शिर्डी (जितेश लोकचंदानी)-देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असून देशातील सर्व मंदिरे बंद आहेत ,शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद असून येथे तरीही ही ऑनलाईन देणगी मोठ्या स्वरूपात मिळत आहे, श्री साईबाबा संस्थान मध्ये सुमारे सहा हजार कर्मचारी असून त्यांना पगार वेळेवर मिळत आहे, मात्र एक वृत्तपत्र व एका वृत्त वाहिनी वर साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या काळातील एप्रिल महिन्यात येथे देणगीचा ओघ कमी झाल्यामुळे स्वतःची एफडी मोडून साई संस्थानला कर्मचाऱ्यांचा पगार करावा लागला, असे वृत्त देण्यात आले आहे, व श्री साईबाबा संस्थान ने आपल्या गुंतवणुकीतून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार केल्याचे त्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीने म्हटले होते, मात्र हे वृत्त चुकीचे असून या वृत्ताची दखल घेऊन व चौकशी करून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय संस्थान प्रशासन घेईल, या एका वृत्तपत्रातील चुकीच्या वृत्तामुळे श्री साईबाबा संस्थान चे प्रशासन अधिकारी, कर्मचारी व साईभक्त त्यांच्यामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली होती ,पण या वृत्तपत्रातील या निराधार वृत्ताचे खंडन श्री साईबाबा संस्थान चे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी केले आहे, तसेच अशा प्रकारचे कोणतेही वृत्त आम्ही कोणत्याही वृत्तपत्राला व वृत्त वाहिनीला दिलेले नसून हे वृत्त चुकीचे असल्याचे श्री साईबाबा संस्थान चे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले,देशात लॉक डाऊन मुळे सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद आहेत, देशात शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर 17 मार्च दुपारी तीन वाजेपासून साईभक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे, त्यामुळे येथे साईभक्त येणे बंद झाले आहे, तरी येथे न येता करोडो साईभक्त दररोज ऑनलाईन दर्शन घेत असतात तसेच ऑनलाईन देणगी श्रीसाईबाबा संस्थानला पाठवत असतात, श्री साईबाबांवर करोडो साईभक्तांची श्रद्धा असल्यामुळेच साई संस्थानला देणगीचा ओघ सुरूच आहे, लॉकडाउनच्या काळातही श्री साईबाबा संस्थानला देणगी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन सुरू आहे तसेच श्रीसाईबाबा संस्थांकडे गंगाजळी मोठ्या स्वरूपात आहे, मात्र श्री साईबाबा संस्थानने लॉकडाउनच्या काळात देणगीचा ओघ कमी पडल्यामुळे आपल्या सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार स्वतःची एफडी मोडून केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे, हे वृत्त प्रसिद्ध व वृत्त वाहिनी वर प्रसारित होताच श्री संस्थानच्या कर्मचारी, अधिकारी, तसेच साईभक्त व शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली होती, या संदर्भात श्री साईबाबा संस्थांनचे जनसंपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता या वृत्तपत्र व वाहिनित निराधार वृत्ताचे त्यांनी खंडन करत असे कोणतेही प्रकार साई संस्थांनी केला नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच या संदर्भात साई संस्थांनचे उपकार्यकारी अधिकारी श्री रवींद्र ठाकरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने असे कोणतेही ही वृत्त कोणत्याही वृत्तपत्रांना दिलेले नाही,या वृत्ताचे त्यांनी खंडन करत असे वृत्त चुकीचे आहे, असे सांगितले, या वृत्ताचे खंडन केल्यामुळे शिर्डी व परिसरात व साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांमध्ये या वृत्तामुळे निर्माण झालेली भीती दूर झाली आहे, देशात तिरुपती नंतर शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान सर्वात श्रीमंत असे देवस्थान आहे येथे सुमारे 2500 कोटी रुपयांची संस्थांची ठेव असल्याचे बोलले जाते, तसेच श्रीसाईबाबा संस्थांकडे साई भक्तांनी दिलेल्या देणगीतून विविध मुकुट, हार ,भांडी अशा विविध वस्तू सोन्या-चांदीच्या आहेत, साई संस्थांनकडे मोठ्या प्रमाणात निधी आहे, श्री साईबाबा संस्थान चे कर्मचारी-अधिकारी यांना यापुढे कधीही ही पगार देणेकामी संस्थानला कधी अडचण येणार नाही ,असे अनेक साई संस्थांनचे कर्मचारी ,अधिकारी तसेच शिर्डी कर व साईभक्त खाजगीत बोलत आहेत.
Post a Comment