शिर्डी (जय शर्मा)-शिर्डी येथे सध्या लॉकडाउन सुरू आहे, सर्व काही बंद असताना येथे मात्र चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, शिर्डीतून दिवसाढवळ्या गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने तसेच रात्रीच्या वाहने जाळण्याचे प्रकारात वाढ झाली आहे , त्यामुळे शिर्डी व परिसरात मोठी घबराट निर्माण झाली आहे,
शिर्डी परिसरातून नुकतेच दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिंद्र पिकअप गाडी पळवून नेली ,मोटरसायकलही चोरी जात आहे, मात्र विनाकारण झंजट नको म्हणून काहीजण तक्रार दाखल करत नाही, सध्या शिर्डीत व परिसरात अवैध धंदे तेजीत सुरू आहे, हे लॉकडाउनच्या काळात अनधिकृत धंदे कसे सुरु आहेत ,त्याला कोणाचातरी वरदहस्त असल्याशिवाय असे घडू शकत नाही, असेच शिर्डीतून बोलले जात आहे, शिर्डी व परिसरात राजरोसपणे अवैध दारू धंदे सुरू आहेत ,तसेच शिर्डीत नगर पंचायत समोर परप्रांतीयांची दाखला घेण्यासाठी मोठी गर्दी होते, लोक डॉन चे नियम पाळले जात नाही,एकटी नगर पंचायत काय करणार।। पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात ,येथे लॉक डाऊन ,काळातअवैध धंदे वाढले आहेत, पोलिसांचा धाक कमी झाला आहे, की चिरीमिरी च्या जोरावर हे सगळे चालू आहे, अशी शंका येत आहे,त्यामुळे येथे सक्षम पोलीस अधिकाऱ्याची गरज असल्याचे शिर्डीतून बोलले जात आहे, तसेच राहता येथून मुली फरार होण्याचे प्रमाण सध्या वाढले असून येथून तीन मुली।नुकत्याच बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे ,या गोष्टीकडे पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत आहे, लॉक डाउन च्या काळातही अवैध धंद्याकडे आर्थिक घेवाण देवानातून दुर्लक्ष होत आहे ,मात्र कोणता मासा गळाला लागतो याकडे जास्त लक्ष आहे, तरी या गोष्टीमुळे राहता तालुक्यातील नागरिक मात्र तीव्र संताप व्यक्त करत असून या प्रकारामुळे शिर्डी व राहता करांनी येथे सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment