Latest Post

बुलडाणा - 19 मे - बुलडाणा जिल्ह्यातील माटरगांव जवळ वाळू तसकरांने एका पोलिस कांस्टेबलच्या अंगावरुन गाडी नेऊन त्याचा नाहक जीव घेतला. या घटनेला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी गांभिर्याने घेतले असून म्हणूनच बुलडाणा जिल्ह्यात वाळू तसकरांच्या मुसक्या आवळून्यास सुरुवात झालेली असून दररोज वाळू माफियांवर कारवाया सुरु असून जळगांव जामोद पोलिस ठाणे हद्दीत पूर्णा नदीच्या काठावर 10 ठीकाणी धाड टाकून ठाणेदार सुनील जाधव यांनी तब्बल 730 ब्रास अवैधरित्य स्टॉक करुण ठेवलेली वाळू पकडल्याने पूर्णा नदी काठच्या वाळू माफिया मध्ये खळबळ माजली आहे.
     जळगांव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावरील काही भागात वाळू तसकरांनी अवैधपने नदितून वाळूचे उत्खनन करुण साठा करुण ठेवल्याची गुप्त बातमी ठाणेदार सुनील जाधव यांना मिळाली.पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक हेमसिंग राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली 18 मे रोजी पूर्णा नदीच्या कडेला असलेल्या गोडेगाव शिवारात जाऊन पाहणी केली असता 10 ठीकाणी  जवळपास 730 ब्रास रेती आढळून आली त्याची  बाजार भावाप्रमाणे किंमत 21 लाख 90 हजार रुपये असून सदर रेती जप्त करण्यात आली आहे.त्याची फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी करुण पुढील कार्यवाही करिता तहसीलदार जळगाव जामोद यांना अहवाल सादर करण्यात आला आहे.या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांच्या सह पीएसआई वाकडे पोलिस कर्मचारी राजू टेकाळे,गणेश पाटील,सचिन राजपुत,प्रविण जाधव यांचा समावेश होता.आता तहसिल प्रशासन या प्रकरणी काय कारवाही करते?या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

शिर्डी (प्रतिनिधी) कोरोनाव्हायरस  या जागतिक महामारीचा मुकाबला मोठ्या धैर्याने जनता करीत आहे. अशा परिस्थितीत निश्चित रोजगार नसलेल्या नागरिकांची संख्या शिर्डी सह राहाता तालुक्यामध्ये मोठी आहे. त्यामुळे अन्न पाण्याबरोबरच जिवंत कसे राहायचे ही मोठी समस्या नागरिकांसमोर निर्माण झालेली आहे. या तालुक्यातील छोटे-मोठे मोठे व्यावसायिक, शेतमजूर, हातगाडीवाले, धागा लॉकेट विक्रेते, ड्रायव्हर, हॉटेल व्यवसायिक, प्रसाद विक्रेते, चहा आणि पान टपरी चे व्यवसाय चालवणारे, हातावर पोटपाणी असलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात हाल-अपेष्टा गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहेत. या सर्व जनतेला जर खऱ्या अर्थाने 'आत्मनिर्भरता' करायचे असेल तर शिर्डी नगरपंचायत, राहाता नगरपालिका आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने आगामी किमान एक वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी अथवा कोणतेही कर हे माफ करून जनतेच्या दुःखात सहभागी असल्याचे दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते प्रा. जयंत गायकवाड, मनसेचे रामनाथ सदाफळ, समीर बेग, विधिज्ञ  ॲडव्होकेट सुनील सोनवणे, दत्ता साखरे यांनी व्यक्त केले आहे.
शिर्डी या आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्रामुळे जिल्ह्यासह राज्यातील अनेक बेरोजगार, व्यवसायिक यांच्या चरितार्थाचे साधन म्हणून शिर्डी तथा राहता तालुक्याकडे पाहिले जाते. परंतु कोरोणा या जागतिक महामारी च्या पार्श्वभूमीवर या तालुक्यातील नागरिक आर्थिक आणि आरोग्यविषयक संकटाला सामोरे जात आहेत. नागरिकांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्यासाठी प्रा.जयंत गायकवाड यांचे मार्गदर्शनात समविचारी युवक नेत्यांनी एकत्र येत पुढील वस्तुनिष्ठ मागण्या सरकारकडे केल्या आहेत.
 तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला पाहिजे. या शैक्षणिक वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ केले जावे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय क्रमिक पुस्तकांची उपलब्धता करून दिली पाहिजे.  तालुक्यात असणाऱ्या अनेक शिक्षण संस्थांबरोबरच शिक्षण सम्राटांनी विद्यार्थ्यांकडे कोणतेही शिक्षण शुल्क मागू नये.  लॉक डाऊन आडून नागरिकांची शासकीय कामे करण्यात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे तसेच नागरिकांची शासकीय कागदपत्रांची कामे पूर्ण व्हावीत यासाठी सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करावी. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत शेतकऱ्यांसाठी पीक पाण्यासाठी कर्जाची उपलब्धता करून देणे कामी आदेश व्हावेत. शेतकऱ्यांच्या पिकांची अवकाळी पावसाने नुकसान झालेले असल्याने त्यांना संबंधित विमा रक्कम कंपन्यांनी ताबडतोब मंजूर करावी. यासर्व मागण्यांची पूर्तता सरकारने करणे आवश्यक आहे. शिर्डी नगर पंचायत, राहता नगरपालिका आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी नागरिकांना कमीत कमी एक वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टी विनाअट तत्काळ माफ करावी.
राहाता शिर्डीतल्या जनतेच्या या अतिशय योग्य आणि जीवनमरणाशी निगडीत न्याय्य मागण्यांसाठी वेळप्रसंगी आंदोलन पुकारण्याचा इशारा प्राध्यापक प्रा.जयंत गायकवाड, मनसेचे रामनाथ सदाफळ, समीर बेग, ॲडव्होकेट सुनील सोनवणे, दत्ता साखरे यांनी दिला आहे. सदर मागणीच्या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, प्रांताधिकारी गोविंद शिंदे तसेच तहसीलदार कुंदन हिरे यांना देण्यात आल्या आहेत.

साकुरी/शिर्डीच्या सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व *श्री. अमृतराव मुरलीधरराव गोंदकर पा* . यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. सध्याच्या आरोग्यविषयक राष्ट्रीय आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत त्यांचा अंत्यविधी निवडक नातेवाईक, स्नेही मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला.
             शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविण्याचा त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यात सर्वप्रथम ज्या दोन  स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतात जनता पार्टीचा झेंडा रोवला गेला त्यात नानांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ग्रामपंचायतीत भाजपने सत्ता स्थापन केली होती. नानांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष, शिर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही काम केले होते. उद्योजक दिलीपराव व शिवाजीराजे गोंदकर यांचें वडील होत दोन मुले चार मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे अमृतराव  गोंदकरयांच्या निधनाने शिर्डी परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिर्डी-शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉक डाऊंनच्या चौथ्या टप्प्यात रविवार व गुरुवार या आठवड्यातील दोन्ही दिवशी शिर्डीत जनता कर्फ्यू लागू राहणार असून आठवड्यातील सोमवार, मंगळवार ,बुधवार शुक्रवार शनिवार या पाच दिवशी सकाळी नऊ ते दोन या वेळेत दरम्यान काही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे,
  देशा,त राज्यात कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लंकडाउनचा तिसरा टप्पा संपून चौथा टप्पा सुरू झाला आहे, 31 मेपर्यंत लॉक डाऊन सुरू आहे, अशा या लॉकडाउनच्या काळात शासनाच्या तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशान्वये तसेच दिनांक 16 मे रोजी येथे शासकीय विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी व्यापारी असोसिएशन ,दुकानदार शिर्डी ग्रामस्थ यांची बैठक होऊन शिर्डीत काही दुकाने उघडण्याबाबत व वेळेबाबत निर्णय घेण्यात आला, या सर्वांच्या अनुषंगाने शिर्डी नगरपंचायत ने सर्व दुकानदारांसाठी व ग्रामस्थांसाठी निर्देश जारी केले असून या निर्देश पत्रानुसार शिर्डीत आठवड्यातील सोमवार, मंगळवार बुधवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी भाजीपाला फळे, किराणा, हार्डवेअर, दूध   अंडी ,मटन चिकन,  घड्याळ चप्पल-बूट ,शीतपेये ,भांडी ,प्रिंटिंग प्रेस झेरॉक्स,  भेळ ,फरसाण  कृषीविषयक दुकाने , फोटो स्टुडिओ,  कलरची दुकाने हार्डवेअर व ट्रेडर्स , इलेक्ट्रॉनिक दुकाने , सोन्याची दुकाने, कापड दुकाने गॅसपुरवठा , बेकरी, पीठ गिरणी, फर्निचर , पंचर दुकाने गॅरेज , इस्त्रीचे दुकान ,बेकरी मिठाई ,टेलरिंग,  शीतपेये  पाण्याचे जार,  आदी सर्व दुकाने सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे , मात्र शिर्डीत सर्व हॉटेल ,लॉज, रेस्टॉरंट, हार फुल प्रसाद लॉकेट ची दुकाने, पान शॉप ,चहा कॉफी दुकाने, रस्त्यावर बसणारे सर्व व्यवसाय, सलून, दुकाने हातगाडीवर असणारे नाष्टा सेंटर, ब्युटी पार्लर, भंगार ची दुकाने, मोठे हाल, मंगल कार्यालय ,प्रार्थनास्थळे, व्यायाम शाळा व आठवडे बाजार हे बंदच राहणार आहेत ,यांना कोणत्याही दिवशी उघडण्यास परवानगी नाही, तसेच रविवार व गुरुवार या दोन दिवशी शिर्डीत अत्यावश्यक सेवेचे म्हणजे मेडिकल व दवाखाना सोडून सर्व दुकाने बंद राहणार असून या दिवशी शिर्डीत जनता कर्फ्यू राहणार आहे ,तसेच ज्या दिवशी दुकाने उघडणार आहे त्या दिवशी सकाळी नऊ ते दोन या वेळेत दुकाने उघडावीत परवानगी असलेले दुकाने उघडावीत, दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मास्क असल्याशिवाय कोणते वस्तू देऊ नये , होम कॉरटाईन केलेल्यांना दुकानात येऊन देऊ नये,  सामाजिक दुरी चे अंतर ठेवावे ,सनेटायझर वापरावे ,उगाच कोठे गर्दी करू नये , नियमाचे सर्वांनी पालन करावे,  अन्यथा अशा दुकानदारांवर व ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नगरपंचायतीने या पत्रात म्हटले आहे.

शिर्डी (जय शर्मा)-शिर्डी येथे सध्या लॉकडाउन सुरू आहे, सर्व काही बंद असताना येथे मात्र चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, शिर्डीतून दिवसाढवळ्या गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने  तसेच  रात्रीच्या  वाहने जाळण्याचे प्रकारात वाढ झाली आहे , त्यामुळे शिर्डी व परिसरात मोठी घबराट निर्माण झाली आहे,
शिर्डी परिसरातून नुकतेच दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिंद्र पिकअप गाडी पळवून नेली ,मोटरसायकलही चोरी जात आहे, मात्र विनाकारण झंजट नको म्हणून काहीजण तक्रार दाखल करत नाही, सध्या शिर्डीत व परिसरात अवैध धंदे तेजीत सुरू आहे, हे लॉकडाउनच्या काळात अनधिकृत धंदे कसे सुरु आहेत ,त्याला कोणाचातरी वरदहस्त असल्याशिवाय असे घडू शकत नाही, असेच शिर्डीतून बोलले जात आहे, शिर्डी व परिसरात राजरोसपणे अवैध दारू धंदे सुरू आहेत ,तसेच शिर्डीत नगर पंचायत समोर परप्रांतीयांची दाखला घेण्यासाठी मोठी गर्दी होते, लोक डॉन चे नियम पाळले जात नाही,एकटी नगर पंचायत काय करणार।। पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात ,येथे लॉक डाऊन ,काळातअवैध धंदे वाढले आहेत, पोलिसांचा धाक कमी झाला आहे, की चिरीमिरी च्या जोरावर हे सगळे चालू आहे, अशी शंका येत आहे,त्यामुळे येथे सक्षम पोलीस अधिकाऱ्याची गरज असल्याचे शिर्डीतून बोलले जात आहे, तसेच राहता येथून मुली फरार होण्याचे प्रमाण सध्या वाढले असून येथून तीन मुली।नुकत्याच बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे ,या गोष्टीकडे पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत आहे, लॉक डाउन च्या काळातही अवैध धंद्याकडे  आर्थिक घेवाण देवानातून दुर्लक्ष होत आहे ,मात्र कोणता मासा गळाला लागतो याकडे जास्त लक्ष आहे, तरी या गोष्टीमुळे राहता तालुक्यातील नागरिक मात्र तीव्र संताप व्यक्त करत असून या प्रकारामुळे शिर्डी व राहता करांनी येथे सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी केली आहे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)- देशात कोरोनाचे रुग्ण सापडत असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोणाच्या  रुग्णांची संख्या वाढत आहे,  त्यामुळे महाराष्ट्रात  शासनाने  18 मे पासून  ते 31 मे पर्यंत लॉक डॉऊनचा चौथा टप्पा  जाहीर केला आहे ,त्यामुळे  आज 18 मे पासून लॉकडाउनचा चौथा टप्पा  राज्यात  व शिर्डीतही सुरू झाला आहे ,या लॉकडाउनचा चौथा टप्पा  सुरू झाला असलातरी मात्र या चौथ्या टप्प्यात थोडीशी ढिलाई आल्याचे दिसून येत आहे, राज्यातील सर्व मंदिरे बंद असणार आहेत, शिर्डीचेही श्री साईबाबा मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी बंद राहणार आहे तसेच  हॉल, मॉल्स ,करमणुकीचे ठिकाणे हेही बंद राहणार आहेत, मात्र अत्यावश्यक दुकानासहित काही दुकानेस,९ ते २ या काही वेळेसाठी उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, नुकतीच शिर्डीच्या व्हीआयपी शासकीय गेस्ट हाउस मध्ये , आ,विखे  लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक होऊन तसा निर्णय घेण्यात आला होता, त्यामुळे शिर्डी व परिसरात पहिल्यांदाच आज सकाळी काही दुकाने उघडण्यात आली होती, तसेच ग्राहक व नागरिकही बऱ्याच दिवसातून आज शहरात रस्त्यांवर दिसून येत होते, दरवर्षी शिर्डीत सुट्ट्यांमुळे मे महिन्यात मोठी साई भक्तांची गर्दी होत असते,  मे महिन्यात येथे मोठी आर्थिक उलाढाल सुरू असते, मात्र।सध्या लॉकडाउनमुळे  येथे सर्वकाही ठप्प झाले आहे, लॉकडाउनचा चौथा टप्पा महाराष्ट्रात सुरू झाला असला तरी काही शिथिलता देण्यात आली आहे, काही दुकाने उघडण्यास परवानगी काही वेळेसाठी देण्यात आली आहे, मात्र लॉज ,हॉटेल ,सलून ,मॉल्स आदी दुकानांना उघडण्यास परवानगी नाही ते बंदच होती, तसेच शिर्डीत आर्थिक मोठी उलाढाल असणारे हॉटेल रेस्टॉरंट लॉज हार प्रसादाची दुकाने हे मात्रहोती, साई मंदिर बंद असल्यामुळे साईभक्त येत नाही तोपर्यंत ते उडूनही उपयोग नाही त्यामुळे अनेक दुकाने बंद होती हॉटेल्स लॉज बंद आहेत,, मात्र ज्यांनापरवानगी आहे असे काही  आज सकाळी दुकाने उघडली होती, प्रथमच शिर्डीची दुकाने उघडल्याचे दिसून येत होते ,तसेच शिर्डीकरही आज बऱ्याच दिवसातून आपल्या घराबाहेर शहरात खरेदी करण्याच्या बहाण्यानेबाहेर पडल्याचे दिसून येत होते, शांत शांत वाटणारी दोन महिन्यातील शिर्डी आज थोडीशी गजबजलेली वाटू लागल्याचे जाणवत होते ,मात्र प्रत्येक जण कोरोणाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टंन्स व मास्क यांचे नियम पाळताना दिसत होता, अनेक दिवसा नंतर घरात असणारे शिर्डी व परिसरातील नागरिक साईभक्त हे मंदिर परिसरात येऊन लांबून श्रीसाई स्वर्ण मंदिर कळसाचे दर्शन घेत होते, कारण 17 मार्चला दुपारी तीन वाजता साई भक्तांना दर्शनासाठी मंदिर बंद करण्यात आले होते व ते अजूनही बंद आहे, त्यामुळे लांबुनच मंदिर कळसाचे दर्शन घेता येत आहे व  खरेदीच्या निमित्ताने बाहेर आलेले नागरिक लांबूनच खरेदी करता करता श्री साई मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त करत आहेत, तर काही दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने एकमेकांशी बऱ्याच दिवसातून भेट झाल्यामुळे गप्पा मारताना दिसत होते, लोक डाऊन च्या चौथ्या टप्प्यात थोडीशी तील का ठेवण्यात आली असली तरी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे, अनेक नागरिक विनाकारण काहीतरी खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात तसेच ओळखीचे कोणी भेटल्यानंतर रस्त्यातच गप्पा मारीत असतात मात्र कायद्याने असे करण्यास बंदी आहे संचारबंदी जारी आहे, चार ते पाच लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे ,शिर्डी व राहता तालुका अद्याप कोरोणा मुक्त आहे, मात्र लॉकडाऊन  चे नियम जर चौथ्या टप्प्यात नागरिकांनी पाळले नाही ,तर शिर्डीत काही अनर्थ होऊ शकतो, त्यासाठी शहरातील नागरिकांनी स्वतःहून काटेकोर नियम पाळणे गरजेचे आहे ,तसेच मुंबई-पुणे-नाशिक तसेच इतर शहरातून गुपचूप रात्रीच्यावेळी ग्रामीण भागात किंवा शहरात येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस चौथ्या टप्प्यात वाढत आहे, या बाहेरून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे, तसेच त्यांची माहिती स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे, शिर्डी भविष्यातही कोरोनामुक्त राहावी यासाठी सर्व शिर्डीकर यांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आता सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे, दुकानदारांनी आपली दुकाने उघडली असली तरी आपली दुकाने वेळच उघडी ठेवावी, तसेच सेनेटायझर व मास्क वापरावे, ग्राहकांनाही मास्क असल्याशिवाय कोणतीही वस्तू देऊ नये, सोशल डिस्टंन्स  पाळणे महत्त्वाचे आहे, असेही बोलले जात आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-लाँक डाऊन काळात दुकान सुरु केल्याचा जाब ग्रामपंचायत कर्मचार्याने विचारताच दुकानदाराने संबधीत कर्मचाऱ्यांला शिवीगाळ केल्यामुळे बेलापूरात दिवसभर कोरोनाची नाही तर किराणाचीच चर्चा चालु होती.बेलापूर ग्रामस्थांनी १७ तारखेपर्यत दिवसाआड दुकाने सुरु  ठेवण्याचा निर्णय घेतला होता १७ तारखेनंतर काय हे ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी ठरविणे गरजेचे होते परंतु तसा काही निर्णय न झाल्यामुळे किराणा दुकानदारांनी नेहमी प्रमाणे दुकाने सुरु केली किराणा दुकान सुरु झाल्याचे समजताच ग्रामपंचायत कर्मचारी खरोटे हे त्या ठिकाणी गेले व दंडाची पावती फाडली या वरुन दुकानदाराने कर्मचाऱ्यांस अरेरावी केली या वरुन काही काळ वातावरण संतप्त झाले होते व्यापाऱ्यांनी या बाबत तातडीने बैठक घेवुन पुढील निर्णय व्यापाऱ्यांना कळविणे आवश्यक असताना तसे केले नाही हा दोष आपला नाही आपल्याला मा जिल्हाधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी दिलेली आहे त्यामुळे सर्वानुमते तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचे बैठकीत ठरले त्याप्रमाणे सर्व व्यापारी तहसीलदार प्रशांत पाटील व प्रांताधिकारी अनिल पवार यांच्याकडे गेले बेलापूर ग्रामपंचायतीनेही तातडीने व्यापारी व ग्रामस्थ यांची एकत्रीत बैठक बोलविली या बैठकीत व्यापाऱ्यांना काही नियम घालुन दिले नियमाचा भंग करणारावर कायदेशीर कारवाई करण्याचेही बैठकीत ठरले छोट्या व्यवसायीकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने या बैठकीत निर्णय घेण्यात आला व्यापाऱ्यांनी दुकानात गर्दी होणार नाही यांची दक्षता घ्यावयाची आहे सोशल डिस्टनींगच्या नियमाचे काटेकोर पालन करुन प्रत्येक व्यापाऱ्यांनी सँनिटायझर  ठेवावे ठरवुन दिलेल्या वेळेतच दुकाने उघडी ठेवावी रविवार हा दिवस जनता कर्फ्यु म्हणून पाळण्यात यावा या नियमाचा भंग करणार्यावर कायदेशीर कारवाई करावी यात कुणीही राजकारण आणू नये असे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले अन काही तासातच बेलापूर गावची बाजारपेठ गर्दीने खुलली खरेदीदार व विक्रेते याची बाजारपेठेत गर्दी दिसु लागली या निमित्ताने बाहेर गावातील काही व्यापारीही माल विकण्यासाठी गावात येवु लागले असुन एखादा बाधीत व्यक्ती गावात आल्यास त्यास जबाबदार कोण असाही प्रश्न काही नागरीकांनी उपस्थित केला ग्रामपंचायत कर्मचार्यास शिवीगाळ करणार्या व्यापार्याने दिलगीरी व्यक्त केल्यामुळे तसेच विनापरवाना दुकान उघडल्यामुळे दंडात्मक कारवाई करुन त्या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला असे असले तरी बेलापुर गावात दिवसभर कोरोनाची नव्हे तर किराणाचीच चर्चा होती.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget