करोनाच्या संकटामुळे संपुर्ण भारतातील अभयारण्ये बंद असतांना,काल मेहकर वनपरिक्षेत्रातील अकोला वन्यजीव विभागातील कर्मचारी गस्त करीत असतांना अवैध मार्गाने सरोवर परिसरात घुसखोरी करून तिथे मद्यपान करतांना तिघांना अटक करण्यात आली.
या संदर्भात अधिक माहिती देताना अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी सांगितले की,लोणार अभयारण्य संरक्षित क्षेत्र आहे.या अभयारण्यात जगप्रसिद्ध लोणार सरोवर असून त्याचे व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी अकोला वन्यजीव विभागकडे आहे.करोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे.तसेच गेल्या काही दिवसांपासून या सरोवरातील पाणी गुलाबी रंगाचे झाल्यामुळे या भागात कोणी विना परवानगी येवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त असतांना, दिनांक 13 जुन रोजी सरोवरात गस्ती दरम्यान वासुदेव तुळशीराम सुरडकर रा.अवरा, योगेश वसंतराव सोनाग्रे रा.अटाळी, सोपान राजाराम थोरात रा. अटाळी हे 3 जन झाडांमध्ये लपून मद्यपान करतांना आढळले. यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई वन पाल नप्ते,वनरक्षक माने,शिंदे व सरकटे यांनी केली आहे.

Post a Comment