सिल्लोड, तालुक्यातील अजिंठा येथील 75 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा गुरुवारी उपचार दरम्यान मृत्यू झाला असून तालुक्यात कोरोनाने चौथा बळी घेतला आहे. शुक्रवारी पुन्हा अजिंठ्यात एक रुग्ण मिळून आला असून तालुक्यात बाधितांची संख्या वाढून 26 झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रेखा भंडारी यांनी दिली.
अजिंठ्यात बुधवारी मुलगा, आई व एक वयोवृध्द असे तिघे कोरोना बाधित निघाले होते. यातील 75 वर्षीय वृध्दाचा गुरुवारी उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्याच्या एक दिवस अगोदर बुधवारी शहरातील जमालशाह कॉलनीतील 47 वर्षीय इसमाचा औरंगाबाद येथे उपचार मृत्यू झाला होता. सलग दोन दिवसात तालुक्यात कोरोनाने दोन बळी घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी अजिंठा येथील 15 तर डोंगरगाव येथील 20 असे ऐकून 35 जणांचे स्वब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल आज शनिवारी प्राप्त होणार आहे, असे डॉ. भंडारी यांनी सांगितले.
दरम्यान माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, नायब तहसीलदार संजय सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांनी अजिंठा येथील रुग्णांच्या घराचा परिसर सील करीत संपर्कात आलेल्यांचे स्वब घेतले. दोन दिवसात चार रुग्ण मिळून आल्याने गावात दोन दिवसांपासून कडकडित बंद पाळण्यात आला असून विनाकारण फिरणाऱ्या 38 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे, अशी माहिती किरण आहेर यांनी दिली.
Post a Comment