Latest Post

बुलडाणा - 12 जून
रात्री झालेल्या पहील्याच जोरदार पावसाने नदी-नाले वाहु लागले आहे.बुलढाणा-धाड मार्गाचे काम सुरु असल्याने कोलवड जवळ पैनगंगा नदीवर पर्यायी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते परंतु पहील्याच पावासाने नदीला आलेल्या पूरामुळे सदर पर्यायी पुल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
   विदर्भाला मराठवाड्याशी जोडणारा बुलडाणा-धाड हा प्रमुख मार्ग आहे.सद्या या मार्गाचे काम सार्वजिनक आंधकाम विभागा कडून "हेम" या योजने अंतर्गत जिजामाता रोड निर्मिति व पालसिद्ध कंस्ट्रक्शन करीत आहे.ग्राम कोलवड जवळून पैनगंगा नदी वाहते.या नदीवरचा जुना पुल तोडून नवीन पुलाचे निर्माण कार्य सुरु असून पर्यायी पुलावरुन वाहतूक वळविण्यात आली होती.11 जूनच्या रात्री बुलडाणा तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडल्याने पैनगंगा नदी दुथड़ी वाहु लागल्याने पर्यायी पुल सकाळी 6 वाजेच्या दरम्यान वाहून गेला. त्यामूळे अनेक वाहने अडकुन पडली होती. पाण्याच्या टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने वाहून गेलेल्या पूलावरन ट्रॅक्टर टाकण्याचा धाडसी प्रयत्न केला होता मात्र सुदैवाने ट्रॅक्टर नदीत कोसळता कोसळता वाचला. सद्या या मार्गावारील वाहतूक बंद असून वाहने इतर मार्गाने जात आहे.

बुलडाणा - 12 जून
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या देखरेख खाली बुलडाणा ते देऊळघाट या 7 किलोमीटर मार्गाचे काम मागील काही दिवसापासुन जोरात सुरु आहे.बुलडाणा-अजिंठा या सीमेंट कॉन्क्रीट महामार्गाचे काम दोन वर्षापासून सुरु असून सदर मार्ग दोन भागात विभागलेला आहे.प्रथम बुलडाणा ते देऊळघाट या 7 किलोमीटर मार्गाचे काम डांबरीकरनचे आहे तर पुढे देऊळघाट ते अजिंठा हे जवळपास 40 किलोमीटर चा मार्ग सीमेंट कॉन्क्रीटचा आहे.अनेक अडचणी मुळे या कामात दिरनगाई झाली असून
आता मागील एक महिन्यापासुन बुलडाणा ते देऊळघाट मार्गाचे काम जोमात सुरु आहे.मार्गाचे दोन्ही साइड खोदुन मुरुमाने भरण्यात येत आहे तसेच आयुर्वेद महाविद्यालय जवळचे घाट माथा रुंदीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरु आहे.या 7 किलोमीटरच्या मार्गावरील जुने पुल पाडून नवीन पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे.खोदकामा मुळे धुळीने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.सदर माहामार्गाचा काम लवकर होने अपेक्षित आहे.

बुलडाणा - 12 जून
कोरोना विरूद्धच्या युद्धात सर्वात मोठे योगदान देत असलेल्या पोलिस प्रशासनातील अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी राज्यात कोरोना संसर्गीत होवून विविध हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार घेत आहेत.संसर्गित पोलिसांना वेळीच चांगला उपचार मिळावे या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र पोलिस प्रशासनाने आरोग्य विभागाच्या समन्वयातून रिक्त पोलिस इमारतींमध्ये कोरोना केअर सेंटर उभारण्याचे ठरविले आहे.बुलडाणा जिल्ह्यात 2 ठीकाणी सीसीसी उभारण्यासाठी एसपी डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी 
बुलडाण्यातील स्व.दीपक जोग भवन आणि खामगांव येथील पोलिस कल्याण निधी डॉरमेटरी हॉल अशा दोन ठिकाण निश्चित केले आहे त्यापैकी खामगांव येथील कोरोना केअर सेंटरचे उदघाटन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 4 जून रोजी करण्यात आले आहे.बुलडाणा येथील स्व.दीपक जोग भवनचे दुरुस्तीचे काम सुरु आहे लवकरच येथे औषधी व उपचारासाठी लागणारे इतर साहित्य येणार आहे.

बुलढाणा - 12 जून
बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबारवा  अभयारण्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र मध्ये गुरुवारी एका चीडलेल्या अस्वलाने जंगलात दोघा आदिवास इसमांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना उघडकीस आली.घटनास्थळाच्या लगतच अस्वलाच्या 2 लहान पिल्लांना कुणीतरी कुर्‍हाडीने मारून ठार केल्याने अस्वलाने चिडून जावून आपल्या पिल्ल्यांचा बदला या दोघे व्यक्तिन्ना ठार करून घेतल्याची चर्चा परिसरात रंगु लागली आहे.
      बुलढाणा जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट अन्तर्गतच्या अंबाबारवा अभयारण्य मधील सोनाळा वनपरिक्षेत्रच्या दक्षिण  आलेवाडी बीट मधील खडकमाणी शिवारामध्ये गुरुवारी 11 जून रोजी सकाळी अशोक मोतीराम गवते वय
52 वर्ष व माना बंडू गवते वय 42 वर्षे रा.निमखेडी हे दोघे जन गेले असता त्यांच्यावर या गाभा क्षेत्रात एका अस्वलाने हल्ला केला.यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.अस्वलाने एका व्यक्तीचा पूर्ण चेहरा छिन्न- विच्छिन्न केलेला होता. यामुळे सदर अस्वल हा चीडलेल्या असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळाचा 15 ते 20 फुटाच्या अंतरावरच अस्वलाचे जवळपास आठ महिन्याचे दोन पिल्लयांना कुणीतरी कुर्‍हाडीने वार करून ठार केल्याचे दिसून आले.आपल्या पिल्लयांच्या मृत्युने मादा अस्वलाने या दोघांना ठार करून आपल्या पिल्लयांचा बदला घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या पिल्लयांना कोणी व का मारले असेल हे सद्या स्पष्ट नाही. याप्रकरणी अकोट वन्य जीव विभागाच्या चमू ने घटनास्थळी पोहचून पंचनामा करून वन गुन्हा दाखल केला आहे.या परिसरातील नागरिकांना अस्वला पासून सतर्क राहण्याची सूचना वन्यजीव विभागाकडून देण्यात आली आहे.या प्रकरणी सोनाळा ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

बुलडाणा - 12 जून
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याचा प्रसार, प्रचार व  शहर सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी बुलडाणा शहरातील त्रिशरण चौकात गेल्या 3 ते 4 महिन्यापासून बसविण्यात आलेल्या बिबटच्या पुतळ्याचे अनावरण लॉकडाउनमूळे लांबणीवर पडले आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय समोर स्टेट बँक चौकातील अस्वलाच्या पुतळ्याचे काम रखडले आहे.
      बुलडाणा शहरापासून 12 किलोमीटरवर ज्ञानगंगा अभयारण्य आहे.ज्ञानगंगा नदीच्या उगमस्थान लगतच्या 206 चौरस किलोमीटरच्या वन क्षेत्राला 9 मे 1997 रोजी राज्य शासनाने वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देत  "ज्ञानगंगा अभयारण्य" असे त्याचे नामकरण केले.अस्वलासाठी प्रसिद्ध असल्याने येथे विदेशी पर्यटकांची रेलचेल असते.जिल्हा मुख्यालयी बुलडाणा शहरात येणाऱ्या लोकां पर्यंत अभयारण्याचा प्रसार, प्रचारासाठी व शहरातील सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी  वन्यजीव विभागाने जिल्हा वार्षीक योजनेतून जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये खर्ची घालून शहरात 2 ठिकाणी बिबट व अस्वल यांचे विलोभनीय पुतळे बसविण्यात येत आहे.वन्यजीव कार्यालय जवळ त्रिशरण चौकात बिबट्याचा टूमदार ऐट असलेला पुतळा रंगरंगोटी करुन अनावरणाच्या प्रतिक्षेत आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय समोर उभारण्यात येणारे अस्वलाच्या पुतळ्याच्या कामाला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी रस्त्याला अडथळा निर्माण होईल असे कारण पुढे करत सदर अस्वलाच्या पुतळ्याचा काम थांबवून दिला आहे.असे असले तरी, त्रिशरण चौकात बनविलेल्या बिबट्याच्या पूतळ्याचे अनावरण कधी होणार असा प्रश्न वन्यप्रेमींना पडला आहे.झाकुन ठेवलेल्या या बिबट्याला लवकर बाहेर काढावे अर्थात त्या पुतळ्याचे अनावरण करावे असा सूर उमटू लागला आहे.

बुलडाणा - 12 जून
नखांनी खडकाळ कठीण भागास घट्ट धरणाऱ्या व किल्ल्यांवर, उंच भूस्तरावर चढाईसाठी उपयोग करुन घेतल्याचा इतिहास असणाऱ्या एका घोरपडीला मा.न्यायाधिश यांच्या शासकीय निवासस्थानातून आज वनविभागाच्या रेस्क्यूटीमने  सुरक्षित पकडून तिला ज्ञानगंगा अभयारण्यात सोडून दिले.
       अनेक लोक घोरपड या सरपटणाऱ्या वन्य जिवाची शिकार करून त्याचे मांस खातात.हा जीव शेड्यूल 1 मध्ये येत असल्याने वनविभाग या जीवाच्या सुरक्षेसाठी अग्रेसर असते . 9 जून रोजी दुपारी बुलडाणा येथील संगम चौक जवळ असलेल्या मा.न्यायधिश यांच्या शासकीय निवासस्थानी घोरपड असल्याची माहिती बुलडाणा वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांना मिळाली. त्यांनी बुलडाणा वन विभागाच्या रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाठविले. दरम्यान घोरपडीला रेस्क्यू टीमचे सदस्य संदीप मडावी व देवीदास वाघ यांनी  निवासस्थानातून सुखरूप पकडून विभागीय वन कार्यालायात आणले. संध्याकाळी डीएफओ संजय माळी व एसीएफ रंजीत गायकवाड यांच्या आदेशाने घोरपडीला व काही सापांना बुलढाणा शहरा पासून 12 किलोमीटर लांब असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात सोडून दिले.या वेळी काही प्राणी मित्र ही त्यांच्या सोबत होते.

बुलडाणा - 12 जून-दोन वर्षे नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावलेल्या हिम्मतबाज पोलिस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आंतरिक सेवा सुरक्षा पदकाने सन्मानित करण्यात येते. जे पोलिस अधिकारी गडचिरोली, गोंदीया, चंद्रपूर आणि भंडारा या नक्षलग्रस्त चार जिल्हयांमध्ये दोन वर्षे कार्यकाळ घालवतात, त्यांना या पदकासाठी निवडण्यात येते. अधिकार्‍यांच्या निवडीचे अधिकारी राज्याचे पोलिस महासंचालकांना दिलेले आहेत. 10 जून रोजी राज्याचे महासंचालक एस.के. जैस्वाल यांनी अशा 1172 जणांची यादी निवडली आहे, ज्यांना हे पदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. एसपी पासून ते पोलिस कर्मचार्‍यांपर्यंतची नावे या यादीत समाविष्ट आहेत. यात 3 जिल्हा पोलिस अधीक्षक , 3 अप्पर पोलिस अधीक्षक तर 18 डिवायएसपीचा समावेश आहेत. बुलडाणा एसपी डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांनी गोंदीया या नक्षलग्रस्त भागात काम केलेले आहे. तर अप्पर पोलिस अधीक्षक हेमराज राजपूत यांनी चंद्रपूर येथे कर्तव्य बजावले आहे तर बुलढाणा डीवायएसपी रमेश बरकते यांनी गोंदीया जिल्ह्यात डॉ.भुजबळ यांच्यासोबत काम केलेले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget