Latest Post

शिर्डी (जितेश लोकचंदानी)-देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असून देशातील सर्व मंदिरे बंद आहेत ,शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद असून येथे तरीही ही ऑनलाईन देणगी मोठ्या स्वरूपात मिळत आहे, श्री साईबाबा संस्थान मध्ये सुमारे सहा हजार कर्मचारी असून त्यांना पगार वेळेवर मिळत आहे, मात्र एक वृत्तपत्र व एका वृत्त वाहिनी वर  साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या काळातील एप्रिल महिन्यात येथे देणगीचा ओघ कमी झाल्यामुळे स्वतःची एफडी मोडून साई संस्थानला कर्मचाऱ्यांचा पगार करावा लागला, असे वृत्त देण्यात आले आहे, व श्री साईबाबा संस्थान ने आपल्या गुंतवणुकीतून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार केल्याचे त्या  वृत्तपत्र व  वृत्तवाहिनीने म्हटले होते, मात्र हे वृत्त चुकीचे असून या वृत्ताची दखल घेऊन व चौकशी करून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय संस्थान प्रशासन घेईल, या एका वृत्तपत्रातील चुकीच्या वृत्तामुळे श्री साईबाबा संस्थान चे प्रशासन अधिकारी, कर्मचारी व साईभक्त त्यांच्यामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली होती ,पण या वृत्तपत्रातील या निराधार वृत्ताचे  खंडन श्री साईबाबा संस्थान चे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी केले आहे, तसेच अशा प्रकारचे कोणतेही वृत्त आम्ही कोणत्याही वृत्तपत्राला व वृत्त वाहिनीला  दिलेले नसून हे वृत्त चुकीचे असल्याचे श्री साईबाबा संस्थान चे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले,देशात लॉक डाऊन मुळे सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद आहेत, देशात शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर 17 मार्च दुपारी तीन वाजेपासून साईभक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे, त्यामुळे येथे साईभक्त येणे बंद झाले आहे, तरी येथे न येता करोडो साईभक्त दररोज ऑनलाईन दर्शन घेत असतात तसेच ऑनलाईन देणगी श्रीसाईबाबा संस्थानला पाठवत असतात, श्री साईबाबांवर करोडो साईभक्तांची श्रद्धा असल्यामुळेच साई संस्थानला देणगीचा ओघ सुरूच आहे, लॉकडाउनच्या काळातही श्री साईबाबा संस्थानला देणगी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन सुरू आहे तसेच श्रीसाईबाबा संस्थांकडे गंगाजळी मोठ्या स्वरूपात आहे, मात्र श्री साईबाबा संस्थानने लॉकडाउनच्या काळात देणगीचा ओघ कमी पडल्यामुळे आपल्या सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार स्वतःची एफडी मोडून केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे, हे वृत्त प्रसिद्ध व वृत्त वाहिनी वर प्रसारित  होताच श्री संस्थानच्या कर्मचारी, अधिकारी, तसेच साईभक्त व शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली होती, या संदर्भात श्री साईबाबा संस्थांनचे जनसंपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता या वृत्तपत्र व वाहिनित  निराधार वृत्ताचे त्यांनी खंडन करत असे कोणतेही प्रकार साई संस्थांनी केला नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच या संदर्भात साई संस्थांनचे उपकार्यकारी अधिकारी श्री रवींद्र ठाकरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने असे कोणतेही ही वृत्त कोणत्याही वृत्तपत्रांना दिलेले नाही,या वृत्ताचे त्यांनी खंडन करत असे वृत्त चुकीचे आहे, असे सांगितले, या वृत्ताचे खंडन केल्यामुळे शिर्डी व परिसरात व साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांमध्ये या वृत्तामुळे निर्माण झालेली भीती दूर झाली आहे, देशात तिरुपती नंतर शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान सर्वात श्रीमंत असे देवस्थान आहे येथे सुमारे 2500 कोटी रुपयांची संस्थांची ठेव असल्याचे बोलले जाते, तसेच श्रीसाईबाबा संस्थांकडे साई भक्तांनी दिलेल्या देणगीतून विविध मुकुट, हार ,भांडी अशा विविध वस्तू सोन्या-चांदीच्या आहेत, साई संस्थांनकडे मोठ्या प्रमाणात निधी आहे, श्री साईबाबा संस्थान चे कर्मचारी-अधिकारी यांना यापुढे कधीही ही पगार देणेकामी संस्थानला कधी अडचण येणार नाही ,असे अनेक साई संस्थांनचे कर्मचारी ,अधिकारी तसेच शिर्डी कर व साईभक्त खाजगीत बोलत आहेत.

शिर्डी(  जय शर्मा )-कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून अनेक दिवस आपल्या घरात ,शेतात राहणारे मेंढपाळ आपल्या मेंढ्या, शेळ्या  घेऊन आता नाविलाजाने गावोगाव भटकंती करत चाऱ्याच्या शोधार्थ फिरत असल्याचे दिसत आहे,तशी सुरुवात झाल्याचे दिसू लागले आहे,
गेल्या  52 दिवसापासून कोरोणाचा  प्रादुर्भाव  रोखण्यासाठी देशात लॉकडॉऊन सुरू आहे, सर्व बंद आहे, त्यामुळे सर्व जण घरात आहे, शेळ्या, मेंढ्या,घरी,शेतात होत्या,पाळीव जनावरेही आपल्या दारात प्रत्येकाने बांधून ठेवले आहेत, मात्र आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे ,त्यामुळे आता तापमानही वाढले आहे, अनेक ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई हळूहळु भासायला सुरुवात झाली आहे, शेळ्या ,मेंढ्या, जनावरांना चारा, पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल होत आहे, ५१,५२, दिवस आपापल्या गावात ,घरात शेतात राहणारे मेंढपाळ  आता नाविलाजाने दरवर्षाप्रमाणे मेंढ्यांच्या कळप घेऊन आपल्या गावा बाहेर पडले आहेत, दुसरे गावात जाऊन ,चाऱ्याच्या शोधार्थ भटकंती करत आहेत, मेंढ्यांना शेळ्यांना चारा ,पाणी यांची आवश्यकता असल्याने नाविलाजाने आम्ही आमच्या घरून बाहेर पडलो आहे ,मात्र आम्ही गावाएेवजी ,शेतामध्ये रानामध्ये,वनामध्ये  एकांत मुक्काम करतो ,लॉक डाऊंनच्या नेमात राहतो ,मास्क वापरतो, गावात किंवा रस्त्याने जाण्याऐवजी आड बाजूने मेंढ्यांचे कळप घेऊन, चाऱ्याच्या शोधार्थ आम्ही जात असतो, लॉक डाऊन मुळे अनेक गावात  बाहेरील व्यक्तीला परवानगी नाही त्यामुळे आम्हीही  आडबाजूच्या रस्त्याने, माळरानात ,शेतात वस्ती करून तेथेच राहतो, लहान मुले व वयस्कर, वृद्ध माणसे यावर्षी आम्ही घरीच ठेवली आहेत, आम्हालाही कोरोनाची भीती आहे, आमच्या मेंढ्या ,शेळ्या यांनाही ही  कोरोणाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण घरी आमच्या शेतात मेंढ्या ,शेळ्यांना मुबलक चारा व पिण्यास पाणी नसल्यामुळे नाविलाजाने आम्हाला घराबाहेर, गावा बाहेर पडावे लागत आहे, घरी राहून या मेंढ्यांना चारा पाणी कुठून देणार। तसेच बाजारात विक्री करण्यासाठी ही बाजार बंदआहे, मग आम्ही काय करणार। असे सांगत आम्ही जवळजवळ चाळीस पंचेचाळीस दिवस गावात, घरातच कसेबसे काढले, मात्र आता शेळ्या-मेंढ्यांच्या पोटापाण्याचा विचार करून आम्ही एक एक किंवा दोघे घरातील माणसे बाहेर पडलो आहे, मेंढ्यांच्या चारा, पाण्यासाठी ते करणे भाग पडत आहे, लॉक डाऊन च्या या तिसऱ्या टप्प्यात रानोमाळ फिरणार्‍या भटकंती करणार्‍या, पोटापाण्यासाठी चारा पाण्यासाठी फिरणाऱ्या  मेंढपाळ साठी शासनाने लॉक डाऊनच्या नियमात थोडीशी आमच्यासाठी तरी शिथीलता करावी ,कारण आम्ही घरी किंवा आमच्या शेतात चारा पाण्याअभावी राहू शकत नाही ,त्यामुळे आम्हाला गावोगाव भटकंती करणे गरजेचे आहे, परंतु असे करताना आम्ही  गावाच्या बाहेर रानात, वनात मुक्काम करत असतो, कोणालाही  गर्दी किंवा त्रास होऊ नये म्हणून याची काळजी घेत आहे ,या गोष्टीचाही शासनाने विचार करावा,, असे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मेंढपाळ बोलताहेत ,अाता।अनेक मेंढपाळ ड्राय भागातून बागायत भागात आल्याचे दिसून येत आहे.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. मात्र नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. तसेच सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे अवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आयेाजित करण्यात आलेल्या बैठकीत संगमनेर शहर, धांदरफळ, कुरण, घुलेवाडीसह तालुक्यातील सर्व गावांचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, प्रांतधिकारी शशिकांत मंगळुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, पोलिस निरीक्षक अभय परमार, सुनिल पाटील, पी.वाय.कादरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदि बैठकीत उपस्थित होते.
            यावेळी ना.बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरातील हॉटस्पॉट तसेच धांदरफळ बु., कुरण, घुलेवाडी येथील परिस्थिती व प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आढावा घेतला. तसेच संगमनेर शहर व तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रशासनाला महत्वाच्या सूचना केल्या. याप्रसंगी ना.थोरात म्हणाले कि, कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. मागील दोन महिन्यांत लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. मात्र आता नागरिकांनी शासनाने लागू केलेल्या नियमांसह स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे आहे. कोरोनाचा मुकाबला आपण सतर्क राहुन करु या. नागरिकांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देवून प्रशासनाने काही कडक नियम केले आहेत. नागरिकांनी त्याचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना संकटात महसूल, पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांसह अनेक विभागांचे कर्मचारी व पदाधिकारी, स्वयंसेवक चांगले काम करत आहेत. या काळात तालुक्यातील नागरिकांनी सोशल डिस्टंन्सींगचे पालन करीत गरिब, रोजंदारीवरीलल मजूर व परप्रांतीय कामगार यांना मानवतेच्या भावनेतून चांगले सहकार्य केले आहे. हे काम कौतूकास्पद आहे. आपण राज्यपातळीवर काम करतांना मदत कक्षातून परप्रांतीय मजूर, गोरगरिब यांच्यासाठी सातत्याने काम करत असून दररोज जिल्हानिहाय मदतकार्याचा आढावा घेत आहे. नागरिकांच्या मिळालेल्या सहकार्यातून अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी. धांदरफळ, कुरण, संगमनेर शहर व हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
            आ.डॉ.तांबे म्हणाले कि, कोरोना संकटात अनेक शासकीय विभागांचे कर्मचारी सेवा देत आहेत. या सर्वांच्या आरोग्य विम्याबाबत अधिक काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. पावसाळयाच्या सुरुवातीला दरवर्षीप्रमाणे सर्दी, ताप, खोकल्याची साथ येवू शकते. यामुळे घाबरुन न जाता आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, ग्रामीण भागात नागरिकांनी मोठी काळजी घेतली आहे. शहरात अनेक स्वयंसेवक गोरगरिबांना अन्न पाकिटे पुरविण्याचे काम करत आहेत. भाजीपाल्यासह अत्यावश्यक सेवा ऑनलाईन मागणीद्वारे पुरविले जात आहे.  सध्याच्या काळात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असेही त्या म्हणाल्या.  यावेळी प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे यांनी कोरोनाचे रुग्ण, तालुक्यातील क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती, त्यांना दिलेल्या सुविधा यासोबत प्रशासनाने केलेल्या कोरोना प्रतिबांधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. तहसीलदार अमोल निकम यांनी परप्रांतीय मजूर व त्यांची सद्य परिस्थिती याबाबत माहिती दिली.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)
 राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे  छत्रपती संभाजी महाराज  जयंतीनिमित्त  नगर-मनमाड रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या परप्रांतीयांना अन्नदान व पाण्याचे बाटल्या  वाटप करून आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात आली,सध्या कोरोणाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरू असून लाकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक परप्रांतीय आपापल्या राज्यात परत जात आहेत, काही बसेस ,काही रेल्वेने, काही आपापल्या साधनाने आपापल्या राज्यात परतत आहेत, मात्र काही आपल्या मोटर सायकलवर ,सायकलवर, तर कोणी पायी जाताना नगर-मनमाड महामार्गावर दिसत आहे, आशा पायी सायकलवर, मोटरसायकलवर ,रिक्षा किंवा इतर साधनाने नगर-मनमाड रस्त्यावरून परराज्यात जाणाऱ्या परप्रांतीयांना सावळीविहीर येथील शिवसेना शाखेच्या वतीने भोजन देण्यात आले, तसेच कडक उन्हाळा असल्यामुळे परप्रांतीयांना पिण्याचे पाणी रस्त्याने सर्व हॉटेल्स दुकाने बंद असल्यामुळे मिळणे मुश्किल होते ,अशावेळी येथील शिवसेना शाखेच्या वतीने भोजना बरोबरच पाण्याच्या बाटल्याही या परप्रांतीयांना मोफत वाटप करण्यात आल्या, छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मिरवणूक व इतर कार्यक्रम लॉकडाऊन मुळे बंद आहेत, हे सर्व कार्यक्रम रद्द करून या कार्यक्रमाचा खर्च सावळीविहीर बुद्रुक शिवसेना शाखेच्या वतीने परप्रांतीयांना अन्नदान करून खर्च करण्यात आला ,हा उपक्रम काल दिवसभर येथे राबविण्यात आला, या उपक्रमासाठी सावळीविहीर येथील शिवसेनेचे किरण जपे, दिनेश आरणे ,  निखिल कापसे, सागर आरणे, विशाल वर्पे ,सौरभ पळसे ,गणेश कापसे ,अतुल चव्हाण,भूषण औटी, विवेक जपे आदींनी परिश्रम घेतले.

शिर्डी (राजेंद्र।गडकरी)
सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू असताना व देश, राज्य मोठ्या संकटातून जात असताना सर्व कार्यक्रम, समारंभ  बंद आहेत, त्यामुळे अनेकांचे लग्न ,वाढदिवस, समारंभ रद्द किंवा साध्या पद्धतीने होत आहेत, अशाच सावळीविहीर येथील किरण राजेंद्र आगलावे यांनी आपला वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून साध्या पद्धतीने व येणाऱ्या जाणाऱ्यांना मास्कचे मोफत वाटप करुन साजरा करण्यात आला,
सध्या लॉग डॉउन मुळे सर्व धार्मिक तसेच लग्न, समारंभ वाढदिवस व विविध कार्यक्रम बंद आहेत, सध्या लग्नसराई असतानाही लग्न रद्द होतायेत किंवा अगदी दहा-बारा लोकांच्या उपस्थितीत लग्न लागत आहेत, तसेच वाढदिवसाचे ही मोठ्या प्रमाणात होणारे कार्यक्रम रद्द होत आहेत ,असेच सावळीविहीर येथील सामाजिक कार्यकर्ते किरण राजेंद्र आगलावे यांनी आपला वाढदिवस अगदी रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना ज्याना मास्क नाही ,अशांना थांबवून मोफत मास्क वाटप केले, तसेच लॉकडाऊन चे नियम त्यांना समजून सांगण्यात आले, आपल्या वाढदिवसानिमित्त दिवसभर त्यांनी व त्यांच्या काही मोजक्या एक-दोन मित्रांनी व शिवप्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी लॉक डॉउन चे नियम पाळत हा कार्यक्रम नगर-मनमाड रस्त्यावर सावळीविहीर येथे राबवला व आपला वाढदिवस अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला ,या उपक्रमाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे,

श्रीरामपूर (प्रतिनिधी)  व्यापारी व जनतेच्या मागणीवरून नगरपालिकेने शहरातील दुकाने सुरू केली आहेत. गेल्या दोन दिवसापासून शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद या कामी मिळत आहे. नगरपालिकेने चांगले नियोजन केले आहे. परंतु शहराच्या बऱ्याच भागांमध्ये रस्ते बंद असल्यामुळे लोकांना बाजारपेठेत यायला मोठा त्रास होत आहे. विशेषतः दवाखान्यामध्ये जाणाऱ्या रुग्णांना हे अडथळ्यांचे अग्निदिव्य पार करावे लागत आहे. तरी नगरपालिकेने आणि पोलिस प्रशासनाने तातडीने शहरातील बंद असलेले महत्त्वाचे रस्ते अडथळे दूर करून सुरू करावेत अशी मागणी श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक ताराचंद रणदिवे यांनी केली आहे.
 दोन दिवसापूर्वी नगरपालिकेने व्यापारी असोसिएशनच्या मागणीवरून चांगल्या प्रकारचे नियोजन करून श्रीरामपुर शहरातील बाजारपेठ जनतेसाठी खुली केली आहे. जनता जनार्दन सुद्धा नगरपालिकेच्या नियोजनाला मनापासून दाद देत असून निश्चित केलेले सर्व नियमांचे पालन केले जात आहे. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी सुद्धा शहरातील बाजारपेठ सुरळीत सुरु झाली. परंतु हे होत असताना शहरातील बरेच रस्ते अद्याप ही बंद आहेत. गोंधवणी, संजय नगर, मिल्लत नगर या भागाला जोडणारा गोंधवणी रोड सय्यद बाबा चौकापासून दशमेश चौकापर्यंत तीन ठिकाणी अद्याप बंद आहे. महत्वाच्या हॉस्पिटल कडे जाणारे शहरातील अनेक रस्ते बंद आहेत .त्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी फार मोठा वळसा घालून रुग्णांना यावे लागत आहे. त्यातून अनेक रुग्णांचे जीवाचे हाल होत आहेत. म्हणून हे जे रस्ते बंद केलेले आहेत ते सुरू करावेत. बाजारपेठ खुली केली आहे तर रस्ते बंद ठेवण्याला काही अर्थ नाही. संध्याकाळी पाच नंतर ते बंद करण्याची देखील व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी ही नगरसेवक ताराचंद रणदिवे यांनी केली आहे .
 

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबईच्या घाटकोपर येथे राहत असलेल्या 30 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेले सात व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल गुरूवारी रात्री उशीरा प्राप्त झाले. त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यातील 30 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.करोना बाधित महिला आणि तिचा पती हे मुंबईत घाटकोपर येथे राहत असून प्रवासात जास्त त्रास जाणवू लागल्याने तिला नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करून तिची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तिला सर्दी, ताप आणि खोकला याचा त्रास जाणवत होता. तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यात ती बाधित असल्याचे आढळले.मात्र, तिच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला असून तो सध्या मुंबईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. घाटकोपर येथून त्यांना त्यांच्या मूळ गावी (पाथर्डी तालुक्यात) परतायचे होते. मात्र, वाटेत या महिलेला त्रास जाणवत होता. नगरमध्ये आल्यावर त्रास वाढल्याने संबधीत महिलेची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेतली आणि स्त्राव घेवून चाचणीसाठी पाठविण्यात आला. त्यात ती महिला बाधित असल्याचे आढळून आले. यापूर्वीही जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून आलेली व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले होते. तो बाधित रुग्ण आष्टी (जि. बीड) येथील होता. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालय आणि बूथ हॉस्पिटल मध्ये उपचार केले होते.दरम्यान गुरूवारी रात्री उशीरा 19 व्यक्तींचे घशातील स्त्राव शुक्रवारी रात्री पुण्याला पाठविण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत 60 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या असून त्यापैकी 40 व्यक्ती बर्‍या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 4 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1 हजार 799 व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 694 स्त्राव निगेटिव्ह आले आहेत. सध्या 13 रुग्ण बूथ हॉस्पिटल मध्ये तर 3 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget