Latest Post

बुलडाणा - 22 ओक्टोबर

बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम भादोला येथील नारायण भाऊराव जोशी यांची शेती गावातीलच शालिकराम तोताराम उबरहंडे यांनी बटाईने केली होती.या शेतात त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. काही दिवसांपूर्वी सोयाबीन सोंगुन त्याची सोडी लावण्यात आली होते. 21 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सदर सोयाबीन सुडीला आग लावून दिली यात शेतकऱ्याचे 90 क्विंटल सोयाबीन किंमत अंदाजे 4 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे. याप्रकरणी शालिकराम तोताराम उबरहंडे यांच्या तक्रारीवर बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार जनार्दन इंगळे करीत आहे.

बुलडाणा - ऑक्टोबर 

शहरातील रामनगर भागातील रहिवासी 36 वर्षीय व्यक्तिने आपल्या राहत्या घरच्या वरील मजल्यावर एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घड़ली. मृतकाचे नाव आशिष सुरेश शेळके असे आहे.घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर ठाण्याचे पीएसआई विनीत घाटोळ आपल्या पथका सह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करुण मृतदेहला जिल्हा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनसाठी पाठवला आहे.शहर ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील पोलिस करत आहे.

बुलडाणा - 22 ऑक्टोबर

बुलडाणा जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झालेला नसल्याने मोठ्या प्रमाणात नंदुरबार तसेच मध्यप्रदेश होऊन वाळू बुलडाणा जिल्ह्यात येत आहे. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बुलढाणा तहसील कार्यालयच्या पथकाने मलकापूर मार्गावरील चौधरी पेट्रोल पंपाजवळ एका वजन काट्यावर  उभा असलेला मोठा ट्रक क्र MH 28 AB 9282 याची तपासणी केली असता त्यात मध्यप्रदेशच्या होशंगाबाद येथील नर्मदा नदीतील  वाळू दिसून आली.ट्रक चालकाकडून रॉयल्टीची तपासणी केली असता रॉयल्टीची मुदत संपल्याचे निदर्शनास आल्याने सदर ट्रक बुलडाणा तहसील कार्यालयात लावण्यात आलेला आहे. पुढील तपास बुलडाणा तहसिलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार अमरसिंह पवार करीत आहे.

मा. श्री. डॉ.प्रतापराव दिघावकर सो विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परीक्षेत्रातील अवैध धंदे यांचे समुळ उच्चटन करण्यासाठी पथकाची नेमणुक केलेल्या पथकाने आज दिनांक २२/१०/२०२० रोजी दुपारी १६.०० वाजेचे सुमारास श्रीरामपुर गावात बेलापुर ते पुणे रोडाचे बाजुला अनारसे हॉस्पीटल चे समोर दुर्गा सोलर अॅण्ड आर.ओ हाऊस दुकानाचे शेजारी एका पत्र्याचे दुकानात अंकसंटा जुगाराच्या अड्यावर छापा टाकला असता तेथे एकुन ०६ आरोपी हे कल्याण नावाचा अंकसट्टा खेळतांना व खेळवितांना मिळुन आले असुन त्यांचे कडुन सुमारे ११७८०/- रुपये रोख व जुगाराची साधने मिळुन आले असुन सदर छाप्याची कारवाई करुन आरोपीतांना पोलीस ठाणे येथे घेवुन जात असतांना पथकातील अधिकारी व कर्मचारी अशांनी पुन्हा श्रीरामपुर गावात शिवाजी चौकात चंद्रकांत भेळ वाल्याशेजारी असलेल्या पत्र्याचे टपरीचे आडोश्याला सार्व जागी १७.०० वाजता सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी देखिल एकुन ०५ आरोपी हे कल्याण नावाचा अंकसट्टा खेळतांना व खेळवितांना मिळून आले त्यांचे कडुन ७११०/ रुपये रोख व जुगाराची साधने मिळून आले. वरील केलेल्या कारवाई बाबत श्रीरामपुर पोलीस ठाणे येथे भाग ६ गु.र नं २१०६/२०२० महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४/५ प्रमाणे तसेच श्रीरामपुर पोलीस ठाणे येथे भाग ६ गुर नं २१०७/२०२० महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर कारवाई हो मा विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. डॉ.प्रतापराव दिघावकर सो नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील सपोनि/सचिन जाधव, पोसई/संदिप पाटील, असई/राजेंद्र सोनवणे, पोना/१०५१ नितीन चंद्रकुमार सपकाळे, पोकॉ/१०६० विश्वेश हजारे, पोको १५६५ दिपक ठाकुर, पोकाँ/उमाकांत खापरे, पोकॉ/१९२१ नारायण कचरु लोहरे यांनी केली आहे.


श्रीरामपूर : श्री. किशोर गाढे यांजकडून भारतीय मिडीया फौडेशनचे महाराष्ट्र कमेटीचे चेअरमन श्री. राजेंद्र वाघ यांनी मालेगांव शहरातील लॉकडाऊनच्या काळातील झालेल्या रेशन घोटाळा प्रकरणी चौकशी करावी या मागणीकरीता मा. अप्पर जिल्हाधिकारी साहेब कार्यालय, मालेगांव या ठिकाणी दिनांक 0७/१०/२०२० व दिनांक ०८/१०/२०२० रोजी सलग दोन दिवस भारतीय मिडीया फौडेशनच्या वतीने उपोषण केले. त्या उपोषणाची दखल घेता नायब तहसिलदार श्री. वाणीसाहेब, लिपिक सावणे व पुरवठा अधिकारी यांनी दिनांक १०/१०/२०२० रोजी या चौकशीस मौजे डाबली, पोस्ट काटी, ता. मालेगांव या गावात श्री. राजेंद्र वाघ यांना चौकशी कामी समक्ष हजर राहणेबाबत कळविण्यात आले होते. याबाबतची दवंडी देवून ग्रामस्थांना हजर राहणेबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार दिनांक १०/१०/२०२० रोजी सदरील अधिकारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यावेळी उपस्थित होते. यांच्यासमक्ष गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या चौकशीत अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री. राजेंद्र वाघ व त्यांच्या पत्नी सौ. भारती राजेंद्र वाघ व आई निर्मला एकनाथ वाघ यांना मारहाण केली. तसेच श्रीमती निर्मला वाघ यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यांच्या या क्रुर कृत्याचा निषेध भारतीय मिडीया फौडेशन व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला असून या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत भा.दं.वि. कलम ३५३ अन्वये कार्यवाही करावी, तसेच श्री. राजेंद्र वाघ व त्यांच्या कुटूंबियांतील लोकांना मारहाण केल्याबद्दल तसेच श्रीमती एकनाथ वाघ यांचेबरोबर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबद्दल पत्रकार संरक्षण कायद्यान्वये या गुंडांवर कार्यवाही करण्यात यावी. याचबरोबर श्री. राजेंद्र वाघ व त्यांच्या कुटूंबियांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून त्यांना कलम १६९ अन्वये आरोप मुक्त करण्यात यावे या मागणीचे निवेदन भारतीय मिडीया फौंडेशन व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात दिनांक २०/१०/२०२० रोजी देण्यात आले. सदरील दोन्ही निवेदन शिरस्तेदार श्री. डी. डी. गोवर्धने यांनी स्विकारले असून तुमच्या मागण्या वरिष्ठांना कळविण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. निवेदनावर श्री. शेख बरकतअली, किशोर गाढे, अमीरभाई जहागिरदार, अस्लम बिनसाद, शेख फकीर महंमद, रमेश शिरसाठ, शब्बीरभाई कुरेशी, गुलाबभाई वायरमन, सचिन केदारी, गणेश ताकपिरे, अक्रम कुरेशी, अयाजअली शाह बाबा आदि पत्रकारांच्या सह्या आहेत.


बुलडाणा - 21 ऑक्टोबर

बुलडाणा तालुक्यातील सैलानी जवळ एका शेतातुन जात असताना 15 ते 20 मोकाट कुत्र्यानी एका 9 वर्षीय मुलावर हल्ला चढविला व त्याचे लचके तोडत असताना त्यांने आरडाओरड केली ते ऐकून आई धावत आली असता आईवर सुद्धा कुत्र्यांनी हल्ला केला. यात 9 वर्षे मुलाचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झालेली आहे.ही घटना 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उंबरखेड़ शिवारात घडली आहे.

   


 लातूर जिल्ह्यातील धर्मापुर येथील शेख तस्लीम मागील काही काळापासून सैलानी येथे आपल्या परिवारसह राहत आहे.सद्या ते रमेश शेवाळे यांच्या शेतात राहतात.आज 21 ओक्टोबरला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास 9 वर्षीय मुलगा शेख अरमान काही किराणा सामान आणण्यासाठी सैलानी कडे जात असताना अचानकपणे 15 ते 20 मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करत त्याचे लचके तोडले, आरडाओरड ऐकून त्याची आई नसीम बी बचावासाठी धावत गेली असता त्याच्यावर ही कुत्र्यांनी हल्ला केला यात तीही गंभीर जखमी झाली. त्याच्या मदतीला काही लोक धावत आले तेव्हा कुत्रे पळून गेले. गावातील लोकांनी त्यांना उचलून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरने शेख अरमान याला मृत घोषित केले तर आई नसीम बी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) पूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या कर्तृत्वाने भारताची शान जगात उंचावण्याचे कार्य केले. भारताला बलशाली बनवताना त्यांनी पुस्तकांशी मैत्री केली. त्यांचे अग्निपंख हे पुस्तक मी दोनदा वाचले. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी कष्ट करून नावलौकिक प्राप्त केला. त्यांचे कार्य भारतातील सर्वांसाठी व येणाऱ्या पिढीसाठी दीपस्तंभासारखे आहे. वाचन प्रेरणा दिनापासून प्रेरणा घेऊन उर्दू शाळेने आयोजित केलेला आजचा सोहळा प्रशंसनीय आहे. सर सय्यद अहमदखान यांनी सामाजिक सुधारणेसाठी मोठे कार्य केले आहे. या थोर विभूतींचे स्मरण सतत होणे आवश्यक आहे असे अनमोल विचार शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी व्यक्त केले .

परमवीर शहीद अब्दुलहमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा नंबर पाच मध्ये थोर समाजसुधारक सर सय्यद अहमद खान व भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जयंती सोहळा तसेच शालेय विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका वितरण व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा तसेच मान्यवरांचा सत्कार सोहळा संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री पटारे बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाकभाई पठाण हे होते.व्यासपीठावर समाजसेवक कलीम कुरेशी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेसचे प्रदेश सचिव सोहेल बारूदवाला, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड.समीन बागवान, शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर एहतेशाम शेख, इम्तियाज खान, बिलालशहा, हारुन शाह आदी उपस्थित होते .

आपल्या प्रमुख भाषणात पटारे यांनी शाळेच्या प्रगतीचे मुक्तकंठाने कौतुक करून प्रत्यक्षपणे जयंती सोहळा साजरा करून शाळेने समाजासमोर एक उदाहरण घालून दिल्याचे सांगितले . यावेळी बोलताना उम्मती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी शाळेसाठी सर्वतोपरी मदत शासनाकडून मिळवून देण्याचे आश्वासन दिले.ॲड.समीन बागवान व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाक भाई पठाण  यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले . 

याप्रसंगी वाचन प्रेरणा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी कथा व उतारा वाचन केले . शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना इक्रा हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले . तसेच इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या ताहेरा अतहरहसन रिजवी, फरहान बिलाल शाह व अल्फिया हारून शाह यांचा भेटवस्तू देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चाने सर्व विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .शाळेला नेहमी सहकार्य करणारे सोहेल बारूदवाला यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या सचिवपदी नियुक्तीबद्दल  व  ॲड. समीन बागवान यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .शाळेच्या शिक्षिका शाहीन शेख यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तसेच मोहम्मद आसिफ यांनी सर सैय्यद अहमदखान यांच्या जीवनकार्याचा परिचय आपल्या व्याख्यानातून करून दिला.

शाळेचे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये लॉक डाऊनच्या काळात शाळेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली .पालक व विद्यार्थी शाळेमध्ये येण्यास खूप आतुर आहेत .परंतु शासनाच्या आदेशाशिवाय नियमित शाळा सुरू करता येत नाही असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन मोहम्मद आसिफ यांनी केले तर आभार फारुक शाह यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, जमील काकर, शाहीन शेख, अस्मा पटेल, निलोफर शेख,बशीरा पठाण,मिनाज शेख, एजाज चौधरी, सदफ शेख, रिजवाना कुरेशी आदींनी विशेष परिश्रम घेतले .


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget