बुलडाणा - 12 जून-दोन वर्षे नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावलेल्या हिम्मतबाज पोलिस अधिकार्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आंतरिक सेवा सुरक्षा पदकाने सन्मानित करण्यात येते. जे पोलिस अधिकारी गडचिरोली, गोंदीया, चंद्रपूर आणि भंडारा या नक्षलग्रस्त चार जिल्हयांमध्ये दोन वर्षे कार्यकाळ घालवतात, त्यांना या पदकासाठी निवडण्यात येते. अधिकार्यांच्या निवडीचे अधिकारी राज्याचे पोलिस महासंचालकांना दिलेले आहेत. 10 जून रोजी राज्याचे महासंचालक एस.के. जैस्वाल यांनी अशा 1172 जणांची यादी निवडली आहे, ज्यांना हे पदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. एसपी पासून ते पोलिस कर्मचार्यांपर्यंतची नावे या यादीत समाविष्ट आहेत. यात 3 जिल्हा पोलिस अधीक्षक , 3 अप्पर पोलिस अधीक्षक तर 18 डिवायएसपीचा समावेश आहेत. बुलडाणा एसपी डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांनी गोंदीया या नक्षलग्रस्त भागात काम केलेले आहे. तर अप्पर पोलिस अधीक्षक हेमराज राजपूत यांनी चंद्रपूर येथे कर्तव्य बजावले आहे तर बुलढाणा डीवायएसपी रमेश बरकते यांनी गोंदीया जिल्ह्यात डॉ.भुजबळ यांच्यासोबत काम केलेले आहे.
Post a Comment