बुलडाणा - 31 जुलै
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा 85 हजार क्विंटल मका 31 जूलै पर्यंत खरेदी करण्याची परवनागी दिली होती त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने दररोज 300 शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचे निर्देश दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होते.दरम्यान मका खरेदीची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने नाफेड अंतर्गत सुरु करण्यात आली त्यामुळे शेतकरी आपली मका घेवून भाडयाचे वाहनाने खरेदी केंद्रावर पोहोचले मात्र मका खरेदीसाठी 31 जुलै शेवटची तारीख दिली असताना देखील 30 जुलैच्या दुपारीच नाफेड खरेदी केंद्राची ऑनलाईन नोंदणीची साईट बंद करण्यात आल्याने शेतकरी हवालदील झाले आहे.मका खरेदीला राज्य शासनाने मुदत वाढ द्यावी व जर शासनाचा मका खरेदीचा उद्दिष्ट पूर्ण झाला असेल तर उद्दिष्ट वाढवून मका खरेदी सुरु करावी अन्यथा राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये मका टाकू असा संतप्त इशारा माजी मंत्री व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य शासनाला दिला आहे.
Post a Comment