वृक्षांचे संगोपन व संवर्धन हि सामाजिक जबाबदारी...संजय वक्ते
मधुकर वक्ते कोपरगाव प्रातिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे वृक्षारोपण पर्यावरणाचा समतोल बिघडण्याला वाढलेले प्रदूषण जरी कारणीभूतअसले तरी बेसुमार होत असलेली वृक्षतोड व नष्ट होत असलेली वनराई हेदेखील कारणीभूत आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून अनियमित व कमी प्रमाणात होत असलेले पर्जन्यमान,अति उष्णता,काही भागात कमी पर्जन्यमान तर काही भागात महापूर अशा अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. हि परिस्थिती अशीच राहिली तर भावी पिढीचे भविष्य हे निश्चितपणे अंधकारमय होऊ शकते. त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असून फक्त वृक्ष लागवड न करता लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणे हि आपली सामाजिक जबाबदारी असून प्रत्येकाने हि जबाबदारी कर्तव्य समजून पार पाडावी असे आवाहन संजय वक्ते व त्यांचे मित्र पोपट सोळके यांनी दिली आहे.या दोन मित्रांनी वृक्षारोपण करून एक निसर्गा विषय कृतज्ञता व्यक्त केली . यावेळी वृक्षारोपण करतांना दिनकर सोळके, तेजेस वक्ते, राजू वक्ते, अनिल वक्ते, मधुकर वक्ते ,दिपक गरूड,आदी उपस्थित होते.