नखांनी खडकाळ कठीण भागास घट्ट धरणाऱ्या व किल्ल्यांवर, उंच भूस्तरावर चढाईसाठी उपयोग करुन घेतल्याचा इतिहास असणाऱ्या एका घोरपडीला मा.न्यायाधिश यांच्या शासकीय निवासस्थानातून आज वनविभागाच्या रेस्क्यूटीमने सुरक्षित पकडून तिला ज्ञानगंगा अभयारण्यात सोडून दिले.
अनेक लोक घोरपड या सरपटणाऱ्या वन्य जिवाची शिकार करून त्याचे मांस खातात.हा जीव शेड्यूल 1 मध्ये येत असल्याने वनविभाग या जीवाच्या सुरक्षेसाठी अग्रेसर असते . 9 जून रोजी दुपारी बुलडाणा येथील संगम चौक जवळ असलेल्या मा.न्यायधिश यांच्या शासकीय निवासस्थानी घोरपड असल्याची माहिती बुलडाणा वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांना मिळाली. त्यांनी बुलडाणा वन विभागाच्या रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाठविले. दरम्यान घोरपडीला रेस्क्यू टीमचे सदस्य संदीप मडावी व देवीदास वाघ यांनी निवासस्थानातून सुखरूप पकडून विभागीय वन कार्यालायात आणले. संध्याकाळी डीएफओ संजय माळी व एसीएफ रंजीत गायकवाड यांच्या आदेशाने घोरपडीला व काही सापांना बुलढाणा शहरा पासून 12 किलोमीटर लांब असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात सोडून दिले.या वेळी काही प्राणी मित्र ही त्यांच्या सोबत होते.

Post a Comment