श्रीरामपूर : संपूर्ण देशात covid-19 या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे,त्यास अनुसरून संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यामध्ये अधिकारी व वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स योग्य त्या सर्व उपाययोजना राबवत आहात म्हणूनच आज श्रीरामपूर तालुक्याची परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत खूपच उत्तम व समाधानकारक आहे.मात्र शहरातील कोणत्याही रुग्णाच्या बाबतीत भेदभाव व्हायला नको,विशिष्ट भागातील रुग्णांना न तपासण्याची भूमिका मानवतेच्या दृष्टीकोनातून योग्य नसून सर्व रुग्णांसोबत सौहार्द्पणे व्यावहार करण्याची मागणी शहरातील मिल्लतनगर भागातील नागरिकांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांचेकडे निवेदनाने केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे कि,मागील आठवड्यात सर्वसाधारण रुग्णांच्या बाबतीत योग्य उपचार किंवा प्राथमिक उपचार देखील न मिळाल्याने व शहरातील काही डॉक्टरांनी सपशेल नकार दिल्याने याच भागातील दोन व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या ही वाईट घटना असून प्रत्येक रुग्णांना किमान प्राथमिक उपचार अथवा योग्य सल्ला दिला गेला पाहिजे.
विशेषतः शहरात मुस्लिम बहुल विभाग असलेला व सर्व परिचित असलेला वार्ड नंबर २ या भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवेच्या बाबतीत अनेक समस्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोणतीही व्यक्ती रुग्ण म्हणून जेव्हा शहरातील कोणत्याही रुग्णालयात वा दवाखान्यात जात असेल तर त्या ठिकाणी संबंधित सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी अथवा डॉक्टरांनी रुग्णांना दिलासा देऊन चर्चा करणे गरजेचे आहे,किमान उच्च रक्तदाब,साखरेचे कमी-जास्त प्रमाण यांसारख्या आजारांवर प्राथमिक उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे मात्र अनेक ठिकाणी असे होताना दिसत नाही.
या भागातील नागरिक स्वयस्फूर्तीने आजाराबद्दलची भीती घालवण्यासाठी घरोघरी भेटी देत आहेत. स्वच्छता व आरोग्याची घेण्याचेही आवाहन करीत आहेत.
यावेळी तसेच व्हाट्सअप च्या माध्यमातून दररोज वेगवेगळे मेसेज आल्याने त्या माध्यमातून covid-19 बद्दल लोकांमध्ये भितीचे वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण होतात.वास्तविक या रोगाबद्दल अधिकची माहिती अर्थात शिक्षण लोकांमध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यासाठी अधिकृत अथवा वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कोणताही मेसेज पाठविला जावू नये असाही आग्रह धरण्यात आला.
शिष्टमंडळात अकिल शेख,शकील बागवान,असलम बिनसाद,इमाम सय्यद,अनिस शेख,गणी पिंजारी,अमीन शेख,आदींचा समावेश होता.
Post a Comment