मागील अडीच वर्षा पासून बुलढाणा-अजिंठा या राष्ट्रीय माहामार्गाचे काम सुरु असून जालना जिल्ह्यातील धावडा व वाढोणा परिसरात गुरूवारच्या रात्री व पुन्हा शुक्रवारच्या रात्री धुवाधार पाऊस पडल्याने या महामार्गावरील जालना जिल्ह्यातील धावडा जवळची एक
व वाढोणा येथील दोन नद्यांना पूर आल्याने 3 पर्यायी पुल वाहून गेल्याने 3 दिवसापासून बुलडाणा-अजिंठा या मार्गावरील वाहतूक बंद असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागत आहे.कारण मराठवाड्यातील अजिंठा,शिवना,धावडा परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचा भाजीपाला दररोज याच मार्गाने अकोला,अमरावती व नागपुर पर्यंत जात होता.
विदर्भ-मराठवाडा व खांदेशला जोडणारा बुलढाणा-अजिंठा हा एक महत्वपूर्ण मार्ग आहे.या
राष्ट्रीय महामार्ग क्र.753 ई चे सीमेंट कॉन्क्रीटचे काम गेल्या दोन ते अडिच वर्षापासून संथ गतिने सुरु आहे.इस्पायरो कंपनीने या रस्त्यावरील अनेक दिवसापासुन जुने पूल तोडून नवे पूल बांधण्याचे काम हाती घेतले व वाहतूक सुरु ठेवण्यासाठी पाइप टाकून पर्यायी पुल तय्यार केले मात्र ठेकेदाराच्या कासवगतीच्या कामामुळे पुलाचे काम अर्धवट असून पावसाळा सुरु झाला.जालना जिल्ह्यातील धावडा जवळ एक व वाढोना जवळ 2 अशे 3 पुल 11 व 12 जून रोजी झालेल्या जोरदार पावसाने नदीत आलेल्या पुरात वाहून गेल्याने बुलढाणा-अजिंठा राष्ट्रीय महामार्गची वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने एन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना बियाणे खते खरेदीसाठी व शेतात नेण्यासाठी अडचण निर्माण झाली असून तसेच या परिसरातील भाजीपाला विदर्भातील बाजार पेठेत जात नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे.संबंधित ठेकेदाराने पर्यायी पुलांचे मजबुतीकरण करून त्वरित रस्ता सुरू करावे,अशी मागणी होत आहे.
Post a Comment