बुलडाणा - 4 जून
बुलडाणा तालुक्यातील दहीद बु.या गावात 3 जुलैच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास दुर्मिळ खवल्या मांजर आढळून आल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. वेगळा दिसणाऱ्या या जिवाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती तर काही लोक या खवल्या मांजरला पाहुन भयभित झाले होते.गावातील देवकर यांनी या बाबतची सूचना फोनवर बुलडाणा वनविभागाला दिली.माहिती मिळताच बुलडाणा वनविभागाची रेस्क्यू टीमचे सदस्य संदीप मडावी व समाधान मान्टे तात्काळ दहीद मध्ये रात्री 8:30 वाजता दाखल झाले
.गावातील शाळे समोर मुख्य मार्गावर खवल्या मांजर पाहणारे मोठ्या संख्येत लोक एकत्रीत जमलेले होते. काही स्थानिक लोकांच्या मदतीने या रेस्क्यू टीमने खवल्या मांजरला पकडून बुलडाणा येथील विभागीय वन कार्यालायात आनले व नंतर बुलडाणा उपवनसंरक्षक संजय माळी यांच्या आदेशाने व
सहायक संरक्षक रंजीत गायकवाड व आरएफओ गणेश टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री 10 वाजेच्या सुमारास या रेस्क्यू टीमने खवल्या मांजरला बुलडाणा शहरापासुन 12 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरूप सोडून दिले आहे.
खवल्या मांजर हे अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 च्या कायद्यातंर्गत या प्राण्याला शेड्युल-1 मधील दर्जा आहे. त्याला कायदाने संरक्षण दिलेले आहे. खवल्या मांजर हा दुर्मीळ वन्यजीव असल्याने याची तस्करी सुध्दा करण्यात येते. या खवल्या मांजरची किंमत लाखो रुपयात असते.
Post a Comment