साठवण तलावांमध्ये मृतदेह सापडल्यामुळे शहरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क केला असता दोन दिवसापूर्वी सदर इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून आज तो मृतदेह वर आला होता. त्यामुळे तो तातडीने पाण्याबाहेर काढण्यात आला. पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासीयांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही अशी माहिती नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या संदर्भात माहिती घेण्यासाठी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी इत्यादींना वारंवार संपर्क करूनही त्यांचे फोन लागत नव्हते. ज्यांचे वाजत होते, त्यांनी फोनच घेतला नाही. त्यामुळे आमच्या प्रतिनिधीने साठवण तलावावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता नवीन साठवण तलावांमध्ये कॅनलमधून पाणी येण्याचे सुरू असून तलाव जवळजवळ भरत आला आहे . तेथील कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता तलावांमध्ये ब्लिचिंग पावडर च्या गोण्या सोडून पाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासीयांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगण्यात आले.
तलावाची सुरक्षा वाऱ्यावर
दरम्यान साठवण तलावाच्या संरक्षण भिंतीची एक बाजू तुटली असून पाण्याच्या टाकीजवळ भिंत तुटल्याने बाहेरचे लोक सर्रास तेथे शिरतात. टाकीवर बसून जुगार खेळतात.तेथील तलावाला वर लावलेली सुरक्षा जाळी सुद्धा तुटलेली आढळली. कोणताही वाचमेन तेथे नव्हता .शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाच्या सुरक्षेबद्दल खूपच हलगर्जीपणा होत असून याबाबत नगरपालिकेने तातडीने पावले उचलण्याची मागणी शहरातील जागरुक नागरिकांनी केली आहे .
Post a Comment