पारिवारिक विवादातून बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत एका 25 वर्षीय महिला पोलीस कर्मचारी यांनी छत्तीसगढ़ येथील रांची येथे विषप्राशन करुन आत्महत्या केल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, बुलडाणा येथील रहिवासी महिला पोलीस कर्मचारी आरती ज्ञानेश्वर सोनुने यांचा बुलडाणा शहरातील सरस्वती नगर येथे राहणाऱ्या दीपक संजय पसरटे सोबत 2018 मध्ये विवाह झाला होता. दीपक हा आर्मीमध्ये कार्यरत आहे.आंतरजातीय विवाह असल्याने दीपकच्या परिवारातील सदस्य आरतीला मान्य करत नव्हते.त्यामुळे त्यांच्यात आपसी वाद-विवाद व्हायचे, अशातच 2019 ला आरतीने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात पती व इतर सासरची मंडळीविरुद्ध 498 चा गुन्हा नोंदविला होता.पती दीपक कडून आरतीवर दुर्लक्ष केले जात होते.मागील दहा दिवसापूर्वी आरतीने सुट्टी घेऊन थेट रांची गाठले.तिथे आर्मी कॅम्प समोर जाऊन आरतीने आपले पति दिपकला कॉल केले.परंतु दिपकने काही प्रतिसाद दिला नाही. दीपकच्या या स्वभावामुळे आरतीने आर्मी कॅम्प समोर विष प्राशन केले. आरतीला आर्मीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु चौथ्या दिवशी म्हणजे 25 जुलै रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. आरतीच्या पर्समधील सुसाइड नोट सुद्धा रांची पोलिसांच्या हाती लागलेली आहे.आरतीच्या मृत्यूपूर्व बयान व चिठ्ठीत समानता असल्याने रांची येथील पोलिस ठाण्यात पती दीपक विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.आरती यांचे पार्थिव काल 26 जुलै च्या रात्री बुलडाणा येथे पोहोचल्या नंतर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले असुन रांची मध्ये आरोपी पति दीपक अटक असल्याचे समजते.
Post a Comment