बुलडाणा - 29 जुलै
माजी राज्यमंत्री व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत त्यांचा फेसबुक अकाउंट हैक करुण त्यांच्या नावावर पैसे मागून लुटीचा ऑनलाईन फंडा वापरला जात असून याला कुणीही बळी पडू नये असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.
राजकारण व चळवळीत काम करताना सोशल मीडिया हा नेत्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या एका कार्यकर्त्याने काही वर्षांपूर्वी बुलडाणा येथे फेसबुक वर "रविकांत तुपकर मित्रमंडळ" नावाचे पेज सुरु केले होते, ते काही वर्ष चालू होते, मात्र गत एक ते दीड वर्षापासून त्या फेसबुक अकाऊंट वरून कोणीच कोणाशी संवाद साधत नव्हते. मात्र तरीही ते पेज सुरू होते.
काल 28 जुलैच्या रात्रीपासून त्या फेसबुक अकाउंटवरून दोन गुगल पेचे नंबर देऊन फेसबुक मित्रांना वारंवार मैसेज पाठवून पैशाची मागणी होत असल्याचे देश-विदेशातून सारखे फोन तुपकर यांना येत आहे.कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून रविकांत तुपकर यांनी यासंदर्भात बुलडाणा शहर ठाण्यात जावून रितसर फिर्याद दाखल केली आहे.पोलिसाने या प्रकरणी अज्ञात हैकर विरुद्ध भादवीची कलम 415,416,417,420 तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याची कलम 67 क अन्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर ठाणेदार प्रदीप सालुंखे करीत आहे.कार्यकर्ते व हितचिंतकांना तुपकर यांनी आवाहन केले आहे की,या पेजवरून होणारी पैशाची मागणी हॅकर्सद्वारे होत असून कुणीही ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू नये.
Post a Comment