Latest Post

बेलापूर  (प्रतिनिधी  )-बेलापूर नगर रस्त्यावर असणार्या दारुच्या दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी ८५ हजार रुपयांचा माल लंपास केला असुन बेलापूर  पोलीसांनी तातडीने डाँग स्काँडला पाचारण केले                                बेलापूर नगर रस्त्यालगत के जी गोरे यांचे देशी दारुचे दुकान आहे सकाळी नेहमीप्रमाणे ते दुकान उघडण्यास गेले असता दुकानाचे कुलुप उघडे असल्याचे दिसले त्यांनी तातडीने बेलापूर पोलीसांना घटनेची खबर दिली बेलापूर पोलीसांनी तातडीने नगर येथील डाँग स्काँडचे पोलीस उपनिरीक्षक एस बी बावळे आर आर विटेकर पी एन डाके वाहक एस आर रोकडे यांना पाचारण केले  हे पथक  डाँग मिस्कासह बेलापूरात पोहोचले  चोरट्यांनी कुलुप तोडताना वापरलेली काही हत्यारे तेथेच पडलेली होती त्या हत्याराच्या वासावरुन  मिस्का  डाँग  काही अंतरावर गेला व परीसरातच घुटमळला या वरुन चोरटे वहानातुन आले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे गोरे यांच्या म्हणण्या नुसार भिंगरी दारुचे २६ बाँक्स तसेच एक बिअरचा बाँक्स असा ऐंशी हजार रुपयाचा माल व गल्ल्यातील पाच हजार रुपयाची चिल्लर असा ८५ हजार रुपयांचा माल चोरीस गेला आहे   बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे राशिनकर निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ हे पुढील  करत आहे.

श्रीरामपूर - रात्रीच्या वेळी दुचाकीवर जाणाऱ्यांना आडवून मारहाण केली जात,यानंतर त्यांची लुट करणारी सराईत गुन्हेगारांना मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात आले आहे. ही विशेष कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. २८ जानेवारीला रात्री हरेगाव (ता. श्रीरामपूर) येथून मोटार सायकलवरुन निमगाव खैरी मार्गे श्रीरामपूरकडे जात असतांना निमगाव खैरी गावचे शिवारात आले . यानंतर पाठीमागून दोन मोटार सायकलवरुन आलेल्या चार अनोळखींनी मोटार सायकल थांबवून, हाताने मारहाण करीत एटीएम कार्ड , चेक बुक, पॅनकार्ड, मतदानकार्ड, विवो कंपनीचा मोबाईल, मोटार सायकलची चावी व रोख रक्कम ४५०० रु. बळजबरीने काढून घेतल्याची फिर्याद अंकुश अशोक करंडे ( रा.गोंधवणी, ता . श्रीरामपुर जि.अहमनगर) यांनी श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. या दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना हा गुन्हा गोविंद गुंजाळ ( रा . उक्कलगाव ता.श्रीरामपुर) याने व त्याचे साथीदाराने मिळून केला असल्याची माहिती गोपनीय स्था.गु.शाचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पो.नि.पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकाने आरोपीचा शोध घेऊन आरोपी गोविंद बाळासाहेब गुंजाळ ( वय ३२ रा . उक्कलगाव ता.श्रीरामपुर) यास ताब्यात घेतले. त्यास विश्वसात घेऊन सदर गुन्हयाबाबत विचारपूस केली. त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार सुदाम सरकाळे, करण गायकवाड व आणखी एक साथीदार असे चौघांनी मिळून केला असल्याची कबुली दिली.

आरोपी सुदाम सरकाळे व करण गायकवाड यांचे टावठिकाणा बाबत व गुन्हयातील चोरलेल्या मुद्देमाला बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचे साथीदार हे गढी, ता. गेवराई जि. बीड येथे आहे.चोरलेला मुद्देमाल त्यांचेकडे असल्याचे सांगितल्याने सदर माहितीच्या अधारे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गढी, ता. गेवराई जि. बीड येथे जाऊन आरोपींचा शोध घेऊन आरोपी सुधीर उर्फ सुदाम कडुबाळ सरकाळे (वय २३ रा . शहरटाकळी, ता . शेवगाव), करण नवनाथ गायकवाड (वय १८ , रा . निपाणीवडगाव, ता. श्रीरामपूर ह.रा. पढेगाव ता.श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्हयातील चोरीस गेलेला ८ हजार रु . किमतीचा वीवो कंपनीचा मोबाईल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली ७५ हजार रु . किमतीची विना क्रमांकाची टीव्हीएस कंपनीची अपाची मॉडेल मोटार सायकल असा एकूण ८३ हजार रु . किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच चौथ्या साथीदाराचा शोध घेतला पंरतु तो मिळुन आलेला नाही. आरोपींसह जप्त मुद्देमालासह श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला. पुढील तपास श्रीरामपुर तालुका पोलीस हे करीत आहेत. दरम्यान, जप्त करण्यात आलेली अपाची मोटार सायकल ही वैजापूर जि. औरंगाबाद येथून चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. सदर मोटार सायकल चोरीबाबत वैजापूर पो . स्टे . गु . र . नंबर । ४१३ / २०१ ९ भा . द . वि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे . वरील नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचे विरुध्द यापूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत .
आरोपी गोविंद बाळासाहेब गुंजाळ (वय ३२, रा . उक्कलगाव ता.श्रीरामपुर) याचे विरुध्द दाखल गुन्हे

१) श्रीरामपुर शहर पो.स्टे 1६११ / २०१९ भा.द.वि.कलम ३७९, २) श्रीरामपुर शहर पो.स्टे 1५९५ / २०१ ९ भा.द.वि.कलम ३७९, ३) श्रीरामपुर शहर पो.स्टे 1४०/२०१७ भा.द.वि.कलम ३७९ ,३४, ४) श्रीरामपुर शहर पो.स्टे । ४१/२०१७ भा.द.वि.कलम ३७९ , ४११,३४ , ५) श्रीरामपुर शहर पो.स्टे 1४३/२०१७ भा.द.वि.कलम ३७९, ६) श्रीरामपुर शहर पो.स्टे 1४८/२०१७ भा.द.वि.कलम ३७९ , ३४, ७)श्रीरामपुर शहर पो.स्टे 1 ४२/२०१७ भा.द.वि.कलम ३७९ , ४११,३४, ८) श्रीरामपुर शहर पो.स्टे 1३९ / २०१७ भा.द.वि.कलम ३७९

९) तोफखाना पो.स्टे 1५१६/२०१७ भा.द.वि.कलम ३९९,४०२ (फरार), १०) राहुरी पो.स्टे 1 २८/२०१७ भा.द.वि.कलम ३७९, ३४ , ११) राहुरी पो.स्टे 1४६४/२०१७ भा.द.वि.कलम ३७९, ३४, १२) राहाता पो.स्टे 1४८ / २०१ ९ भा.द.वि.कलम ३९४,३४ (फरार), १३ ) सोनई पो.स्टे 1३०/२०२० भा.द.वि.कलम ३९ २,३४१,३४ आर्म अॅ .४ / २५

आरोपी सुधीर उर्फ सुदाम कडुबाळ सरकाळे (वय २३, रा . शहरटाकळी , ता . शेवगाव).
१ ) कोतवाली पो.स्टे 1३३६/२०१७ भा.द.वि.कलम ३७९, ३४, २) कोतवाली पो.स्टे 1३६२/२०१७ भा.द.वि.कलम ३७९, ३४, ३) कोतवाली पो.स्टे 1 ३६१/२०१७,भा.द.वि.कलम३७९,३४,४) तोफखाना पो.स्टे 1२ ९ ३ / २०१७ भा.द.वि.कलम ३७९, ३४, ५) तोफखाना पो.स्टे 1 २ ९ ५ / २०१७'भा.द.वि.कलम ३७९,३४, ६) कोतवाली पो.स्टे T३६४ / २०१७ भा.द.वि.कलम ३७ ९ , ३४ ७ ) कोतवाली पो.स्टे 1३१०/२०१७ भा.द.वि.कलम ३७९ , ३४, ८) श्रीरामपुर शहर पो.स्टे ॥३५४ / २०१ ९ भा.द.वि.कलम ३ ९ ५,३ ९ ४,१२० ( ब ) सह आर्म अँँक्ट कलम ४/२५ , ९ ) सोनई पो.स्टे 1३०/२०२०भा.द.वि.कलम ३९२,३४१,३४ अँँक्ट.कलम ४/२५
आरोपी करण नवनाथ गायकवाड (वय१८, रा . निपाणीवडगाव, ता.श्रीरामपूर ह.रा. पढेगाव ता.श्रीरामपूर)
१ ) सोनई पो.स्टे 1 ३०/२०२० भा.द.वि.कलम ३ ९ २,३४१,३४ अॅ.कलम ४/२५ नुसार गुन्हे दाखल आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील व उप विभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपूर विभागाचे राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि संदिप पाटील, पोहेकॉ मनोहर गोसावी , पोना अण्णा पवार , रविंद्र कर्डीले , दिपक शिंदे , पोकॉ प्रकाश वाघ , मयुर गायकवाड , सागर ससाणे व चालक पोकॉ सचिन कोळेकर आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव. मे महिना आणि अगदी जूनच्या सुरूवातीच्या काळात हे शहर  कोरोनाचा हॉट स्पॉट म्हणून ओळखलं जात होतं. आज मालेगावात अत्यंत कमी संख्येने कोरोना पेशंट सापडत आहेत याचं श्रेय तिथं काम केलेल्या अनेकांना जातं. त्यातंलच एक नाव म्हणजे सुनील कडासने. ‘बस नाम ही काफी है’ ही त्यांची ओळख.
मालेगावातल्या कोरोना परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शासनाने लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची तिथं समन्वयक म्हणून नियुक्ती केली. कडासने यांचा दांडगा जनसंपर्क व सर्वसामान्यांना भावेल अशा पद्धतीने थेट संवाद साधण्याचे कौशल्य हे त्यांचे विशेष. हे विशेषच त्यांना इथं कामी आले. आणि त्यातूनच शहराची परिस्थिती आता पूर्वपदावर येऊ लागली आहे.
मालेगाव मध्ये दिवसागणिक वाढणारा रुग्णाचा आकडा आणि मृतांची संख्या, कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी मालेगावच्या रुग्णांना उपचारासाठी येऊ देण्यास नाशिक व धुळ्यातील जनतेचा सक्त विरोध, नीट उपचार मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये व्यवस्थेबद्दल खदखदणारा असंतोष अशी चिंताजनक मालेगावात निर्माण झालेली होती. ज्यांच्याकडून सहकार्य अपेक्षित असे मालेगाव मधील काही नागरीक प्रशासकीय नियमावलीकडे सपशेल पाठ फिरवत होते. कोरोना हा काही आजार आहे हे मानायलाच एक मोठा वर्ग प्रारंभी राजी होत नव्हता. झोपडपट्टयांचे शहर अशी ओळख असलेल्या मालेगावात आरोग्य विषयक जागृतीचा अभाव असल्याने कोरोनाशी दोन हात करणे प्रशासनापुढे मोठे आव्हान होते.
त्यानुसार परस्परांबद्दलच्या आपुलकीचा खुबीने वापर करत कडासने हे गेली पंचवीस दिवस कोरोना विरुद्ध लढण्यासाठी शहरवासीयांना साद घालत आहेत. त्याला सकारात्मक व चांगला प्रतिसाद मिळत असून सद्यस्थितीत करोनावर नियंत्रण मिळविण्यात येत असलेले यश, लोकांमध्ये रुजत चाललेली जागृकता व त्यांच्या मानसिकतेत होणारा सकारात्मक बदल यात कडासने यांची एकंदरीत भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे चित्र आहे.
पोलीस नागरीकांचे मित्र आहेत हे वास्तव कडासने यांच्या कार्यशैलीतून ठळकपणे दिसून येते.  याआधी चार वर्षे मालेगावला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असतांना मालेगाव मधील नागरीकांच्या मनात त्यांनी विश्वाास निर्माण केला होता. त्यामुळेच गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत झाली होती. मुस्लिमबहुल मालेगावाची गरज ओळखून तेव्हा त्यांनी उर्दू व अरबी या भाषा शिकून घेतल्या. शांतता, कायदा व सुव्यवस्था तसंच सार्वजनिक हितासाठी त्यांनी कुराणामधील आयतांचा दाखला लोकांना दिला. त्यामुळे मुस्लिम समाजात आपला माणूस अशी एक प्रतिमा त्यांची निर्माण झाली. त्यांची ही शैली प्रशासनाला मदतीची ठरली. करोना आजाराच्या जनजागृतीसाठी ते आता जेव्हा शहरातील गल्लीबोळातून फिरत असतात त्यावेळी आबालवृद्धांकडून त्यांच्यावर केली जाणारी फुलांची उधळण हे त्याचंच द्योतक. लोकांना धाकदपटशा दाखवण्यापेक्षा त्यांच्या खऱ्या अडचणी समजून घेत आणि त्यांना वास्तवाची जाणीव करुन देऊन कार्यप्रणाली अंमलात आणली तर ती अधिक लाभदायक व परिणामकारक ठरते असं कडासने म्हणतात. त्यानुसार त्यांनी लोकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शहरात एकीकडे करोनाने थैमान मांडले असतांना अनेक रुग्णालये बंद होती. अन्य आजार असलेल्या रुग्णांची हेळसांड सुरू होती. ही हेळसांड थांबविण्यासाठी त्यांनी आपल्या पातळीवर प्रयत्न सुरू केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच महापालिकेतर्फे चौदा युनानी डॉक्टरांची नियुक्ती झाली. खाजगी डॉक्टरांना संरक्षण साधने पुरवण्यात आल्यानंतर शहरातील सर्व खाजगी रुग्णालये सुरू झाली. टाळेबंदीमुळे यंत्रमाग बंद असल्याने मजुरांना रोजीरोटीचा प्रश्न सतावत असल्याचे बघून यंत्रमाग कारखाने सुरू करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार शासनाची परवानगी प्राप्त झाल्यावर पहिल्याच दिवशी शहरात सहा हजार यंत्रमाग सुरू होऊ शकले. आजच्या घडीला प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सुमारे सव्वा लाख यंत्रमाग सुरू झाले असून लवकरच सर्व कारखाने सुरू होऊन शहर पूर्वपदावर येण्याची अपेक्षा आहे. अत्यंत तुटपुंज्या मानधनावर घरोघरी जाऊन रुग्ण शोध मोहिमेचे काम करणाऱ्या आशा वर्कर महिलांच्या प्रती त्यांनी अशीच संवेदना प्रकट केली. दरमहा अवघ्या दोन हजार रुपये मानधनावर  डॉक्टरांप्रमाणेच दिवसभर जोखीम उचलणाऱ्या या महिलांचे मानधन वाढवून देण्याची सूचना त्यांनी केली. त्यानुसार महापालिकेने हजार रुपयांची वाढ केली. महसूल खात्यातर्फे धान्य पाकिटांची मदतही त्यांनी या महिलांना मिळवून दिली.
#नवीउमेद #कोरोना
Charushila Kulkarni


सिल्लोड,  तालुक्यातील अजिंठा येथील 75 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा गुरुवारी उपचार दरम्यान मृत्यू झाला असून तालुक्यात कोरोनाने चौथा बळी घेतला आहे. शुक्रवारी पुन्हा अजिंठ्यात एक रुग्ण मिळून आला असून तालुक्यात बाधितांची संख्या वाढून 26 झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रेखा भंडारी यांनी दिली.
       अजिंठ्यात बुधवारी मुलगा, आई व एक वयोवृध्द असे तिघे कोरोना बाधित निघाले होते. यातील 75 वर्षीय वृध्दाचा गुरुवारी उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्याच्या एक दिवस अगोदर बुधवारी शहरातील जमालशाह कॉलनीतील 47 वर्षीय इसमाचा औरंगाबाद येथे उपचार मृत्यू झाला होता. सलग दोन दिवसात तालुक्यात कोरोनाने दोन बळी घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी अजिंठा येथील 15 तर डोंगरगाव येथील 20 असे ऐकून 35 जणांचे स्वब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल आज शनिवारी प्राप्त होणार आहे, असे डॉ. भंडारी यांनी सांगितले.
      दरम्यान माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, नायब तहसीलदार संजय सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांनी अजिंठा येथील रुग्णांच्या घराचा परिसर सील करीत संपर्कात आलेल्यांचे स्वब घेतले. दोन दिवसात चार रुग्ण मिळून आल्याने गावात दोन दिवसांपासून कडकडित बंद पाळण्यात आला असून विनाकारण फिरणाऱ्या 38 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे, अशी माहिती किरण आहेर यांनी दिली.

बुलडाणा - 4 जून
बुलडाणा तालुक्यातील दहीद बु.या गावात 3 जुलैच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास दुर्मिळ खवल्या मांजर आढळून आल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. वेगळा दिसणाऱ्या या जिवाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती तर काही लोक या खवल्या मांजरला पाहुन भयभित झाले होते.गावातील देवकर यांनी या बाबतची सूचना फोनवर बुलडाणा वनविभागाला दिली.माहिती मिळताच बुलडाणा वनविभागाची रेस्क्यू टीमचे सदस्य संदीप मडावी व समाधान मान्टे तात्काळ दहीद मध्ये रात्री 8:30 वाजता दाखल झाले
.गावातील शाळे समोर मुख्य मार्गावर खवल्या मांजर पाहणारे मोठ्या संख्येत लोक एकत्रीत जमलेले होते. काही स्थानिक लोकांच्या मदतीने या रेस्क्यू टीमने खवल्या मांजरला पकडून बुलडाणा येथील विभागीय वन कार्यालायात आनले व नंतर बुलडाणा उपवनसंरक्षक संजय माळी यांच्या आदेशाने व
सहायक संरक्षक रंजीत गायकवाड व आरएफओ गणेश टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री 10 वाजेच्या सुमारास या रेस्क्यू टीमने खवल्या मांजरला बुलडाणा शहरापासुन 12 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरूप सोडून दिले आहे.
       खवल्या मांजर हे अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 च्या कायद्यातंर्गत या प्राण्याला शेड्युल-1 मधील दर्जा आहे. त्याला कायदाने संरक्षण दिलेले आहे. खवल्या मांजर हा दुर्मीळ वन्यजीव असल्याने याची तस्करी सुध्दा करण्यात येते. या खवल्या मांजरची किंमत लाखो रुपयात असते.

बुलडाणा - 3 जुलै
बुलडाणा-धाड मार्गावर हतेडी जवळ भरधाव 2 दूचाकीच्या भिषण धडकेत 2 जण ठार  झाल्याची घटना आज 3 जुलै रोजी घडली आहे.
      बुलडाणा येथील गणेश नगर भागात राहणारे 36 वर्षीय अनिल तेजराव डुकरे हे बुलडाणा तालुक्यातील हतेडीच्या विद्युत उपकेंद्रवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते.आज सकाळी ते ड्यूटीवर दूचाकीने उपकेंद्राकडे जात असतांना हतेडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने  त्यांना जोरदार धडक दिली. या झालेल्या अपघातात  अनिल डुकरे व समोरचा दुचाकी चालक गणेश बर्डे रा.तांदुळवाडी हे दोघे जण गंभीर जख्मी झाले.त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता अनिल डुकरे यांना डॉक्टरने मृत घोषित केले तर गणेश बर्डे याला जास्त मार लागल्याने पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले होते. मात्र तो अत्यावस्थ असल्याने त्याला सायंकाळी अमरावती येथे रेफर करण्यात आले असता त्याची ही प्राणज्योत मालवली असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. बुलडाणा ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय रामपुरे करीत आहे.

संगमनेर (शहर प्रतिनिधी)- पोलिसांनी पाठलाग केल्याने व वाळूने भरलेल्या वाहनाला कट मारल्याने देवगड येथे अपघात झाला. या अपघातास या दोघा पोलिसांसोबत पिकअपचा मालक व त्यांचे दोन साथीदार जबाबदार आहेत. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. अपघातावेळी मदत करण्याऐवजी या दोघा पोलिसांसह वाळूतस्करांनी पळ काढला. हे पाचही जण माझ्या पतीच्या व इतर दोघांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याने या सर्वांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मयत वाहन चालकाच्या पत्नीने तालुका पोलिसांकडे केली आहे.संगमनेर तालुक्यातील देवगड फाट्याजवळ वाळूने भरलेली पिकअप 30 फूट खोल खड्ड्यात पडल्याने तिघांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण आता वादग्रस्त होत चालले आहे. पोलिसांनी पाठलाग केल्यामुळेच या वाहनाचा अपघात झाला होता. अशी चर्चा होत असताना मयत वाहनचालकाची पत्नी बुशरा परवेज सय्यद व मामा जमशीद आय्युब शेख यांनी तालुका पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन थेट पोलिसांचे नाव घेऊन आरोप केला आहे.वाहनचालकाची पत्नी बुशरा परवेज सय्यद हिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 28 जून रोजी रात्री 2 वाजता मोईन फारुख पठाण, भैय्यू उर्फ इस्माईल शेख, आवेज नासिर शेख (सर्व रा. नाईकवाडीपुरा, संगमनेर) हे आमच्या संगमनेर खुर्द येथील घरी आले. पतीस झोपेतून उठून वाळूने भरलेली गाडी घेऊन जाण्यास सांगितले. पतीने नकार दिला असता दमदाटी व शिवीगाळ करून गाडी घेऊन जाण्यास सांगितले.आपला पती वाळू भरलेली पिकअप घेऊन जात असताना दोन पोलीसांनी त्यांच्या वाहनातून वाळूच्या पिकअपचा जोर्वे नाका ते देवगड मंदिरापर्यंत पाठलाग केला. ते सफेद रंगाच्या झायलो गाडीमधून पाठलाग करत होते. (या गाडीचा क्रमांकही या तक्रार अर्जात दिला आहे.) पोलीस पाठलाग करत असल्यामुळे पतीने आपल्या वाहनाचा वेग वाढविला. पोलिसांनी पिकअपला कट मारल्यामुळे वाळूने भरलेली पिकअप 30 फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात माझा पती व दोन मजुरांचा मृत्यू झाला.अपघातात जखमी असलेल्या अक्षय माळी या मजुराने पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती केली. मात्र अपघात पाहून त्यांनी पोबारा केला. काही वेळानंतर मोईम पठाण व अन्य त्याचे साथीदारही घटनास्थळी आले. मात्र त्यांनीही मदत न करता पळ काढला. या अपघातास पोलीस व संगमनेरचे वाळूतस्कर जबाबदार असल्याने या सर्वांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी बुशरा या महिलेने केली आहे.पोलिसांनी पाठलाग केल्यामुळे हा अपघात झाल्याचा गंभीर आरोप अपघातातील मयत वाहनचालकाच्या पत्नीने केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बाहेरील पोलीस मध्यरात्री संगमनेरात कशासाठी आले होते? अवैध वाळू उपशाबाबत कारवाईचा अधिकार त्यांना कुणी दिला? असा प्रश्न विचारला जात आहे. हे पोलीस ज्या झायलो वाहनातून पाठलाग करत होते ते वाहन नेमके कुणाचे होते? वाहन मालकाने या पोलिसांना वाहन का दिले? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यास अनेक गंभीर बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.अपघातातील मयत वाहनचालकाची पत्नी व काही ग्रामस्थ तालुका पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आले होते. त्यांनी तक्रार अर्ज दिल्यानंतर आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी केली. संतप्त ग्रामस्थ तब्बल तासभर पोलीस ठाण्याच्या आवारात थांबले. मात्र एकाही अधिकार्‍याने त्यांची भेट घेतली नाही. यानंतर या ग्रामस्थांनी नायब तहसीलदारांकडे निवेदन दिले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget