कामासाठी शेतात गेलेली एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यु झाल्याची घटना आज 30 जुलाई च्या सकाळी 10 वाजेच्या सुमारास भादोला गावाजवळ घडली आहे.
बुलढाणा तालुक्यात भादोला या गावी आपल्या माहेरी आलेली विवाहित महिला सुरेखा विलास निकम वय 31 वर्ष राहणार वाकोद तालुका जामनेर जिल्हा जळगाव ही आज सकाळी आपले वडील विठ्ठल नामदेव जाधव यांच्या शेतात कामासाठी गेली होती. पिकावर फवारणी करण्यात येत असल्याने सुरेखा पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीत गेली मात्र तोल जाऊन ती विहिरीत पडली बराच वेळ उलटल्यानंतरही सुरेखा परत आली नाही म्हणून विहिरीवर गेल्यावर लक्षात आले कि ती विहिरीत पडलेली आहे. त्याला बाहेर काढण्यात आले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.घटनेची माहिती बुलडाणा ग्रामीण पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी हजर झाले व पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्गची नोंद करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआई रमेश बंसोड व जनार्दन इंगळे करीत आहे.

Post a Comment