शिर्डी (राजेंद्र।गडकरी)
सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू असताना व देश, राज्य मोठ्या संकटातून जात असताना सर्व कार्यक्रम, समारंभ बंद आहेत, त्यामुळे अनेकांचे लग्न ,वाढदिवस, समारंभ रद्द किंवा साध्या पद्धतीने होत आहेत, अशाच सावळीविहीर येथील किरण राजेंद्र आगलावे यांनी आपला वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून साध्या पद्धतीने व येणाऱ्या जाणाऱ्यांना मास्कचे मोफत वाटप करुन साजरा करण्यात आला,
सध्या लॉग डॉउन मुळे सर्व धार्मिक तसेच लग्न, समारंभ वाढदिवस व विविध कार्यक्रम बंद आहेत, सध्या लग्नसराई असतानाही लग्न रद्द होतायेत किंवा अगदी दहा-बारा लोकांच्या उपस्थितीत लग्न लागत आहेत, तसेच वाढदिवसाचे ही मोठ्या प्रमाणात होणारे कार्यक्रम रद्द होत आहेत ,असेच सावळीविहीर येथील सामाजिक कार्यकर्ते किरण राजेंद्र आगलावे यांनी आपला वाढदिवस अगदी रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना ज्याना मास्क नाही ,अशांना थांबवून मोफत मास्क वाटप केले, तसेच लॉकडाऊन चे नियम त्यांना समजून सांगण्यात आले, आपल्या वाढदिवसानिमित्त दिवसभर त्यांनी व त्यांच्या काही मोजक्या एक-दोन मित्रांनी व शिवप्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी लॉक डॉउन चे नियम पाळत हा कार्यक्रम नगर-मनमाड रस्त्यावर सावळीविहीर येथे राबवला व आपला वाढदिवस अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला ,या उपक्रमाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे,
Post a Comment