बाजारपेठ उघडली आता रस्ते मोकळे करा,नगरसेवक रणदिवे यांचा घरचा आहेर.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)  व्यापारी व जनतेच्या मागणीवरून नगरपालिकेने शहरातील दुकाने सुरू केली आहेत. गेल्या दोन दिवसापासून शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद या कामी मिळत आहे. नगरपालिकेने चांगले नियोजन केले आहे. परंतु शहराच्या बऱ्याच भागांमध्ये रस्ते बंद असल्यामुळे लोकांना बाजारपेठेत यायला मोठा त्रास होत आहे. विशेषतः दवाखान्यामध्ये जाणाऱ्या रुग्णांना हे अडथळ्यांचे अग्निदिव्य पार करावे लागत आहे. तरी नगरपालिकेने आणि पोलिस प्रशासनाने तातडीने शहरातील बंद असलेले महत्त्वाचे रस्ते अडथळे दूर करून सुरू करावेत अशी मागणी श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक ताराचंद रणदिवे यांनी केली आहे.
 दोन दिवसापूर्वी नगरपालिकेने व्यापारी असोसिएशनच्या मागणीवरून चांगल्या प्रकारचे नियोजन करून श्रीरामपुर शहरातील बाजारपेठ जनतेसाठी खुली केली आहे. जनता जनार्दन सुद्धा नगरपालिकेच्या नियोजनाला मनापासून दाद देत असून निश्चित केलेले सर्व नियमांचे पालन केले जात आहे. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी सुद्धा शहरातील बाजारपेठ सुरळीत सुरु झाली. परंतु हे होत असताना शहरातील बरेच रस्ते अद्याप ही बंद आहेत. गोंधवणी, संजय नगर, मिल्लत नगर या भागाला जोडणारा गोंधवणी रोड सय्यद बाबा चौकापासून दशमेश चौकापर्यंत तीन ठिकाणी अद्याप बंद आहे. महत्वाच्या हॉस्पिटल कडे जाणारे शहरातील अनेक रस्ते बंद आहेत .त्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी फार मोठा वळसा घालून रुग्णांना यावे लागत आहे. त्यातून अनेक रुग्णांचे जीवाचे हाल होत आहेत. म्हणून हे जे रस्ते बंद केलेले आहेत ते सुरू करावेत. बाजारपेठ खुली केली आहे तर रस्ते बंद ठेवण्याला काही अर्थ नाही. संध्याकाळी पाच नंतर ते बंद करण्याची देखील व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी ही नगरसेवक ताराचंद रणदिवे यांनी केली आहे .
 
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget