Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी)  आतापर्यंत करोनापासून सुरक्षीत राहिलेल्या श्रीरामपूर शहरात करोनाचा शिरकाव झाला आहे. पुणे येथे उपचारासाठी गेलेल्या शहरातील एक वृध्दाचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरात राहणार्‍या या 75 वर्षीय वृध्दाचा 12 जून रोजी अपघात झाला होता. त्याला तातडीने श्रीरामपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवसानंतर (दि.14 जून रोजी) त्याला उपचारासाठी पुणे येथे जाण्याचा सल्ला श्रीरामपुरातील डॉक्टरांनी दिला.त्यामुळे हा वृध्द 16 जून रोजी पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेला असता त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्या अगोदरत्या त्याची करोना चाचणी करण्यात आली. त्यात त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.श्रीरामपुरातील वृध्द करोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. यात प्रशासनही खडबडून जागे झाले असून त्यांनी तातडीने त्यांच्या घरातील दोघे व श्रीरामपुरातील खासगी रुग्णालयातील चौघे असे सहा जणांना स्त्राव तपासणीसाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या वृध्दाचा करोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यामुळे करोनापासून सुरक्षीत राहिलेल्या श्रीरामपुर शहरात करोनाने आता शिरकाव केला आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

कोपरगाव ( प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यात पूर्व भागातील धोत्रे, तळेगाव मळे व खोपडीसह अनेक गावांमध्ये सोमवारी झालेल्या धो-धो झालेल्या पावसाने जोरदार तडाखा दिला.सुमारे 200 घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य, वाहून गेल्याने अनेकजण बेघर झाले आहेत. शेतात पाणी असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. चाळींमधील कांदाही भिजला आहे.धोत्रे येथील 200 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेकजण बेघर झाले. मंगळवारी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी कर्मचार्‍यांच्या चार टीम करून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.येवला तालुक्यातील उंदीरवाडी व इतर गावातील छोटे छोटे बंधारे पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहत होते. जास्तीचे पाणी कोपरगाव तालुक्यातील गावांमध्ये घुसल्याने शेकडो घरे पाण्यात गेली. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तसेच कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धोत्रे, तळेगाव मळे व खोपडी परिसरात झालेल्या पावसाने शेतात पाणी साचून शेताचे अक्षरशः तळे होऊन बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी, मुग आदी पेरणी झालेल्या जवळपास 80 ते 90 टक्के पिकांचे नुकसान झाले असून त्याचबरोबर कांद्याच्या चाळीत पाणी शिरून साठविलेल्या कांदे पावसाच्या पाण्याने भिजल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच फळबागाही कोलमडून पडल्या.धोत्रे येथील आदिवासी वसाहत व दलित वस्ती शहा वसाहतीमधील अनेक घरात पाणी शिरले. अन्न धान्य कपडे महत्वाची कागदपत्रे ओले झाले होते. शेतात नुकतीच पेरणी केलेले बियाणे या पावसात वाहून गेले.ग्रामस्थांचे दैनंदिन वापराचे साहित्य देखील वाहून गेल्यामुळे नागरिकांचे हाल झाले.मंगळवारी सकाळी 8 वाजेपासूनच तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या पथकाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्षात पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान आ. आशुतोष काळे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पंचायत समिती सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी पाहणी करून मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथकास घटनास्थळी पाठवून पावसाच्या पाण्यात अडकलेल्यांना रात्री उशिरापर्यंत मदत केली, नुकसानग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली.

बुलडाणा - 16 जून
मृग नक्षत्राच्या अखेरीस बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्यामुळे,काळ्या मातीत तिफन चालू लागल्या आहेत.बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा शिवारात एका कार्यकर्त्याच्या शेतात जाऊन माजी राज्यमंत्री व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज 16 जून रोजी हाती तिफन धरून “पेरते व्हा”चाच संदेश दिला आहे.
शेतकऱ्याच्या पिककर्जासाठी आक्रमक भुमिका घेऊन काल विविध बँक अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर, रविकांत तुपकर यांनी आज मंगळवार 16 जून रोजी थेट शेतात जाऊन बैलाचे कासरे हाती धरून तिफन तर चालविलीच अन बियांची ओटी पोटाला बांधून सकाळपासून दुपारपर्यंत 2 एकरावर सोयाबीनची पेरणी केली व कार्यकर्त्यांसह शेतातच न्याहारी केली.दरम्यान, पेरणीसाठी डोंगरखंडाळा येथे गेलेल्या रविकांत तुपकर यांनी तिथल्या बँकेतही जावून परिसरातील शेतकऱ्यांच्या पिककर्जाचा आढावा घेतला,अनेक छोट्या छोट्या त्रुट्यांमुळे पिककर्जात येत असलेल्या अडचणी लक्षात आल्यानंतर, त्या सोडविण्या संबंधी त्यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.शेतकऱ्यांना जर पिककर्जासाठी त्रास दिला तर बँक अधिकाऱ्यांना चोपून काढू असा इशारा द्यायलाही तुपकर विसरले नाही.

अहमदनगर: गदीर्बाबत प्रशासनाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी असतानाही नगरमध्ये राजकीय नेते आणि कार्यकर्ते नेहमीप्रमाणे बर्थडे सेलिब्रेशन करून सोशल डिस्टंसिंगला तिलांजली देत आहेत.भाजपकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढलेले विनय वाखुरे यांनी 13 जून रोजी शहरातील प्रोफेसर चौक परिसरात गर्दीत आपला वाढदिवस साजरा केल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात विनय वाखुरे यांच्यासह अजय रासकर, संदीप चौधरी, महेश थोरात, मयुर कुलकर्णी व निखिल मोयल व इतर 30 ते 35 जणांविरोधात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक अजय गव्हाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई आहे. वाखुरे यांनी मात्र कुठलीही परवानगी न घेता प्रोफेसर चौकातील अबेदिन पेंट्स येथे एकत्र जमून वाढदिवस साजरा करत शासकीय आदेशाचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मंगेश खरमाळे हे पुढील तपास करत आहेत.

बुलडाणा - 14 जून
मागील काही दिवसापासुन जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाणी गुलाबी झाले आहे.अनेक लोक हे पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहे,वन्यजीव विभागाची परवानगी शिवाय सरोवरातील पाणी घेणे कायद्याने गुन्हा असून कोणीही पाणी घेऊ नये असे आव्हान मनोजकुमार खैरनार वन्यजीव विभाग अकोलाचे डीएफओ यांनी केले आहे.
      हजारों वर्षा पूर्वी उल्कापात मुळे लोणार सरोवर अस्तित्वात आली असून यातील पाणी क्षारयुक्त आहे.सरोवर परिसरात अनेक जूनी मंदिर व जंगल आहे. हे जंगल वन्यजीव व अनेक प्रकारचे पक्षयांचे अधिवास क्षेत्र असल्याने शासनाने या संपूर्ण सरोवर परिसराला अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.लोणार सरोवर संरक्षित क्षेत्र असल्याने वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी अकोला वन्यजीव विभागकडे आहे.मागील काही दिवसापासुन या सरोवरातील पाण्याचा रंग बदलून गुलाबी झालेला आहे.कोरोना मुळे सुरु असलेल्या लॉकडाउन मध्ये ढील दिल्याने अनेक पर्यटक सरोवराचा बदललेला रूप पाहण्यासाठी येत आहे. कोणी ही लोणार अभयारण्यामध्ये विना परवानगी प्रवेश करू नये,असे करणे गुन्हा आहे.तसेच सध्या या सरोवरातील गुलाबी पाणी मिळविण्यासाठी  अनेक लोक प्रयत्न करीत आहे, या पाण्याचे सॅम्पल घेण्यासाठी अकोला वन्यजीव विभागाची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे,कोणीही विनापरवानगी हे पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये तसे करणे कायद्याने गुन्हा व तसेच धोकादायक आहे.सद्या या परिसरात बिबट आपल्या पिल्लांसह वावरत असून त्यामुळे तो हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.या अभयारण्यातील सर्व परिसरात ई-सर्विलन्स कॅमेरे लावण्यात आले आहे व या कॅमेरा द्वारे लक्ष ठेवले जाते आहे.तरी लोणार सरोवरातील पाणी व अभयारण्याचे संरक्षण करण्यास स्थानिक लोकांनी सहकार्य करावे व प्रशासनाचे निर्देशांचे पालन करावे,असे आव्हान अकोला वन्यजीव विभागचे डीएफओ मनोजकुमार खैरनार यांनी केले आहे.

बुलडाणा - 14 जून
मागील अडीच वर्षा पासून बुलढाणा-अजिंठा या राष्ट्रीय माहामार्गाचे काम सुरु असून जालना जिल्ह्यातील धावडा व वाढोणा परिसरात गुरूवारच्या रात्री व पुन्हा शुक्रवारच्या रात्री धुवाधार पाऊस पडल्याने या महामार्गावरील जालना जिल्ह्यातील धावडा जवळची एक
 व वाढोणा येथील दोन नद्यांना पूर आल्याने  3 पर्यायी पुल वाहून गेल्याने 3 दिवसापासून बुलडाणा-अजिंठा या मार्गावरील वाहतूक बंद असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागत आहे.कारण मराठवाड्यातील अजिंठा,शिवना,धावडा परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचा भाजीपाला दररोज याच मार्गाने अकोला,अमरावती व नागपुर पर्यंत जात होता.
      विदर्भ-मराठवाडा व खांदेशला जोडणारा बुलढाणा-अजिंठा हा एक महत्वपूर्ण मार्ग आहे.या
राष्ट्रीय महामार्ग क्र.753 ई चे सीमेंट कॉन्क्रीटचे काम गेल्या दोन ते अडिच वर्षापासून संथ गतिने सुरु आहे.इस्पायरो कंपनीने या रस्त्यावरील अनेक दिवसापासुन जुने पूल तोडून नवे पूल बांधण्याचे काम हाती घेतले व वाहतूक सुरु ठेवण्यासाठी पाइप टाकून पर्यायी पुल तय्यार केले मात्र ठेकेदाराच्या कासवगतीच्या कामामुळे पुलाचे काम अर्धवट असून पावसाळा सुरु झाला.जालना जिल्ह्यातील धावडा जवळ एक व वाढोना जवळ 2 अशे 3 पुल 11 व 12 जून रोजी झालेल्या जोरदार पावसाने नदीत आलेल्या पुरात वाहून गेल्याने बुलढाणा-अजिंठा राष्ट्रीय महामार्गची वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने एन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना बियाणे खते खरेदीसाठी व शेतात नेण्यासाठी अडचण निर्माण झाली असून तसेच या परिसरातील भाजीपाला विदर्भातील बाजार पेठेत जात नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे.संबंधित ठेकेदाराने पर्यायी पुलांचे मजबुतीकरण करून त्वरित रस्ता सुरू करावे,अशी मागणी होत आहे.

बुलडाणा - 14 जून
करोनाच्या संकटामुळे संपुर्ण भारतातील अभयारण्ये बंद असतांना,काल मेहकर वनपरिक्षेत्रातील अकोला वन्यजीव विभागातील कर्मचारी गस्त करीत असतांना अवैध मार्गाने सरोवर परिसरात घुसखोरी करून तिथे मद्यपान करतांना तिघांना अटक करण्यात आली.
      या संदर्भात अधिक माहिती देताना अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी सांगितले की,लोणार अभयारण्य संरक्षित क्षेत्र आहे.या अभयारण्यात जगप्रसिद्ध लोणार सरोवर असून त्याचे व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी अकोला वन्यजीव विभागकडे आहे.करोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे.तसेच गेल्या काही दिवसांपासून या सरोवरातील पाणी गुलाबी रंगाचे झाल्यामुळे या भागात कोणी विना परवानगी येवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त असतांना, दिनांक 13 जुन रोजी सरोवरात गस्ती दरम्यान वासुदेव तुळशीराम सुरडकर रा.अवरा, योगेश वसंतराव सोनाग्रे रा.अटाळी, सोपान राजाराम थोरात रा. अटाळी हे 3 जन झाडांमध्ये लपून मद्यपान करतांना आढळले. यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई वन पाल नप्ते,वनरक्षक माने,शिंदे व सरकटे यांनी केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget