बुलडाणा - 10 जून
बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट एका गोठयात वन विभागाने अवैधरित्य ठेवलेले सागवानचे लाकुड पकडले आहे.या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैधरित्य झाडे तोडून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.बुलडाणा तालुक्यात अजिंठा पर्वत रांग असून मोठ्या प्रमाणात जंलातून वृक्षतोड मुळे आज जंगल नामशेष होत आहे.आज 10 जून रोजी बुलडाणा वन परिक्षेत्र अंतर्गतच्या ग्राम देऊळघाट जवळ उमाळा रोडवरील एका गोठयात अवैध रित्य कापलेला सागवान असल्याची माहिती वन विभागला मिळाली असता उपवन संरक्षक संजय माळी,सहायक वन संरक्षक रणजीत गायकवाड व वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन रक्षक शीला खरात, वनसेवक के.एन.चौहान यांनी इतर वन मजूरांच्या सोबत सदर ठीकाणी दुपारी जावून माहितीची खात्री करुण धाड टाकली असता सदर ठीकाणी सागवानचे गोल व चौकोन असे एकूण 13 नग किंमत 23 हजार 269 रुपयेचा माल मिळून आला.या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वनपाल राहुल चौहान यांच्या नेतृत्वात वनरक्षक शीला खरात आहे.
Post a Comment