बुलढाणा - 12 जून
बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबारवा अभयारण्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र मध्ये गुरुवारी एका चीडलेल्या अस्वलाने जंगलात दोघा आदिवास इसमांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना उघडकीस आली.घटनास्थळाच्या लगतच अस्वलाच्या 2 लहान पिल्लांना कुणीतरी कुर्हाडीने मारून ठार केल्याने अस्वलाने चिडून जावून आपल्या पिल्ल्यांचा बदला या दोघे व्यक्तिन्ना ठार करून घेतल्याची चर्चा परिसरात रंगु लागली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट अन्तर्गतच्या अंबाबारवा अभयारण्य मधील सोनाळा वनपरिक्षेत्रच्या दक्षिण आलेवाडी बीट मधील खडकमाणी शिवारामध्ये गुरुवारी 11 जून रोजी सकाळी अशोक मोतीराम गवते वय
52 वर्ष व माना बंडू गवते वय 42 वर्षे रा.निमखेडी हे दोघे जन गेले असता त्यांच्यावर या गाभा क्षेत्रात एका अस्वलाने हल्ला केला.यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.अस्वलाने एका व्यक्तीचा पूर्ण चेहरा छिन्न- विच्छिन्न केलेला होता. यामुळे सदर अस्वल हा चीडलेल्या असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळाचा 15 ते 20 फुटाच्या अंतरावरच अस्वलाचे जवळपास आठ महिन्याचे दोन पिल्लयांना कुणीतरी कुर्हाडीने वार करून ठार केल्याचे दिसून आले.आपल्या पिल्लयांच्या मृत्युने मादा अस्वलाने या दोघांना ठार करून आपल्या पिल्लयांचा बदला घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या पिल्लयांना कोणी व का मारले असेल हे सद्या स्पष्ट नाही. याप्रकरणी अकोट वन्य जीव विभागाच्या चमू ने घटनास्थळी पोहचून पंचनामा करून वन गुन्हा दाखल केला आहे.या परिसरातील नागरिकांना अस्वला पासून सतर्क राहण्याची सूचना वन्यजीव विभागाकडून देण्यात आली आहे.या प्रकरणी सोनाळा ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
Post a Comment