शिर्डी-शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉक डाऊंनच्या चौथ्या टप्प्यात रविवार व गुरुवार या आठवड्यातील दोन्ही दिवशी शिर्डीत जनता कर्फ्यू लागू राहणार असून आठवड्यातील सोमवार, मंगळवार ,बुधवार शुक्रवार शनिवार या पाच दिवशी सकाळी नऊ ते दोन या वेळेत दरम्यान काही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे,
देशा,त राज्यात कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लंकडाउनचा तिसरा टप्पा संपून चौथा टप्पा सुरू झाला आहे, 31 मेपर्यंत लॉक डाऊन सुरू आहे, अशा या लॉकडाउनच्या काळात शासनाच्या तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशान्वये तसेच दिनांक 16 मे रोजी येथे शासकीय विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी व्यापारी असोसिएशन ,दुकानदार शिर्डी ग्रामस्थ यांची बैठक होऊन शिर्डीत काही दुकाने उघडण्याबाबत व वेळेबाबत निर्णय घेण्यात आला, या सर्वांच्या अनुषंगाने शिर्डी नगरपंचायत ने सर्व दुकानदारांसाठी व ग्रामस्थांसाठी निर्देश जारी केले असून या निर्देश पत्रानुसार शिर्डीत आठवड्यातील सोमवार, मंगळवार बुधवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी भाजीपाला फळे, किराणा, हार्डवेअर, दूध अंडी ,मटन चिकन, घड्याळ चप्पल-बूट ,शीतपेये ,भांडी ,प्रिंटिंग प्रेस झेरॉक्स, भेळ ,फरसाण कृषीविषयक दुकाने , फोटो स्टुडिओ, कलरची दुकाने हार्डवेअर व ट्रेडर्स , इलेक्ट्रॉनिक दुकाने , सोन्याची दुकाने, कापड दुकाने गॅसपुरवठा , बेकरी, पीठ गिरणी, फर्निचर , पंचर दुकाने गॅरेज , इस्त्रीचे दुकान ,बेकरी मिठाई ,टेलरिंग, शीतपेये पाण्याचे जार, आदी सर्व दुकाने सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे , मात्र शिर्डीत सर्व हॉटेल ,लॉज, रेस्टॉरंट, हार फुल प्रसाद लॉकेट ची दुकाने, पान शॉप ,चहा कॉफी दुकाने, रस्त्यावर बसणारे सर्व व्यवसाय, सलून, दुकाने हातगाडीवर असणारे नाष्टा सेंटर, ब्युटी पार्लर, भंगार ची दुकाने, मोठे हाल, मंगल कार्यालय ,प्रार्थनास्थळे, व्यायाम शाळा व आठवडे बाजार हे बंदच राहणार आहेत ,यांना कोणत्याही दिवशी उघडण्यास परवानगी नाही, तसेच रविवार व गुरुवार या दोन दिवशी शिर्डीत अत्यावश्यक सेवेचे म्हणजे मेडिकल व दवाखाना सोडून सर्व दुकाने बंद राहणार असून या दिवशी शिर्डीत जनता कर्फ्यू राहणार आहे ,तसेच ज्या दिवशी दुकाने उघडणार आहे त्या दिवशी सकाळी नऊ ते दोन या वेळेत दुकाने उघडावीत परवानगी असलेले दुकाने उघडावीत, दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मास्क असल्याशिवाय कोणते वस्तू देऊ नये , होम कॉरटाईन केलेल्यांना दुकानात येऊन देऊ नये, सामाजिक दुरी चे अंतर ठेवावे ,सनेटायझर वापरावे ,उगाच कोठे गर्दी करू नये , नियमाचे सर्वांनी पालन करावे, अन्यथा अशा दुकानदारांवर व ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नगरपंचायतीने या पत्रात म्हटले आहे.

Post a Comment