Latest Post

शिर्डी,दि.20 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजुरांची कामे बंद झाली. यामुळे या बंद काळात अनेक मजुरांनी गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. या सर्वांना मदत व्हावी यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या जेवण व प्रवासाची व्यवस्था केली. संगमनेर येथून 1662 परप्रांतियांनी त्यांच्या गावी पोहोचल्यानंतर तेथून ‘थँक्यू थोरात साहब’ असे म्हणत नामदार बाळासाहेब थोरात, सर्व संगमनेरवासीय व महाराष्ट्रीयन जनतेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
नामदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून राज्यातील सर्व  परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास खर्चाची व्यवस्था करण्यात आली होती. याचबरोबर या सर्व परप्रांतीय मजूरांना जेवणाची,  राहण्याची व  औषधोपचाराची सुविधाही देण्यात आली होती. राज्यात हे मदत कार्य सुरू असताना संगमनेर तालुक्यातही अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या बसेस उपलब्ध करुन देऊन मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, झारखंड या ठिकाणी जाणाऱ्या विविध परप्रांतीय मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था केली. अनेक गावातून पायी चालणाऱ्या या परप्रांतीय मजूरांना संगमनेर तालुक्यात मायेचा वेगळाच ओलावा अनुभवायला मिळाला. अनेक ठिकाणी अन्नछत्र सुरु करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी या मजुरांसाठी आंघोळीची व्यवस्था, औषधोपचाराची व्यवस्था व निवासाची, आरामाची व्यवस्थाही करण्यात आली होती. या मदतीमुळे संगमनेरवासीयांच्या माणुसकीचे कौतुकही झाले.

       नामदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेरमध्ये आलेल्या परप्रांतीय मजुरांना बसच्या माध्यमातून अहमदनगर येथे सोडण्यात आले. अहमदनगर येथून रेल्वेने हे परप्रांतीय मजूर उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व झारखंड या ठिकाणी पोहोचल्यावर मात्र परप्रांतीय मजुरांनी भावनिक होऊन थँक्यू थोरात साहेब म्हणत त्यांच्या कार्यालयात फोन करून व एसएमएस'द्वारे आपली कृतज्ञता व भावना व्यक्त केली.

              यामध्ये रामविलास वर्मा यांनी म्हटले आहे थँक्यू थोरात साहेब महाराष्ट्राचे आम्हाला प्रेम मिळाले. आपुलकी मिळाली ती जगाच्या पाठीवर कुठेही मिळाली नाही. महाराष्ट्रामुळे आमचे कुटुंब रोजीरोटी मिळवत आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगार जरी बंद झाला तरी महाराष्ट्रातील जनतेने आमची मदत केली. ती आम्ही जीवनात कधीही विसरू शकणार नाही. संगमनेरकर तर आम्हाला आमच्या कुटुंबातले आहेत. खरे तर संगमनेर गाव सोडताना खूप भावना अनावर झाल्या होत्या. आपण आम्हाला जेवणाखाण्याची, राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली त्याबद्दल संपूर्ण उत्तर प्रदेशमधील मजुरांच्यावतीने आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत. कोरोनाचे संकट लवकर संपवून आम्ही पुन्हा महाराष्ट्रात परतणार आहोत आणि महाराष्ट्रात व देशाच्या विकासात आमच्यापरीने योगदान देऊ असा, भावनिक संदेशही त्यांनी दिला.

            कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रभावीपणे काम करत असून या संपूर्ण लॉकडाऊन काळामध्ये संगमनेरकरांनी दाखवलेली माणुसकी ही कौतुकास्पद असून परप्रांतीय मजूर, हातावर रोजंदारी करणारे कामगार यांच्यासाठी विविध संघटनांनी सुमारे 3 हजार 500 डबे देण्याच्या उपक्रमासह लॉकडाऊन काळात सातत्यपूर्ण केलेले मदतकार्य हे राज्यासाठी मॉडेल ठरणारे असल्याचे गौरवौद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच काढले होते. संगमनेरकरांनी दाखवलेली माणुसकी हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला असून ज्या ज्या सेवाभावी संघटना व पदाधिकाऱ्यांनी  मदत केली त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राहता (शाह मुस्ताक आली  )-अहमदनगर जिल्ह्यात  राहाता शहरात लॉक डाउन च्या काळात  गेल्या काही दिवसापासून  शहरातून  मुली  फरार होण्याचे  प्रमाण वाढले असून  गेल्या आठ-दहा दिवसात शहरातून तीन मुली बेपत्ता झाल्या असल्याचे  खात्रीशीर वृत्त आहे,  या घटनेमुळे राहता शहरात  उलट-सुलट चर्चा होत असून  नागरिकांमध्ये  खळबळ उडाली आहे,कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन  सुरू असून राहता शहरात  सर्व बंद आहे, मात्र अत्यावश्यक सेवा सुरू आहे, किराणा,भाजीपाला,मेडीकल, घेण्यासाठी तसा बहाणा करुन किंवा काही  मुली बाहेर येतात, खरेदीच्या निमित्ताने बाहेर फिरतात व त्याचा फायदा घेत येथून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे, राहता शहरातून गेल्या आठ दहा दिवसात तीन मुली फरार झाल्याचे समजते, याची शहरात कुजबुज सुरू आहे, लॉक डाऊन मुळे सर्व जण घरात असल्याने याचे जास्त वाच्यता होत नाही, शिवाय यासंदर्भात जाहीर बोलायला कोणी तयार नाही, याची चौकशी होणे गरजेचे आहे, या  मुली बेपत्ता होण्यामागे कोणाचा हात आहे का। किंवा स्वतःहून या मुली गायब होत आहे किंवा यामागे  नेमकी ,कोण आहे का।याचा तपास लावणे गरजेचे आहे, सध्या देश संकटातून जात असताना शहरात असे प्रकार वाढत असेल तर याला वेळीच आळा घातला जाणे गरजेचे आहे, असे राहता मधून आता बोलले जात आहे, मुली बेपत्ता होण्याचे असे शहरात प्रकार यापुढे वाढत राहिले तर शहरात मोठी समस्या निर्माण होणार आहे या दबक्या आवाजात शहरात सुरू असलेल्या चर्चेमुळे अनेक कुटुंबात मुलींचे आई-वडील मोठे चिंतेत पडले आहे ,यामागे नेमकी काय आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे ,असे आता नागरिक बोलत आहेत.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)- देशात सन2018  पासून केंद्र शासनाच्यावतीने देशातील शहरांमधील स्वच्छता ,कचरा मुक्तीअभियान,नालेसफाई,वेस्टेज व्यवस्थापन आणि इतर स्वच्छता, सुंदरता पाहून शहरांचं रेटिंग ठरविण्यात येत असतं, दरवर्षी या गोष्टीत चांगले काम करणाऱ्यांना तसे रेटिंग  शहराला दिलं जात असतं, यावर्षी शहरातील स्टार रेटिंग देशातील विविध शहरांची निरीक्षण करून जाहीर करण्यात आली आहेत , केंद्रीय नगर विकास मंत्री हारदिपसिंग पुरी यांनी नुकतीच देशातील या बाबत असणाऱ्या स्टार रेटिंग शहराची घोषणा केली आहे, या स्टार रेटिंग मध्ये महाराष्ट्रातील व देशातील आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीला थ्री स्टार रेटिंग मिळाला आहे, यामुळे शिर्डीसह देश-विदेशातील साईभक्तामधून मोठा आनंद व्यक्त होत आहे,भारताचे नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नुकतेच देशातील  स्टार रेटिंग शहराची घोषणा केली आहे, देशातील शहरांमधील स्वच्छता सुंदरता नाला सफाई, वेस्ट मॅनेजमेंट, प्लास्टिक वापरावर निर्बंध या सर्व गोष्टींचा विचार करून शहराची केद्रींय पथकामार्फत पाहणी करून केंद्राला अहवाल देऊन त्यावर निर्णय घेण्यात येतो, यावर्षी  देशातील अनेक शहरांचे निरीक्षण करून केंद्राला अहवाल दिल्यानंतर केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नुकतेच हे या संदर्भातील स्टार रेटिंग घोषित केले आहे ,यावर्षी देशातील  स्टार रेटिंग शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या शिर्डीला थ्री स्टार रेटिंग मिळाला आहे, यात स्टार रेटिंग मध्ये फाइव स्टार रेटिंग अंबिकापुर ,राजकोट सुरत ,मैसूर ,इंदोर आणि महाराष्ट्रातील नवी मुंबई या शहरांनी मिळवला आहे, तर ठाणे भिवंडी अंबरनाथ आणि मीरा भाईंदर या शहरांना शिर्डी प्रमाणित थ्री स्टार रेटिंग मिळाला आहे ,त्याचप्रमाणे धुळे-जळगाव माथेरान ,रत्नागिरी ,पाचगणी, वेंगुरला ,आणि जेजुरी या शहरांनाही थ्रीस्टार देण्यात आले आहेत, शिर्डीला थ्रीस्टार रेटिंग मिळाल्यामुळे शिर्डीत मोठा आनंद व्यक्त होत आहे ,शिर्डी हे  छोटे शहर असले तरी येथे हे लॉक डाऊन पूर्वी दररोज सुमारे साठ-सत्तर हजार साईभक्त सरासरी श्रीसाई दर्शनासाठी येत असतात, सुट्ट्या व उत्सवाच्या दरम्यान  हीच संख्या लाखोंच्या पुढे दररोज जाते ,देश-विदेशातून येथे साईभक्तांचा ओघ सारखा सुरू असतो, त्यामुळे येथे स्वच्छता व शहराची सुंदरता वाढविण्याकडे अधिक जोर दिला गेलाहोता, श्री साईबाबा संस्थान ,शिर्डी नगरपंचायत, विविध सामाजिक संस्था यांनी शिर्डी स्वच्छ सुंदर असावी म्हणून आपापल्या परीने प्रयत्न केले, कारण येथे देश-विदेशातून साईभक्त येत असतात व येथिल स्वच्छतेचा मेसेज बाहेर जात असतो, म्हणून शिर्डीत अधिक लक्ष शहर स्वच्छता, सुंदर करण्याकडे दिले गेले होते व याचाच परिणाम म्हणून यापूर्वी देशात शिर्डीला स्वच्छ  व सुंदर शिर्डीचे दुसरे क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते व आता केंद्र सरकारने घोषित केलेल्या याच बाबतीत फाइव स्टार रेटिंग मध्येही शिर्डीला थ्री स्टार रेटिंग स्वच्छता, सुंदरता याबाबत मिळाले आहे ,यामुळे देशात शिर्डीचे नाव आणखीन झळकले आहे ,या थ्री स्टार रेटिंग मिळाल्याबद्दल शिर्डी व परिसरातून व साईभक्तं मधून शिर्डीतील सर्व प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते , सर्व नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) 25 मे रोजी रमजान ईद असून तोपर्यंत शहराची बाजारपेठ सुरू करताना कापड विक्री, चप्पल विक्री व महिला वस्त्रालयाची दुकाने 25 मे पर्यंत बंद ठेवण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा अनुराधा आदिक व मुख्याधिकारी तसेच व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांची भेट घेऊन केली. रमजान ईदचा सण चार दिवसांवर आला असून या निमित्ताने बाजारात गर्दी झाल्यास सोशल डिस्टन्सींगचा प्रश्न निर्माण होणार आहे. गेली दोन महिने प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक शहरातील परिस्थिती हाताळली आहे. बाजारपेठ सुरू केल्यामुळे अनेक लोक गर्दी करतील मात्र त्याचे खापर मुस्लिम समाजावर फोडण्यात येईल. दुर्दैवाने जर कोरूना पेशंट सापडले तर पूर्ण शहराला त्याचा त्रास होईल म्हणून शहरातील कापड विक्री व ईदशी संबंधित दुकाने 25 मे नंतर उघडण्यात यावी अशी मागणी
 या शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. यासंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, लोकप्रतिनिधी आदींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि श्रीरामपूर
शहरातील बाजारपेठ गेली दोन महिने बंद आहे. गत आठवड्यात चार दिवस आपण ती सुरू केली. मात्र व्यापारी आणि नागरिकांचे असहकार्य आणि कोरोणाचा वाढलेला धोका पाहून ती पुन्हा बंद करण्यात आली . याबाबत मंगळवारी पुन्हा शासकीय कार्यालयात मीटिंग होऊन बाजारपेठ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे समजते . 25 मे रोजी मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण रमजान ईद आहे. ईद निमित्ताने खरेदीसाठी मुस्लिम समाजाची मोठी झुंबड बाजारपेठेत उडण्याची शक्यता आहे. यातून सोशल डिस्टेंसिंगचे प्रश्न निर्माण होऊन गेली दोन महिने जीवाचे रान करून जी गोष्ट आपण सांभाळली. ती घडण्याची शक्यता आहे. कारण व्यापारी कुठल्याही पद्धतीने गर्दीचे नियोजन करीत नाही असा मागचा अनुभव आहे. बाजारपेठ सुरू केल्यामुळे शहराबरोबरच आसपासचे लोकही त्यामध्ये सहभागी होऊन खरेदी करणार आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. बाजारपेठ उघडणे आवश्यक आहे हे सुद्धा आम्हाला मान्य आहे. परंतु त्यातून कोरोनाचा प्रश्न उद्भवणार नाही याची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. म्हणून आमची *आपणास विनंती आहे की 25 मे पर्यंत शहरातील रेडीमेड, कापड व साडी, ड्रेस मटेरियल विक्रीची दुकाने, शूज अँड चप्पल्सची दुकाने,महिला वस्त्रालयाची दुकाने यांना उघडण्याची परवानगी देऊ नये.* इतर दुकानांना परवानगी देण्यास आमची हरकत नाही. प्रशासनाने गेली दोन महिने अत्यंत कष्टपूर्वक श्रीरामपूर शहराची परिस्थिती हाताळून शहर कोरोना मुक्त ठेवण्यात यश मिळवले आहे. आपल्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे पूर्ण शहर संकटात सापडणार नाही याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. व्यापार्‍यांचे हित पाहत असताना जनतेचे हित पाहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. तरी आमची आपणास विनंती आहे की वरील प्रमाणे दुकाने सोडून इतर दुकाने सुरू करण्यास आमची हरकत नाहीअसेही या निवेदनात म्हटले आहे .
                   याप्रसंगी बोलताना अहमद जहागीरदार यांनी चार दिवसांपूर्वी शहरातील दोन कापड दुकानांमध्ये प्रचंड गर्दी झाली असताना नियमानुसार ती दुकाने सील का करण्यात आली नाही असा प्रश्न विचारला . तर आदिल मखदुमी यांनी मोठ्या दुकानदाराची काळजी घेता मात्र शहरातील गोरगरीब चहाची टपरीवाले, पानपट्टी वाले, हात गाडीवाले हे हातावर पोट भरतात. त्यांना सुद्धा आपले व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे अशी मागणी केली.
 जमियात उलेमा चे जिल्हाध्यक्ष मौलाना इर्शाद यांनी ईदच्या पार्श्‍वभूमीवर ईदशी संबंधित दुकाने 25 तारखेपर्यंत बंद ठेवावी . बाजारात सर्व जण येतील मात्र त्याचे खापर मुस्लिम समाजावर फोडले जाईल हे आम्हाला नकोय असे सांगितले. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विशाल फोपळे यांनी तुमच्या मागण्याशी आम्ही सहमत असून व्यापाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढू असे सांगितले.
 नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी समाजाच्या मागणीशी शंभर टक्के सहमती दर्शवून सामोपचाराने हा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले .याप्रसंगी नगरसेवक राजेंद्र पवार,राम टेकावडे,शशांक रासकर, आलतमश पटेल , निलेश ओझा, विकास जाधव ,पंडितराव बोंबले, साजिद मिर्झा, सलीमखान पठाण, आदिल मगदूमी, मुन्ना पठाण, मुक्तार शेख, इसाक आत्तार, फयाज बागवान, रियाज अन्सारी, फिरोज पठाण, सोहेल बारूदवाला, शन्नू बारुदवाला, नाजिम शेख आदी उपस्थित होते .
याबाबतचे निवेदन खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार लहू कानडे, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक ,उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे ,पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरटआदींना देण्यात आले .

बुलडाणा - 19 मे - बुलडाणा जिल्ह्यातील माटरगांव जवळ वाळू तसकरांने एका पोलिस कांस्टेबलच्या अंगावरुन गाडी नेऊन त्याचा नाहक जीव घेतला. या घटनेला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी गांभिर्याने घेतले असून म्हणूनच बुलडाणा जिल्ह्यात वाळू तसकरांच्या मुसक्या आवळून्यास सुरुवात झालेली असून दररोज वाळू माफियांवर कारवाया सुरु असून जळगांव जामोद पोलिस ठाणे हद्दीत पूर्णा नदीच्या काठावर 10 ठीकाणी धाड टाकून ठाणेदार सुनील जाधव यांनी तब्बल 730 ब्रास अवैधरित्य स्टॉक करुण ठेवलेली वाळू पकडल्याने पूर्णा नदी काठच्या वाळू माफिया मध्ये खळबळ माजली आहे.
     जळगांव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावरील काही भागात वाळू तसकरांनी अवैधपने नदितून वाळूचे उत्खनन करुण साठा करुण ठेवल्याची गुप्त बातमी ठाणेदार सुनील जाधव यांना मिळाली.पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक हेमसिंग राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली 18 मे रोजी पूर्णा नदीच्या कडेला असलेल्या गोडेगाव शिवारात जाऊन पाहणी केली असता 10 ठीकाणी  जवळपास 730 ब्रास रेती आढळून आली त्याची  बाजार भावाप्रमाणे किंमत 21 लाख 90 हजार रुपये असून सदर रेती जप्त करण्यात आली आहे.त्याची फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी करुण पुढील कार्यवाही करिता तहसीलदार जळगाव जामोद यांना अहवाल सादर करण्यात आला आहे.या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांच्या सह पीएसआई वाकडे पोलिस कर्मचारी राजू टेकाळे,गणेश पाटील,सचिन राजपुत,प्रविण जाधव यांचा समावेश होता.आता तहसिल प्रशासन या प्रकरणी काय कारवाही करते?या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

शिर्डी (प्रतिनिधी) कोरोनाव्हायरस  या जागतिक महामारीचा मुकाबला मोठ्या धैर्याने जनता करीत आहे. अशा परिस्थितीत निश्चित रोजगार नसलेल्या नागरिकांची संख्या शिर्डी सह राहाता तालुक्यामध्ये मोठी आहे. त्यामुळे अन्न पाण्याबरोबरच जिवंत कसे राहायचे ही मोठी समस्या नागरिकांसमोर निर्माण झालेली आहे. या तालुक्यातील छोटे-मोठे मोठे व्यावसायिक, शेतमजूर, हातगाडीवाले, धागा लॉकेट विक्रेते, ड्रायव्हर, हॉटेल व्यवसायिक, प्रसाद विक्रेते, चहा आणि पान टपरी चे व्यवसाय चालवणारे, हातावर पोटपाणी असलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात हाल-अपेष्टा गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहेत. या सर्व जनतेला जर खऱ्या अर्थाने 'आत्मनिर्भरता' करायचे असेल तर शिर्डी नगरपंचायत, राहाता नगरपालिका आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने आगामी किमान एक वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी अथवा कोणतेही कर हे माफ करून जनतेच्या दुःखात सहभागी असल्याचे दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते प्रा. जयंत गायकवाड, मनसेचे रामनाथ सदाफळ, समीर बेग, विधिज्ञ  ॲडव्होकेट सुनील सोनवणे, दत्ता साखरे यांनी व्यक्त केले आहे.
शिर्डी या आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्रामुळे जिल्ह्यासह राज्यातील अनेक बेरोजगार, व्यवसायिक यांच्या चरितार्थाचे साधन म्हणून शिर्डी तथा राहता तालुक्याकडे पाहिले जाते. परंतु कोरोणा या जागतिक महामारी च्या पार्श्वभूमीवर या तालुक्यातील नागरिक आर्थिक आणि आरोग्यविषयक संकटाला सामोरे जात आहेत. नागरिकांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्यासाठी प्रा.जयंत गायकवाड यांचे मार्गदर्शनात समविचारी युवक नेत्यांनी एकत्र येत पुढील वस्तुनिष्ठ मागण्या सरकारकडे केल्या आहेत.
 तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला पाहिजे. या शैक्षणिक वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ केले जावे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय क्रमिक पुस्तकांची उपलब्धता करून दिली पाहिजे.  तालुक्यात असणाऱ्या अनेक शिक्षण संस्थांबरोबरच शिक्षण सम्राटांनी विद्यार्थ्यांकडे कोणतेही शिक्षण शुल्क मागू नये.  लॉक डाऊन आडून नागरिकांची शासकीय कामे करण्यात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे तसेच नागरिकांची शासकीय कागदपत्रांची कामे पूर्ण व्हावीत यासाठी सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करावी. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत शेतकऱ्यांसाठी पीक पाण्यासाठी कर्जाची उपलब्धता करून देणे कामी आदेश व्हावेत. शेतकऱ्यांच्या पिकांची अवकाळी पावसाने नुकसान झालेले असल्याने त्यांना संबंधित विमा रक्कम कंपन्यांनी ताबडतोब मंजूर करावी. यासर्व मागण्यांची पूर्तता सरकारने करणे आवश्यक आहे. शिर्डी नगर पंचायत, राहता नगरपालिका आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी नागरिकांना कमीत कमी एक वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टी विनाअट तत्काळ माफ करावी.
राहाता शिर्डीतल्या जनतेच्या या अतिशय योग्य आणि जीवनमरणाशी निगडीत न्याय्य मागण्यांसाठी वेळप्रसंगी आंदोलन पुकारण्याचा इशारा प्राध्यापक प्रा.जयंत गायकवाड, मनसेचे रामनाथ सदाफळ, समीर बेग, ॲडव्होकेट सुनील सोनवणे, दत्ता साखरे यांनी दिला आहे. सदर मागणीच्या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, प्रांताधिकारी गोविंद शिंदे तसेच तहसीलदार कुंदन हिरे यांना देण्यात आल्या आहेत.

साकुरी/शिर्डीच्या सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व *श्री. अमृतराव मुरलीधरराव गोंदकर पा* . यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. सध्याच्या आरोग्यविषयक राष्ट्रीय आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत त्यांचा अंत्यविधी निवडक नातेवाईक, स्नेही मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला.
             शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविण्याचा त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यात सर्वप्रथम ज्या दोन  स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतात जनता पार्टीचा झेंडा रोवला गेला त्यात नानांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ग्रामपंचायतीत भाजपने सत्ता स्थापन केली होती. नानांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष, शिर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही काम केले होते. उद्योजक दिलीपराव व शिवाजीराजे गोंदकर यांचें वडील होत दोन मुले चार मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे अमृतराव  गोंदकरयांच्या निधनाने शिर्डी परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget