बुलडाणा - 12 जून
रात्री झालेल्या पहील्याच जोरदार पावसाने नदी-नाले वाहु लागले आहे.बुलढाणा-धाड मार्गाचे काम सुरु असल्याने कोलवड जवळ पैनगंगा नदीवर पर्यायी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते परंतु पहील्याच पावासाने नदीला आलेल्या पूरामुळे सदर पर्यायी पुल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
विदर्भाला मराठवाड्याशी जोडणारा बुलडाणा-धाड हा प्रमुख मार्ग आहे.सद्या या मार्गाचे काम सार्वजिनक आंधकाम विभागा कडून "हेम" या योजने अंतर्गत जिजामाता रोड निर्मिति व पालसिद्ध कंस्ट्रक्शन करीत आहे.ग्राम कोलवड जवळून पैनगंगा नदी वाहते.या नदीवरचा जुना पुल तोडून नवीन पुलाचे निर्माण कार्य सुरु असून पर्यायी पुलावरुन वाहतूक वळविण्यात आली होती.11 जूनच्या रात्री बुलडाणा तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडल्याने पैनगंगा नदी दुथड़ी वाहु लागल्याने पर्यायी पुल सकाळी 6 वाजेच्या दरम्यान वाहून गेला. त्यामूळे अनेक वाहने अडकुन पडली होती. पाण्याच्या टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने वाहून गेलेल्या पूलावरन ट्रॅक्टर टाकण्याचा धाडसी प्रयत्न केला होता मात्र सुदैवाने ट्रॅक्टर नदीत कोसळता कोसळता वाचला. सद्या या मार्गावारील वाहतूक बंद असून वाहने इतर मार्गाने जात आहे.

Post a Comment