बुलडाणा - 31 जुलै
जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या बोथा गावाजवळील धरणात आज 31 जुलै रोजी एक अस्वल मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली होती.
फक्त ज्ञानगंगा अभयारण्यच नव्हे तर संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अस्वलांचा अधिवास आहे. जिल्ह्यातला वातावरण अस्वलांसाठी पोषक असल्याने इथे त्यांची संख्याही मोठी आहे. मागील काही वर्षात ज्ञानगंगा अभयारण्यला लागून असलेल्या बुलडाणा व चिखली तालुक्यातील काही क्षेत्रात अस्वल व मानवी संघर्षाचे अनेक घटना घडलेल्या आहेत.ज्ञानगंगा अभयारण्यातील अस्वल जंगल सोडून वस्ती वाड्याकडे येत असतात.आज शुक्रवारला सकाळी ज्ञानगंगा अभयारण्यला
लागून असलेल्या बोथा गावाजवळ बुलढाणा-खामगाव मार्गाला लागून असलेले धरणात एक अस्वल बुडालेला दिसून आला.याची माहिती प्रादेशिक वन विभागाला देण्यात आली असता खामगाव रेंजचे आरएफओ के.डी.पडोळ,वनपाल एस.आर. गिरणारे,वनरक्षक के.एच.मोरे तथा अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व पाण्यात बुडालेल्या अस्वलाला धरणातून बाहेर काढण्यात आले. मृत मादी अस्वल 2 ते 3 दिवसापासुन पाण्यात बुडाली असेल असा अंदाज आरएफओ पडोळ यांनी व्यक्त केला आहे.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अवताळे व डॉ.तायडे यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले व नंतर अस्वलाला जाळुन नष्ट करण्यात आले आहे.अस्वलाला चांगले पोहने येते तरीही तो पाण्यात बुड़ुन कसा मरण पावला?या प्रश्नाचा उत्तर पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मिळेल.
Post a Comment