बाभळेश्वर चौकातील हॉटेल यमुना लॉजिंग मधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा.
दोन पिडीत परप्रांतीय( बंगाली) महिलेची सुटका व दोनआरोपी ताब्यात.
आज दि. 16/ 12/2020 रोजी मा पोलीस अधीक्षक मनोज पाटील सो अहमदनगर यांना बाभळेश्वर चौकातील हॉटेल यमुना लॉजिंग येथे मालक नामे प्रवीण बाळासाहेब पानसंबळ हा महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे मा.श्री. मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. डॉक्टर दिपाली काळे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर याचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे Dy.s.pसंदिप मिटके Dy.s.p संजय सातव, श्री नोपाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर शहर , श्री अभिनव त्यागी, स.पो.नि. समाधान पाटील व कर्मचारी यांचे पथक तयार करुन हॉटेल यमुना लॉजिंग येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी क्रं,1) प्रवीण बाळासाहेब पानसंबळ रा निर्मळ पिंपरी ता राहता 2) अरबाज मोहमद शेख रा बाभलेश्र्वर यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द लोणी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे भा. द. वि. कलम 370 सह स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Dy.s.p.संदिप मिटके,Dy.s.p संजय सातव,आयुष नोपाणी, अभिनव त्यागी प्रशिक्षणार्थी आयपीएस API समाधान पाटील यांच्या पथकाची कारवाई.