Latest Post

बुलडाणा - 31 जुलै
जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या बोथा गावाजवळील धरणात आज 31 जुलै रोजी एक अस्वल मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली होती.
     फक्त ज्ञानगंगा अभयारण्यच नव्हे तर संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अस्वलांचा अधिवास आहे. जिल्ह्यातला वातावरण अस्वलांसाठी पोषक असल्याने इथे त्यांची संख्याही मोठी आहे. मागील काही वर्षात ज्ञानगंगा अभयारण्यला लागून असलेल्या बुलडाणा व चिखली तालुक्यातील काही क्षेत्रात अस्वल व मानवी संघर्षाचे अनेक घटना घडलेल्या आहेत.ज्ञानगंगा अभयारण्यातील अस्वल जंगल सोडून वस्ती वाड्याकडे येत असतात.आज शुक्रवारला सकाळी ज्ञानगंगा अभयारण्यला
लागून असलेल्या बोथा गावाजवळ  बुलढाणा-खामगाव मार्गाला लागून असलेले धरणात एक अस्वल बुडालेला दिसून आला.याची माहिती प्रादेशिक वन विभागाला देण्यात आली असता खामगाव रेंजचे आरएफओ के.डी.पडोळ,वनपाल एस.आर. गिरणारे,वनरक्षक के.एच.मोरे तथा अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व पाण्यात बुडालेल्या अस्वलाला धरणातून बाहेर काढण्यात आले. मृत मादी अस्वल 2 ते 3 दिवसापासुन पाण्यात बुडाली असेल असा अंदाज आरएफओ पडोळ यांनी व्यक्त केला आहे.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अवताळे व डॉ.तायडे यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले व नंतर अस्वलाला जाळुन नष्ट करण्यात आले आहे.अस्वलाला चांगले पोहने येते तरीही तो पाण्यात बुड़ुन कसा मरण पावला?या प्रश्नाचा उत्तर पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मिळेल.

बुलडाणा - 31 जुलै
स्वतंत्र अधिवास अन् वाघिनीच्या शोधासाठी टिपेश्वर अभयारण्यातून 1300 कि.मी.चा प्रवास करत बुलडाणा नजीकचे ज्ञानगंगा अभयारण्य गाठणाऱ्या C-1 वाघाचा एकांतवास संपणार असून त्याचे लवकरच एका वाघिन सोबत मनोमिलन होणार असल्याचे संकेत समितिच्या बैठकीत मिळाले असून त्यासाठी काही महत्वपूर्ण बाबीकडे लक्ष दिले जाणार आहे.
      यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात टी-1 या वाघिणीने 2016 मध्ये 3 पिल्लांना जन्म दिला होता.त्या पिल्ल्यांचे नामकरण सी-1, सी-2 आणि सी-3 करण्यात आले होते.या तीन्ही वाघांना 25 आणि 27 मार्च 2019 दरम्यान रेडीओ कॉलर लावण्यात आले होते. वाघांचे परिक्रमण तपासण्याच्या दृष्टीकोणातून हे रेडियोकॉलर महत्वपूर्ण ठरले आहे.यातील सी-1 हा सबअडल्ट वाघ महाराष्ट्र व तेलांगाना हे दोन राज्य व महाराष्ट्रातील 6 जिल्हे फिरून 5 महिन्यात 1300 कि.मी.चे अंतर पार करत बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात 1 डिसेंबर 2019 ला पोहचला होता. 13 शे किलोमीटरची मुशाफिरी करणाऱ्या C-1 वाघाने 205 चौरस किलोमीटर मध्ये विस्तारलेले ज्ञानगंगा अभयारण्य पिंजुन काढले. डिसेंबर मध्ये C-1 वाघ ज्ञानगंगा अभयारण्य सोडून अजिंठा पर्वत रांगा ओलांडत अजिंठा लेणी व औटुंबर गौताळा अभयारण्य पर्यंत जावून पोहोचला होता. मात्र जानेवारी मध्ये ज्ञानगंगा अभयारण्यात परत आल्यानंतर त्याला योग्य अधिवास मिळाल्याने तो आज पर्यंत इथेच स्थिरावलेला आहे.या वाघाला एक वाघिन मिळावी,या साठी काय काळजी घ्यावी,काय उपाययोजना करण्यात याव्या ?या अभ्यासासाठी एक समिति गठित करण्यात आली आहे. या समितिची बैठक 28 मार्चला होणार होती मात्र लॉकडाउनमुळे तब्बल 4 महिन्या नंतर 28 जुलैला अमरावती येथे बैठक संपन्न झाली.या बैठकीत समितीचे अध्यक्ष मेळघाट व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी,सदस्य बिलाल हबीब,संजय वडतकर,किशोर रीठे व मनोजकुमार खैरनार उपस्थित होते.C-1 वाघाला एक वाघिन उपलब्ध करून देण्यास समिति अनुकूल असून काही महत्वपूर्ण बाबींवर ही चर्चा झाली आहे.त्यात अभयारण्यातील देवहारी गावाचे पुनर्वसन, अवैध चराई थांबवीने तसेच अभयारण्यातून जाणारा बुलडाणा-खामगांव हा मार्ग पूर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गची व्यवस्था करने हे महत्वाचे मुद्दे असून येत्या 6 महिन्यात काम करण्याचे ठरले आहे. वाघिन आल्यानंतर भविष्यात वाघांची संख्येत वाढ होणार ही गोष्ट लक्षात घेता वाघांसाठी 800 ते 1000 किलोमीटरचे क्षेत्र असणे आवश्यक असून त्या करीता काटेपुर्णा-ज्ञानगंगा-अंबाबारवा व मुक्ताई नगर असा एक सुरक्षित कॉरिडोर करण्याचे मत वाइल्ड लाइफ इंटिट्यूट ऑफ इंडियाचे बिलाल हबीब यांनी व्यक्त केले आहे.

बुलडाणा - 30 जुलै
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अवैधरित्य चराई करणाऱ्या मेंढपाळ यांना विरोध करणाऱ्या 2 वन कर्मचाऱ्यांवर मेंढपाळांनी जीवघेणा हल्ला करत गंभीर जख्मी केले होते या प्रकरणी हिवरखेड पोलीसाने 2 आरोपींना अटक केली आहे.
       बुलडाणा शहरापासुन अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर ज्ञानगंगा अभयारण्य आहे.हे अभयारण्य बुलडाणा, मोताळा,चिखली व खामगांव या 4 तालुक्यात 205 चौरस किलोमीटर वर विस्तारलेला आहे.शनिवारी वनरक्षक रविंद्र मोरे व बिट मदतनीस दिपक कांडलकर हे जंगलात गश्त घालत असतांना त्यांना 2 मेंढपाळ प्रतिबंधित क्षेत्रात मनाई असतांना चराई करतांना दिसून आले.दोन्ही कर्मचाऱ्यांनी चराइस मज्जाव केला असता दोघांवर जंगलात मेंढपाळांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघे वनकर्मचारी गंभीररित्य जख्मी बिट मदतनीसवर कांडलकरवर बुलडाणा येथील एका खाजगी रुगनालायात उपचार सुरु असून वनरक्षक मोरेचा हात फ्रेक्चर झालेला आहे.या प्रकरणी हिवरखेड
पोलीस ठाण्यात अज्ञात 2 मेंढपाळांवर विविध कलमानवय  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसाने यात स्वप्निल विठ्ठल हटकर वय 23 वर्ष व स्वप्निल अशोक लकडे वय 22 वर्ष दोघे रा.नान्द्री ता. खामगांव या हल्लेखोरांना अटक करुण न्यायालय समोर उभे केले असता त्यांची 31 जुलै पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार प्रवीण तळी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआई दिलीप पाटील करीत आहे.

बुलडाणा - 30 जुलै
कामासाठी शेतात गेलेली एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यु झाल्याची घटना आज 30 जुलाई च्या सकाळी 10 वाजेच्या सुमारास भादोला गावाजवळ घडली आहे.
   बुलढाणा तालुक्यात भादोला या गावी आपल्या माहेरी आलेली विवाहित महिला सुरेखा विलास निकम वय 31 वर्ष राहणार वाकोद तालुका जामनेर जिल्हा जळगाव ही आज सकाळी आपले वडील विठ्ठल नामदेव जाधव यांच्या शेतात कामासाठी गेली होती. पिकावर फवारणी करण्यात येत असल्याने सुरेखा पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीत गेली मात्र तोल जाऊन ती विहिरीत पडली बराच वेळ उलटल्यानंतरही सुरेखा परत आली नाही म्हणून विहिरीवर गेल्यावर लक्षात आले कि ती विहिरीत पडलेली आहे. त्याला बाहेर काढण्यात आले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.घटनेची  माहिती बुलडाणा ग्रामीण पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी हजर झाले व पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्गची नोंद करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआई रमेश बंसोड व जनार्दन इंगळे करीत आहे.

बुलडाणा - 29 जुलै
माजी राज्यमंत्री व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत त्यांचा फेसबुक अकाउंट हैक करुण त्यांच्या नावावर पैसे मागून लुटीचा ऑनलाईन फंडा वापरला जात असून याला कुणीही बळी पडू नये असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.
    राजकारण व चळवळीत काम करताना सोशल मीडिया हा नेत्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या एका कार्यकर्त्याने काही वर्षांपूर्वी बुलडाणा येथे फेसबुक वर "रविकांत तुपकर मित्रमंडळ" नावाचे पेज सुरु केले होते, ते काही वर्ष चालू होते, मात्र गत एक ते दीड वर्षापासून त्या फेसबुक अकाऊंट वरून कोणीच कोणाशी संवाद साधत नव्हते. मात्र तरीही ते पेज सुरू होते.
काल 28 जुलैच्या रात्रीपासून त्या फेसबुक अकाउंटवरून दोन गुगल पेचे नंबर देऊन फेसबुक मित्रांना वारंवार मैसेज पाठवून पैशाची मागणी होत असल्याचे देश-विदेशातून सारखे फोन तुपकर यांना येत आहे.कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून रविकांत तुपकर यांनी यासंदर्भात बुलडाणा शहर ठाण्यात जावून रितसर फिर्याद दाखल केली आहे.पोलिसाने या प्रकरणी अज्ञात हैकर विरुद्ध भादवीची कलम 415,416,417,420 तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याची कलम 67 क अन्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर ठाणेदार प्रदीप सालुंखे करीत आहे.कार्यकर्ते व हितचिंतकांना तुपकर यांनी आवाहन केले आहे की,या पेजवरून होणारी पैशाची मागणी हॅकर्सद्वारे होत असून कुणीही ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू नये.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-
 बेलापूर येथील एकाच कुटुंबातील 9 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने बेलापूरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 21 वर पोहचली त्यांना तातडीने संत लुक हाँस्पीटल येथे दाखल केले आहे                   .श्रीरामपूर येथे एका कंपनीत काम करणार्या  बेलापुरातील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल काल प्राप्त झाला असून त्यातील 9 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. त्यामुळे बेलापुरात खळबळ उडाली असून त्या कुटुंबात काही दिवसापूर्वी दु:खद घटना घडली होती. त्यामुळे त्या  कुटुंबाच्या संपर्कात आणखी गावातील व्यक्ती आले असून त्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. देविदास चोखर यांनी केली आहे.
दरम्यान गावामध्ये एका कुटुंबातील 9 जण बाधीत सापडल्याची चर्चा होताच त्यांच्या संपर्कातील अनेक जण चिंताग्रस्त झाले आहे. बेलापूर येथील एका डॉक्टरचाही अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्या डॉक्टरने पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार केल्याने त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅबही तपासणीसाठी दिले होते. त्याचाही अहवाल प्राप्त झाला असून तोही पाँझीटीव्ह आलेला आहे. त्यानुसार त्या डॉक्टरांच्या घरांच्यांचीही  तपासणी करण्यात येणार आहे.गेल्या तीन दिवसापासून बेलापूर गावात सतत रुग्ण वाढत आहे रुग्ण आढळलेला परिसर सील करण्याचा आदेश असताना अंतर कमी जास्त करुन सोयी नुसार परिसर बंद करत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला असुन काही व्यक्तींचे समीती बरोबर वादही झालेले आहे आता गाव बंद ठेवावे असे काहीचे मत असुन काही नागरिकांनी बंदलाच विरोध केलेला आहे तसेच परिसर  बंद करताना  २०० मिटरचा नियम असताना काही जण आपल्या मर्जीप्रमाणे अंतर कमी जास्त करुन परिसर सीलबंद करत आहेत तसेच सीलबंद परिसरातील व्यक्ती बाहेर येवु नये त्या परिसरात असणार्या व्यवसायीकांनी व्यापार व्यवहार कडेकोट बंद ठेवावे असे असतानाही सीलबंद परिसरातील नागरिक रस्त्यावर येतात दुकाने चालु असतात अशीही काहींची तक्रार आहे या संकट काळातही काही जण राजकारण करत असल्याचा आरोपही काहींनी केला आहे

बुलडाणा - 28 जुलै
संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात येत्या 21 ऑगस्ट पर्यंत कडक लॉक डाऊन असल्याने पोलीस बंदोबस्त वाढलेला आहे तरीही काही भुरटे चोर संधीचा सोना करत चोरीच्या घटना करीत असल्याची बाब बुलढाणा शहरातील चर्च समोर उघडकीस आली आहे. येथील सहा दुकाने अज्ञात चोरांनी एकाच रात्री फोडून लाखो रुपयांची चोरी केल्याचे आज 28 जुलै रोजी समोर आले आहे.
      या बाबत प्राप्त माहिती अशी की काल  27 जुलैच्या रात्री बुलडाणा शहरातील चर्च ऑफ नाझरीन समोर नगरपालिकेने बांधून दिलेल्या दुकानां पैकी 3 मोबाइल शॉपी,2 गेरेज व एक पान सेंटर अशा प्रकारे या 6 दुकानांचे छतावरील नट बोल्ट मध्ये फीट केलेले टीन पान्याने उघडून आत प्रवेश करुण अज्ञाताने चोरी केली. हा प्रकार आज सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर बुलडाणा शहर पोलीसाने घटनास्थळी जावून पंचनामा केला असून या प्रकरणी सायंकाळी 5 वाजे पर्यंत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नव्होती.अंदाजे 3 लाख रूपयांची चोरी झाल्याचे बोलले जात आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget