Latest Post

बेलापूर  (प्रतिनिधी )- सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बेलापूर पोलीसांनी कडक पावले उचलली असुन विनाकारण  तसेच मास्क न लावता फिरणार्या दोन व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहीती पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी दिली आहे. बेलापूर व परीसरात कोरोनाचा हळूहळू फैलाव सुरु झाला आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे लग्न अंत्यविधी व बाहेर गावहुन येणारे पाहुणे यांचा संपर्क वाढल्याने परिसरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे  लोक विनाकारण मास्क शिवाय गावात फिरत आहेत बेलापूर पोलीसांनी विनाकारण मास्क न लावता दोन जणावर कारवाई केली आहे पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हाटले आहे की रमेश नामदेव होले हा बेलापूर बु!!बेलापूर बायपास येथे एम एच 17 बी एच 57 या मोटार सायकलवर मास्क न लावताच फिरत होता तसेच विशाल पांडूरंग दिवे राहणार दत्त नगर हा हीरो होंडा मोटार सायकल एम एच 17 जे 6627 वर विना मास्क विनाकारण फिरताना आढळून आला पोलीसांनी दोघावरही भारतीय दंड संहिता कलम 188 व 269 नुसार कारवाई केली आहे   बेलापूर पोलीसांनी गावात व परिसरात रात्रीच्या गस्त बरोबरच दिवसाही गस्त सुरु केली आहे काही ठिकाणी विनाकारण फिरणाराला उठबशा तर काहींना दंडूक्याचा प्रसाद मिळत असल्यामुळे सायंकाळी पाच नंतर गावात सामसुम दिसू लागली आहे ग्रामस्थांनी पोलीसांच्या कारवाईचे स्वागत केले असुन कोरोनाचा प्रसार थांबावयाचा असेल तर काही कडक नियम करावेच लागणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे

श्रीरामपूर   (प्रतिनिधी  )- आरोग्य सेवका प्रमाणे स्वस्त धान्य दुकानदाराचा मृत्यू कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे झाल्यास त्यांनाही विमा कवच मिळावे या बाबत आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स फेडरेशनने दाखल याचीकेवर चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई  उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी  शासनाला दिले आहे .   कोरोना योध्दा म्हणून सेवा देताना वैद्यकीय अधीकारी आरोग्य सेवक पोलीस होमगार्ड अंगणवाडी सेविका कर्मचारी  लेखा व कोषागरे अन्न व नागरी पुरवठा इत्यादी विभागातील  कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यास ५० लाख रुपये विमा कवच देण्याचा निर्णय शासनाने मार्च महीन्यात घेतला होता हे विमा कवच राज्यात अन्न धान्य वितरण करणारे स्वस्त धान्य दुकानदार यांना लागू असल्याचे शासनाने अद्याप पर्यत घोषीत केलेले नाही त्यामुळे आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर  बाबुराव ममाणे विजय गुप्ता मुबारक मौलवी नितीन पेंटर यांनी संघटनेच्या वतीने याचीका दाखल केली होती संघटनेच्या वतीने दाखल याचिकेत असे म्हटले होते की ही संघटना राज्यातील ५५ हजार स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रतिनीधीत्व करत असुन कोरोना मुळे शासनाने घोषीत केलेल्या लाँक डाऊनच्या काळात लोकांना अन्न धान्य पुरविण्याचे जबाबदारीचे  काम हे राज्यातील धान्य दुकानदार करत होते  धान्य वाटपाचे काम हे अत्यावश्यक सेवेमध्ये येते धान्य वाटप करत असताना दुकानदाराचा दिवसभरात १०० हुन अधिक कार्डधारकाशी प्रत्यक्ष संपर्क येतो  दुकानदार समुह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचल्याने दुकानदारांच्या जिवीतास धोका वाढला आहे हे काम करत असताना कोरोनाची बाधा झाल्यामुळे काही दुकानदारांना आपला जिव गमवावा लागला आहे कोरोना सकट काळात सेवा देणार्या त्या दुकानदारांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे या बाबत शासनाकडे वेळोवेळी मागणी करुन निवेदन देवुनही काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना विमा सुरक्षा कवच देण्याचे निर्देश देण्यात यावेत असेही याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती  नितीन जामदार व न्यायमूर्ती अभय अहुजा यांचे समोर सुनावाणी झाली त्या वेळी सरकारी वकीलांनी हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्याने अंतिम निर्णय घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली त्या वेळी चार आठवड्याच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती  अभय आहुजा यांनी देत यांचिका निकाली काढली आँल  महाराष्ट्र  फेअर प्राईज शाँपकिपर्स  फेडरेशनच्या वतीने प्रसिध्द विधीज्ञअँड सुधाकर आव्हाड व अँड चेतन नागरे यांनी काम पाहीले तर शासनाच्या वतीने अँड रुपाली शिंदे यांनी काम पाहीले.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी )-शिवसेना नेते सदा कराड हे बिबट्याच्या हल्ल्यात गंभिर जखमी झाले असुन नशिबाने साथ दिल्यामुळे ते थोडक्यात बाचले          शिवसेनेचे नेते सदा कराड हे सायंकाळी मोटारसायकलवरुन अशोकनगर येथे आपल्या  घरी जाण्यासाठी  निघाले असता बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली ते स्वतः मोटारसायकल चालवत होते त्यांच्या हाताला मोठी जखम झाली आहे  नशिब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात वाचले   त्यांच्या हाताला मोठी जखम झाली आहे झडप घालुन बिबट्या पसार झाला त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले

अहमदनगर  (प्रतिनिधी  )- शेवगाव तालुक्यातील दुकानदारावर द्वेषभावनेतुन केलेली कारवाई मागे घ्यावी या करीता करण्यात येणारे उपोषण तूर्त स्थगीत केले असल्याचे संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे .या बाबत सविस्तर असे की तीन महीन्यापूर्वी लाँक डाऊन असताना  शेवगाव तालुक्यातील कुठल्याही कार्डधाराकांची तक्रार नसताना हेतूपूरस्पर काही दुकानाची तपासणी करण्यात आली दुकान तपासणीत साठा रजिस्टर प्रमाणे साठा आढळून आला असतानाही काही कारण नसताना दहा दुकानदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला त्यातील काही दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर पाच दुकानावर कडक कारवाई करुन दुकाने सील करण्यात आली व काहीही कारण नसताना ती दुकाने इतरत्र जोडून देण्यात आली १२ नोव्हेंबर च्या शासकीय आदेशा प्रमाणे दुकानदारांना म्हणणे मांडण्याची संधी देणे आवश्यक असताना या दुकानदारांना संधी न देता कारवाई करण्यात आली तसेच एकाच प्रकारच्या गुन्ह्याकरीता एकाच अधीकार्याकडून वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या प्रकारची दंडनीय कारवाई समर्थनीय नसल्याचा शासन निर्णय असताना सर्व नियम धाब्यावर बसवुन पाच दुकानावर सुडबुध्दीने व द्वेषभावनेतुन करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात यावी अन्यथा दिनांक २३ जुलै पासुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसण्याचा ईशारा देण्यात आला होता परंतु शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज पासुन सुरु करण्यात येणारे उपोषण स्थगीत करण्यात येत असल्याचे कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे प्रकाश गजभिय मनिषा साळवे ओमप्रकाश कवडे यांनी कळविले आहे.

श्रीरामपूर- नुकताच इयत्ता १२वी कला शाखेचा निकाल जाहीर झाला असून येथील रावबहादूर नारायणराव बोरावके (आर.बी.एन.बी.) कला महाविद्यालयात अरबाज अकबर आदमाने (खाटीक) हा ७९.००७ गुण संपादन करुन महाविद्यालयात तीसरा आला आहे,
अरबाज अकबर आदमाने (खाटीक) हा स्व. मोहम्मद अली खाजाभाई आदमाने (खाटीक) यांचा नातू असून त्यास प्राचार्य के.एच.शिंदे (सर), वर्गशिक्षक पवार (सर) यांचे मार्गदर्शन लाभले आहे,त्याने संपादन केलेल्या या यशाबद्दल खाटीक समाज सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

श्रीरामपूर   (प्रतिनिधी  )-  पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत माहे एप्रिल  मे व जुन या तीन महीन्यासाठी मोफत वितरीत करण्यात आलेल्या तांदुळाचे प्रति क्विंटल दिडशे रुपये प्रमाणे मार्जिन धान्य दुकानदारांना लवकरच मिळणार असुन जिल्ह्यातील १८८२ दुकानदारांना मार्जिन पोटी जवळपास साडेचार कोटी रुपये मिळणार असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे. देशात आलेल्या कोरोनाचा गोर गरीबांना  मुकाबला करता यावा या करीता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असलेल्या कार्डधारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ  मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता जिल्ह्यातील १८८२ धान्य दुकाना मार्फत ७२५५८ अंत्योदय शिधापत्रीका धारक व ४६५९४० प्राधान्य कुटुंब शिधापत्रीका धारकांना प्रति व्यक्ती पाच किलो तांदळाचे वाटप करण्यात आले जिल्ह्यातील १८८२ धान्य दुकानदारा मार्फत अंत्योदय कार्डधारकांना ५२६५. ५१मेट्रीक टन व प्राधान्य  कुटुंब लाभार्थी कार्डधारकांना ३११९५ .४३ मेट्रीक टन असे एकुण ३६४६१.९४ मेट्रीक टन तांदळाचे वाटप करण्यात आले होते कोरोनांच्या जिवघेण्या संकट काळात जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी जिव मुठीत धरुन शासकीय नियमांचे पालन करुन कार्डधारकाना मोफत तांदळाचे वाटप केले हे करत असाताना काही दुकानदारांना कोरोनाची लागण झाली त्यात त्यांचा मृत्यू  झाला  त्यामुळे राज्य फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर  सचिव बाबुराव ममाणे गणपतराव डोळसे विजय गुप्ता मुबारक मौलवी नितीन पेंटर व नगर जिल्हा  संघटनेने मोफत तांदूळ वाटपाचे दिडशे रुपये प्रमाणे मार्जिन देण्यात यावे धान्य दुकानदारांना विमा संरक्षक मिळावे त्यांची आरोग्य तपासणी केली जावी  अशी मागणी केली होती त्या नुसार राज्यातील दुकानदारांना मार्जिन पोटी १ अब्ज,३६ कोटी ४२ लाख ५१ हजार ११०रुपये मिळणार आहे त्यात अहमदनगर जिल्ह्यातील १८८२ धान्य वितरण करणार्या धान्य दुकानदारांना ५ कोटी ४६ लाख ९२ हजार ९०९ रुपये मार्जिन पोटी मिळणार आसल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे दुकानदारांना मोफत तांदळाचे मार्जिन  मिळवुन दिल्याबद्दल राज्य फेडरेशनचे अध्यक्ष गजानन  बाबर बाबुराव ममाणे मुबारक मौलवी विजय गुप्ता नितीन पेंटर गणपत डोळसे निवृत्ती कापसे देविदास देसाई मिनाताई कळकुंबे रज्जाक पठाण आदिंचे सुरेश उभेदळ सुरेश कोकाटे विश्वासराव जाधव विजय दिघे गजानन खाडे गणपत भांगरे ज्ञानेश्वर वहाडणे बाबा कराड मोहीते कैलास बोरावके विजय गायकवाड रावसाहेब भगत खताळ बजरंग दरंदले चन्द्रंकात झुरंगे मणीक जाधव नरेंद्र खरात आदिंनी अभिनंदन केले आहे.

बुलडाणा - 22 जुलै
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुर शहरा जवळ एका गोदामात खामगांव अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकली. मात्र गुटखा व रेशन धान्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलीसाने का फरार केले?या सर्वसामान्य जनतेच्या मनात पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या गौडबंगालची स्वतंत्र चौकशी लावली तर कोणाचे हात "ओले-ओले" झाले हे स्पष्ट होणार आहे.
        कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरु असतांना केवळ राज्यातच नव्हे तर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या बुलडाणा जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा सर्वत्र नाकेबंदी असतांना वाहना द्वारे संपूर्ण जिल्हाभरात पोहोचवले जात असल्याचा आरोप होत आहे. या लॉकडाउनचा फायदा उचलत गुटखा माफियांनी जास्त दराने विक्री करुन बेहिशोब कमाई केल्याची चर्चा आहे.मलकापुर जवळ 14 जुलैला एका गोदामावर खामगांव एएसपी यांच्या पथकाने धाड टाकल्या नंतर लाखोंचा प्रतिबंधित गुटखा व रेशनचा धान्य जप्त केला व त्या ठीकाणी तस्कर अतिकुर रहमान हजर असतांना फक्त गुटखा व रेशन धान्य जप्त करण्यात आले. य माला सोबत त्या तस्कराला ही ताब्यात का घेण्यात आले नाही?
त्याला कोणी व का सोडून दिले?काही तडजोड करुन त्याला घटनास्थळावरुन फरार करण्यात आले का?या सर्व प्रश्नांचे उत्तर सद्या अनुत्तरित आहे.रेशन धान्यची काळाबाजारी व प्रतिबंधित गुटखा विक्री अश्या दोन प्रकरणात आरोपी तस्कर "अतीक" विरुद्ध मलकापुर शहर ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात तर आले मात्र आरोपी आहे तरी कुठे?त्याला अटक करण्यात आली का? या बाबीवर कर्तव्यदक्ष अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी स्वता: लक्ष देऊन चौकशी करावी व आपल्या कर्तव्यता जाणूनबुजुन कसूर करून एका तस्कराला फरार करणाऱ्यांना समोर आणले पाहिजे, अशीही चर्चा उघडपणे होत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget