शिर्डी (राजेंद्र गडकरी)
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त नगर-मनमाड रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या परप्रांतीयांना अन्नदान व पाण्याचे बाटल्या वाटप करून आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात आली,सध्या कोरोणाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरू असून लाकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक परप्रांतीय आपापल्या राज्यात परत जात आहेत, काही बसेस ,काही रेल्वेने, काही आपापल्या साधनाने आपापल्या राज्यात परतत आहेत, मात्र काही आपल्या मोटर सायकलवर ,सायकलवर, तर कोणी पायी जाताना नगर-मनमाड महामार्गावर दिसत आहे, आशा पायी सायकलवर, मोटरसायकलवर ,रिक्षा किंवा इतर साधनाने नगर-मनमाड रस्त्यावरून परराज्यात जाणाऱ्या परप्रांतीयांना सावळीविहीर येथील शिवसेना शाखेच्या वतीने भोजन देण्यात आले, तसेच कडक उन्हाळा असल्यामुळे परप्रांतीयांना पिण्याचे पाणी रस्त्याने सर्व हॉटेल्स दुकाने बंद असल्यामुळे मिळणे मुश्किल होते ,अशावेळी येथील शिवसेना शाखेच्या वतीने भोजना बरोबरच पाण्याच्या बाटल्याही या परप्रांतीयांना मोफत वाटप करण्यात आल्या, छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मिरवणूक व इतर कार्यक्रम लॉकडाऊन मुळे बंद आहेत, हे सर्व कार्यक्रम रद्द करून या कार्यक्रमाचा खर्च सावळीविहीर बुद्रुक शिवसेना शाखेच्या वतीने परप्रांतीयांना अन्नदान करून खर्च करण्यात आला ,हा उपक्रम काल दिवसभर येथे राबविण्यात आला, या उपक्रमासाठी सावळीविहीर येथील शिवसेनेचे किरण जपे, दिनेश आरणे , निखिल कापसे, सागर आरणे, विशाल वर्पे ,सौरभ पळसे ,गणेश कापसे ,अतुल चव्हाण,भूषण औटी, विवेक जपे आदींनी परिश्रम घेतले.
Post a Comment