बुलडाणा - 14 जून
मागील काही दिवसापासुन जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाणी गुलाबी झाले आहे.अनेक लोक हे पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहे,वन्यजीव विभागाची परवानगी शिवाय सरोवरातील पाणी घेणे कायद्याने गुन्हा असून कोणीही पाणी घेऊ नये असे आव्हान मनोजकुमार खैरनार वन्यजीव विभाग अकोलाचे डीएफओ यांनी केले आहे.
हजारों वर्षा पूर्वी उल्कापात मुळे लोणार सरोवर अस्तित्वात आली असून यातील पाणी क्षारयुक्त आहे.सरोवर परिसरात अनेक जूनी मंदिर व जंगल आहे. हे जंगल वन्यजीव व अनेक प्रकारचे पक्षयांचे अधिवास क्षेत्र असल्याने शासनाने या संपूर्ण सरोवर परिसराला अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.लोणार सरोवर संरक्षित क्षेत्र असल्याने वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी अकोला वन्यजीव विभागकडे आहे.मागील काही दिवसापासुन या सरोवरातील पाण्याचा रंग बदलून गुलाबी झालेला आहे.कोरोना मुळे सुरु असलेल्या लॉकडाउन मध्ये ढील दिल्याने अनेक पर्यटक सरोवराचा बदललेला रूप पाहण्यासाठी येत आहे. कोणी ही लोणार अभयारण्यामध्ये विना परवानगी प्रवेश करू नये,असे करणे गुन्हा आहे.तसेच सध्या या सरोवरातील गुलाबी पाणी मिळविण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करीत आहे, या पाण्याचे सॅम्पल घेण्यासाठी अकोला वन्यजीव विभागाची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे,कोणीही विनापरवानगी हे पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये तसे करणे कायद्याने गुन्हा व तसेच धोकादायक आहे.सद्या या परिसरात बिबट आपल्या पिल्लांसह वावरत असून त्यामुळे तो हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.या अभयारण्यातील सर्व परिसरात ई-सर्विलन्स कॅमेरे लावण्यात आले आहे व या कॅमेरा द्वारे लक्ष ठेवले जाते आहे.तरी लोणार सरोवरातील पाणी व अभयारण्याचे संरक्षण करण्यास स्थानिक लोकांनी सहकार्य करावे व प्रशासनाचे निर्देशांचे पालन करावे,असे आव्हान अकोला वन्यजीव विभागचे डीएफओ मनोजकुमार खैरनार यांनी केले आहे.

Post a Comment