बुलडाणा - 28 जुलै
संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात येत्या 21 ऑगस्ट पर्यंत कडक लॉक डाऊन असल्याने पोलीस बंदोबस्त वाढलेला आहे तरीही काही भुरटे चोर संधीचा सोना करत चोरीच्या घटना करीत असल्याची बाब बुलढाणा शहरातील चर्च समोर उघडकीस आली आहे. येथील सहा दुकाने अज्ञात चोरांनी एकाच रात्री फोडून लाखो रुपयांची चोरी केल्याचे आज 28 जुलै रोजी समोर आले आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की काल 27 जुलैच्या रात्री बुलडाणा शहरातील चर्च ऑफ नाझरीन समोर नगरपालिकेने बांधून दिलेल्या दुकानां पैकी 3 मोबाइल शॉपी,2 गेरेज व एक पान सेंटर अशा प्रकारे या 6 दुकानांचे छतावरील नट बोल्ट मध्ये फीट केलेले टीन पान्याने उघडून आत प्रवेश करुण अज्ञाताने चोरी केली. हा प्रकार आज सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर बुलडाणा शहर पोलीसाने घटनास्थळी जावून पंचनामा केला असून या प्रकरणी सायंकाळी 5 वाजे पर्यंत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नव्होती.अंदाजे 3 लाख रूपयांची चोरी झाल्याचे बोलले जात आहे.
Post a Comment