा देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करु अशी ग्वाही गावकरी मंडळाचे प्रमुख व जि प सदस्य शरद नवले यांनी दिली. बेलापुर ग्रामपंचायतीच्या १७ जागे करीता होणार्या  गावकरी मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद मदिर येथे माजी जि प अध्यक्ष मिस्टर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाला  या वेळी  बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की गावकरी मंडळ सत्तेत आल्यावर पहीले प्राधान्य गावाला शुध्द पाणी देण्याचे नियोजन करु गावातील सर्व रस्ते डांबरीकरण करु तसेच वाड्या वस्त्यावरील रस्तेही दुरुस्त करु प्रवरा नदीत पडणारा कचरा बाजार तळावर पडणारा कचरा या कचर्याचा एक कोटी रुपयाचा घन कचरा प्रकल्प राबवु त्या करीता शेती महामंडळाची जमीन ताब्यात घेवु गावातील १७०० लाभार्थ्याची नावे ड वर्ग मध्ये असुन या सर्वांना आपल्याला घरकुल योजनेचा लाभ द्यावयाचा आहे  त्याच बरोबर गावात सर्व सामान्यासाठी संस्कृतीक भवनाची निर्मिती करुन तेथे विवाहची सोय करण्यात येईल तसेच तरुणासाठी जिम व महीलासाठी जाँगीग ट्रकची व्यवस्था केली जाईल असेही जि प सदस्य शरद नवले यांनी सांगीतले या वेळी बोलताना भाजपाचे सुनिल मुथा म्हणाले की दहा वर्ष ग्रामपंचायतीचा वापर केवळ स्वतःच्या फायद्यासाठी करणार्या नतद्रष्ट ठेकेदारांनी गावाला बदनाम केले विकास कामे कसे करावी याचा आदर्श समाजापुढे ठेवणारे कै ,जयंतराव ससाणे व कै .मुरलीधर खटोड यांना बदनाम करु नका भ्रष्टाचारामुळे गावाचा बट्ट्याबोळ झाला असुन गावाचा कायापालट करावयाचा असेल तर गावाकरी मंडळाला विजयी करा ज्यांनी शनि देवाला फसविले आपल्या निष्ठावंत कार्याकर्त्याला फसविले ते लोक मोठ मोठे अमिषे दाखवुन खोटी अश्वासने देवुन आपली मते मिळवतील व पाच वर्ष सत्ता भोगतील अन सत्तेतुन पैसा संपत्ती अन संपत्तीतुन पुन्हा सत्ता हे समीकरण आता हाणून पाडा असेही मुथा म्हणाले

श्रीरामपूर- पूर्वीपेक्षाही आजची पत्रकारिता प्रगल्भ झालेली आहे पत्रकारांना नवनवीन माध्यमे व त्यामध्ये झालेले बदल आत्मसात करून अनुभव व मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर भावी काळात वाटचाल करावी लागेल जो बदल स्वीकारणार नाही त्याची पत्रकारिता विशिष्ट अशा एका ढाच्यातच राहील त्यामुळे त्याचा परिणाम प्रसार माध्यमावर होऊन त्यांची आर्थिक झळ प्रसार माध्यमे चालवणाऱ्यांना सोसावी लागेल असा इशारा सिटिजन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नागेश सावंत यांनी दिला कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिन पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते सिटिजन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र या वृत्तपत्रे संघटनेने बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन हा पत्रकार दिनाचे आगाशे सभागृहात या ठिकाणी आयोजित केली होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार पदमाकर शिंपी हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की पत्रकारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे कोरोणाच्या संकटावेळी पत्रकारांनी जबाबदारीने कर्तव्य पार पाडले कुटुंबाची काळजी न करता सामान्यांना माहिती  पुरविण्याकरिता कसोसिने प्रयत्न केले अशा पत्रकारांचा गुणगौरव होणे हे नवोदित पत्रकारांना प्रोत्साहन देण्याचा खरा क्षण ठरेल असे ते म्हणाले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, अरुण पाटील, सुधीर वायखिंडे, मराठा स्वयंसेवक संघाचे राजेंद्र भोसले, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा अध्यक्ष असलम बिनसाद, पत्रकार सलीम पठाण, सुनील लोखंडे, जयेश सावंत, रोहित भोसले, प्रवीण जमदाडे, राहुल रणपिसे, बाबा वाघ, श्रीमती वैशाली थोरात, अमोल सावंत, रोहित डुकरे, यांच्यासह  प्रसारमाध्यमे व विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


श्रीरामपुर-दतनगर येथे भिमा कोरेगांव विजयस्तंभ प्रतिकात्मक उभारून शुरविरांना अभिवादन केले, शासनाने कोराना प्रादुर्भाव मुळे भिमा कोरेगांव येथे जाने मनाई केली, शासकीय नियम पाळत दतनगर परिसरातील व पचंक़ोशितील प्रमुख मान्यवर, जि.प.सदस बाबासाहेब दिघे, पचायत समिती सभापती नाना साहेब शिंदे, दतनगर ग्रामपंचायत चे लोक नियुक्त सरपंच सुनिल भाऊ शिरसाठ, उप सरपंच, प्रेमचंद कूकंलोळ, भिमा भाऊ बागुल (आर पी आय, जिल्हा विभाग प्रमुख) माजी सरपंच पी.एस.निकम सर, तटांमुक्ती समिति अध्यक्ष रविद्र गायकवाड, दतनगर ग्रामपंचायत चे सदस्य, बाळासाहेब विघे, शहाजानभाई बागवान, प्रदीप गायकवाड, हिरामन जाधव, सुरेश जगताप, कीरण खडांगळे, राजंण खोल चे माजी  सरपंच राजुनाना गायकवाड, राजंण खोल पोलिस पाटील,अभंग, निलेश जाधव (राजंण खोल ग्राम.सदस) दतनगर माजी उप सरपंच, जगताप सर, सुनिल उबाळे सर, अशोक बोरगे, (कामगार नेते, ) सजंय बोरगे, सजंय शिरसाठ, सदीप यादव, मोसिन शेख, विकी भागवत, अविनाश जगताप, सचिन साळवे, बाबा बनसोडे, शैलेश गायकवाड,  अमित कोळगे, राजेन्द्र गायकवाड, आदी हजर होते, या कार्यक्रम चे सुत्रसचांलन, सी.एस.बनकर, यांनी केले, सोशल डिस्टन मास्क, सैनिटाईज सह कार्यक्रम करण्यात आला, शेवटी आभार व्यक्त अजय शिंदे यांनी केले,

श्रीरामपूर येथील मुस्लिम बकरसाब जमाती च्या वतीने जमातीचे नूतन अध्यक्ष इलाही बक्ष हाजी फकीर मोहम्मद कुरेशी व इलेक्ट्रॉनिक मीडिया अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असलम बिन साद यांच्या सत्काराचा कार्यक्रम शनिवार दिनांक 2-1- 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता बजरंग चौक वाड नंबर 2 याठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बकरकसाब समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बने साहब ताडे हे होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री.अनिल कांबळे, शेतकरी संघटनेचे नेते अहमद भाई जागीरदार, माजी नगरसेवक नजीर भाई मुलानी, अलनुर संघटनेचे अध्यक्ष जावेद भाई शेख, गणेश वायदंडे, तिरंगा न्यूज चॅनलचे संपादक असलम बिन साद, तिरंगा न्यूजचॅनलचे उपसंपादक जावेद शेख, गणेश ताकपिरे, फकीर मोहम्मद शेख, अकबर भाई शेख,अमीर बेग मिर्झा आदीसह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी )-कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता नागरीकांचे रक्षण करणार्या   पोलीसांचा स्थापना दिनानिमित्त  पत्रकार व ग्रामस्थांच्या वतीने पोलीसांचा सत्कार करण्यात आला        पोलीस स्थापना दिनानिमित्त श्रीरामपुर वहातुक शाखेचे सहाय्यक फौजदार देविदास रजपुत हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे निखील तमनर प्रसाद ईंगळे हरिष पानसंबळ यांचा सत्कार करण्यात आला या वेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे सामाजिक कार्यकर्ते अकबर टिन मेकरवाले चंद्रकांत पा .नाईक तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पत्रकार सुहास शेलार किशोर कदम अजिज शेख श्रीरामपुर तालुका पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष दिलीप दायमा उपस्थित होते  या कार्यक्रमाचे प्रास्तविक देविदास देसाई यांनी केले तर रामेश्वर ढोकणे यांनी आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget