Latest Post


श्रीरामपूर (प्रतिनिधी)- 51 दिवसांच्या लॉकडाऊननंतर आजपासून श्रीरामपुरातील दुकाने शासकीय नियम पाळून सुरू होणार आहेत. पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी तसा आदेशही जारी केला आहे. श्रीरामपूर शहारातील दुकाने सुरु करावी यासाठी व्यापार असोसिएशनने महसूल अधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यापूर्वी आ. लहू कानडे, खा. सदाशिव लोखंडे यांनी व्यापारी व प्रशासकीय-अधिकार्‍यांच्या तीन-चार बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.काल दुपारी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रांताधिकारी अनिल पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे बोलणे करून दिल्यानंतर ना. थोरात यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांना आदेश देऊन नियमाचे पालन करून व्यावसाय सुरु करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रांताधिकार्‍यांनी तहसीलदार व पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना आदेश केल्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी काल रात्री उशिरा हा आदेश जारी केला आहे.शासनाकडून ठरवून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करून आजपासून दुकाने सुरू होतील. त्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार गांधी पुतळा ते बेलापूर वेस पर्यंत पश्चिम दिशेला तोंड असणारी दुकाने, शिवाजी रोड ते गोंधवणी महादेव मंदिरापर्यंत पश्चिम दिशेला तोंड असणारी दुकाने, नेवासा रोड ओव्हरब्रीज पासून संगमनेर रोड नाकापर्यंत दक्षिण दिशेला तोंड असणारी दुकाने तसेच इतर आतील रोडवरील पश्चिम व दक्षिण दिशेला तोंड असणारी दुकाने सुरू राहतील.तसेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवार गांधी पुतळा ते बेलापूर रोड वेस पर्यंत पूर्व दिशेला तोंड असणारी दुकाने, शिवाजी रोड ते गोंधवणी महादेव मंदिरापर्यंत पूर्व दिशेला तोंड असणारी दुकाने, नेवासा रोड ओव्हरब्रिज पासून संगमनेर रोड नाकापर्यंत उत्तर दिशेला तोंड असणारी दुकाने तसेच इतर आतील रोडवरील पूर्व व उत्तर दिशेला तोंड असणारे दुकाने सुरू राहतील. रविवारी सर्व भागातील दुकाने बंद राहतील.हॉटेल, रेस्टॉरंट, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, पान स्टॉल, चहा कॉफीची दुकाने, रसवंती, शीतपेय, भेळ, वडापाव व इतर खाद्यपदार्थ विकणार्‍या गाड्या आदी दुकाने मात्र बंद राहतील. प्रत्येकाने या अटी व शर्तीचे पालन करणे गरजेचे आहे. ग्राहकांनी तोंडावरती मास्क बांधलेला असेल तरच त्यांना खरेदीसाठी प्रवेश द्यावा, दुकानांमध्ये एका वेळी फक्त पाच ग्राहक खरेदीसाठी सोडण्यात यावे.दुकानाच्या प्रवेश द्वारावर शक्यतो ग्राहकांच्या थर्मल स्कॅनिंगची सुविधा करण्यात यावी, दुकानात प्रवेशावेळी सर्व ग्राहकांना हॅण्डवॉश व सॅनिटायझरची सुविधा करण्यात यावी, होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना दुकानात प्रवेश देण्यात येऊ नये, शक्यतो 5 वर्षापर्यंत व 60 वर्षावरील व्यक्तींना दुकानात प्रवेश देण्याचे टाळावे, कामगारांच्या एकूण क्षमतेच्या 33 टक्के कामगारांचा वापर करावा, दुकान मालक व कामगार यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील, सर्व आस्थापना यांनी त्यांच्या दुकानात एक रजिस्टर ठेवावे.त्यामध्ये येणार्‍या ग्राहकांची संपूर्ण माहिती नमूद करणे बंधनकारक आहे, दुकानात व दुकानाबाहेर सामाजिक अंतर सोशल डिस्टन्स ठेवण्यात यावे, अत्यावश्यक सेवा व शेतीविषयक बाबी दररोज सुरू राहतील, आस्थापना चालक, मालक, कर्मचारी, कामगार यांनी आरोग्य सेतू वापरणे बंधनकारक राहील, कोणत्याही दुकानदाराने तसेच ग्राहकाने आपले दुचाकी व चारचाकी वाहन दुकानापर्यंत न नेता बाहेर निश्चित केलेल्या पार्किंगमध्ये पार्क करावे, दुकान मालकांनी ग्राहकांना शक्यतो ई-पेमेंट करण्याचा आग्रह धरावा.सर्व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत चालू राहतील. वरील नमूद केलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे. इतर बाबींसाठी यापूर्वी लागू करण्यात आलेले निर्बंध जसेच्या तसे लागू आहे. त्याचे पालन करणे बंधनकारक राहिल. तसेच वरीलप्रमाणे अटी व शर्तींचे पालन न करणार्‍या आस्थापना तात्काळ बंद करण्यात येऊन त्यांच्या विरोधात दंडात्मक व फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
     ही दुकाने राहणार बंद
हॉटेल,रेस्टॉरंट, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, पान स्टॉल, चहा कॉफीची दुकाने, रसवंती, शीतपेय, भेळ, वडापाव व इतर खाद्यपदार्थ विकणार्‍या गाड्या आदी दुकाने बंद राहणार आहेत.
    लक्ष ठेवण्यासाठी पथकांची नियुक्ती
दुकान चालकांवर लक्ष ठेवण्यासाठी नगरपालिकेकडून विविध प्रभागांमध्ये एक प्रमुख अधिकारी व त्यांना सहाय्य करण्यासाठी काही अधिकार्‍यांची पथके तयार करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकावर लक्ष ठेवले जाणार आहे. वरील नियम व अटींचे जो पालन करणार नाही, त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

शिर्डी,प्रतिनिधी जय शर्मा )दि.12 : जगासह देशात व महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यावर येऊ पहात असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ही  उपाययोजना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून शहर व तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता घरीच सुरक्षित थांबावे, असे अवाहान राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
कोरोना बाबत संगमनेरातील जनतेला अवाहन करताना नामदार थोरात म्हणाले की, कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. कोरोना हा अदृश्य शत्रू असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, मास्क वापरणे याचबरोबर गर्दी करणे टाळणे व विनाकारण घराबाहेर पडणे टाळणे हे अत्यावश्यक आहे. या नियमांचे पालन केले तर आपण निश्चितच कोरोनाची साखळी तोडू शकतो. कोरोना संसर्ग तिसऱ्या टप्प्यावर येऊ नये आणि तो रोखण्यासाठी देशात महाराष्ट्रात व तालुक्यात कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत गरजेचे आहे. मागील दीड महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन असून महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रादूर्भाव थांबवण्यासाठी प्रभावी आणि अत्यंत चांगले काम केले आहे. प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि इतर सर्व शासकीय कर्मचारी अत्यंत सेवाभावीपणे आपले काम करत आहे. या सर्वांना संपूर्ण सहकार्य करणे प्रत्येक नागरिकांचे मुलभूत कर्तव्य आहे. आपण घरीच थांबलो तर या सर्वांवरील ताण कमी होईल. अशा संकटाच्या काळात आपण सरकारच्या सोबत राहणे गरजेचे आहे.
            संगमनेर तालुक्यात व शहरात कोरोनाचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये हॉटस्पॉट जाहीर करून लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे  काही ठिकाणचे भाग सील केले गेले आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा पसरविल्या जात असून नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अफवा पसरवणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल असे सूतोवाच त्यांनी केले. तसेच नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेबरोबर कुटुंबियांच्या सुरक्षिततेकरीता स्वतः घरी थांबा, विनाकारण घराबाहेर पडणे टाळा आणि मास्कचा वापर करा  असे आवाहनही केले. शासन व प्रशासन आपल्यासाठी काम करत आहे. संगमनेर शहर, कुरण,  धांदरफळ, घुलेवाडी या परिसरातील नागरिकांना नामदार थोरात यांनी दिलासा दिला आहे. या सर्व परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून असून प्रशासनाला वेळोवेळी सूचना देत आहोत. आपल्या सर्वांची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही नामदार थोरात यांनी केली आहे.

शिर्डी,दि.12 : कोरोना व्हायरस संक्रमणाविरुध्द देश आणि राज्यपातळीवर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक यांना प्रशासनातर्फे कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांनांची माहिती व्हावी तसेच त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी कोपरगांव पंचायत समितीमार्फत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय विद्यार्थी मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते.
            कोपरगांव शहर आणि तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे सहभागातून कोविड-2019 संबंधी समाजातील सर्व स्तरातून जागृती व प्रबोधन करणारे संदेश व्हाटसृ ॲपच्या माध्यमातून पाठविण्यात आले, दूरध्वनी व मोबाईलद्वारे कोविड-2019 संबधी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांशी  शिक्षक व  मुख्याध्यापक यांनी चर्चा केली.  दिनांक 16 एप्रिल ते 3 मे, 2020 या कालावधीत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्ये स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा  व हस्ताक्षर स्पर्धा उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी आयोजीत करण्यात आलेले उपक्रम पूर्णपणे त्यांच्या घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यातून करण्यात आले होते. ‍विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी कोणतेही वेगळे साहित्य विकत आणावे लागले नाही हे या स्पर्धेचे वैशिष्टय होते. कोरोना व्हायरसबद्दल जनजागृती करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांना स्वयंअध्ययनास प्रवृत्त करणे हा राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा उददेश होता.
               स्पर्धांसाठी खालीलप्रमाणे इयत्ता 1 ते 5 साठी  प्राथमिक गट, इयत्ता 6 ते 8 साठी  उच्च प्राथमिक गट,  इयत्ता 9 ते 10 साठी माध्यमिक  गट आणि इयत्ता 11 ते 12  साठी  उच्च माध्यमिक गट तयार करण्यात आले होते. शाळास्तर स्पर्धांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांनी गटनिहाय शाळेतील प्रथम क्रमांकाच्या रांगोळी, चित्रकला, निबंध, घोषवाक्ये, कविता लेखन व हस्ताक्षर यांचा फोटो केंद्रप्रमुख यांचेकडे पाठवला. केंद्रप्रमुख यांनी गटनिहाय केंद्रातून प्रथम क्रमांकाचा फोटो तालुकास्तरावरील स्पर्धा समितीकडे पाठवला. यामधून तालुकास्तर समितीकडून स्पर्धानिहाय व  गटनिहाय प्रथम तीन क्रमांक निश्चित करण्यात आले. विजयी स्पर्धकांना प्रशासनाच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. उपक्रमांच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख,  शिक्षण विस्तार अधिकारी व गटसाधन केंद्र कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले. शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे शिर्डी, कोपरगांवचे तहसिलदार योगेश चंद्रे व पंचायत समिती गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- पोहण्यास गेलेला दहा वर्ष वयाच्या मुलाचा बेलापूर पढेगाव रोडवर असणार्या खटकाळी गावठाण येथील खाणीत असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू  झाला   असुन या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबत समजलेली हाकीकत अशि की खटकाळी गावठाण येथील आदित्य विकास जगताप वय वर्ष १० हा मित्रा समवेत दुपारी २ .३० वाजेच्या सुमारास पोहोण्यास गेला होता पोहत असताना दम तुटल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला ही घटना परिसरात समजताच सुनिल खरात दादु जागताप बाळू जगताप सुमीत ऋषीकेश जींतेंद्र यांनी पाण्यात शोध घेतला अखेर सायंकाळी सहा वाजता त्याचा मृतदेहा सापडला पोलीस नाईक ढोकणे पोपट भोईटे  यांनी त्यास दवाखान्यात  हलविले तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषीत केले त्याच्या पश्चात एक भाऊ तीन बहीणी आई आहेत   या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

'उम्मती फाउंडेशन' तर्फे श्रीरामपुर शहरातील प्रख्यात मधुमेह व हृदयविकारतज्ञ डॉ.दिलीप पडघन यांना नुकतेच  'कोव्हीड वारीअर' या पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उम्मती फाउंडेशनने सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आरोग्यदूतांना सन्मानित करण्याचा एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
        याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपुर शहरात १० एप्रिल रोजी एका करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे डॉ.दिलीप पडघन व प्रयोगशाळा अधिकारी श्री.दिलीप डोखे यांना २८ दिवस क्वारंटाईन राहावे लागले होते. या दोघांनी सदर कोरोना बाधित रुग्णास स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता तात्काळ रुग्णसेवा दिली होती. आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना क्वारंटाईन राहावे लागले होते. अशा आरोग्यदूतांना प्रोत्साहन मिळावे या प्रामाणीक हेतूनेच 'उम्मती'चे अध्यक्ष श्री.सोहेल बारूदवाला यांनी या डॉक्टर द्वयींचा यथायोग्य सन्मान केला. यावेळी डॉ.पडघन व डोखे यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
        सत्कारमूर्ती डॉ.दिलीप पडघन यांनी यावेळी 'उम्मती'च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. आवश्यक खबरदारी घेऊन यथायोग्य रुग्णसेवा देऊनही  क्वारंटाईन राहावे लागले याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच अश्यावेळी समाजाने व माध्यमांनीही अफवा न पसरविता कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करण्याऱ्या आरोग्यदूतांच्या पाठीशी उभे राहावे असा सल्लाही दिला. तसेच क्वारंटाईन कालावधीत त्यांना सहकार्य केलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.जमधडे, इतर स्टाफ व मित्र आप्तेष्टांचे त्यांनी विशेष आभार मानले.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तौफिक शेख यांनी केले, तर फिरोज पठाण व सोनू शेख यांनी डॉक्टरांना उम्मती व समस्त मुस्लिम समाजातर्फे पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

शिरडी (राजेंद्र गडकरी)
शिरडी येथील साई निर्माण ज्युनियर कॉलेज मध्ये ११कॉमर्स मध्ये गौरव जितेश लोकचंदानी हा प्रथम आला आहे,गौरव याला ९२%गुण मिळाले आहे,
येथे इंग्रजीमाध्यमात तो शिकत असुन सुमारे ११वीच्या।तिन्ही शाखेतील १५०विद्यार्थी पैकी गौरव पहीला आला आहे,त्यास प्राचार्य विकास चौधरी, प्रा,मुकेश माळवदे,रमेश काकडे,नवनाथ।वाणी,यांचे मोलाचे मार्गदशर्न लाभले,गौरवला१०वीतही  ९५ %गुण मिळाले होते,तो पहीलीपासुन इंग्रजीमाध्यामातून शिकत आहे,
गौरवचे या यशाबद्दल साई निर्माण ग्रुपचे अध्यश विजयराव कोते, कमलाकर कोते,अभय शेळके, कैलास कोते,राजेंद्र गोंदकर,अविनाश शेजवळ,मनोज लोढा डॉ,राजेद्रं पिपाडा,,जनमत मराठी चनलचे  संपादक राजेद्रं आंबरे,बिनधास्त न्युजचे सपादकं अस्लम बिनसाद,नगर अर्बंचे मॅनेजर सुनील सरोदे,दैनिक साईदर्शन चे  उपसंपादक राजेद्रं गडकरी,तसेच पत्रकार,शिक्षक,आदीसह शिरडी व परिसरातून अभिंनदन केले जात आहे.

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची माहिती
श्रीरामपूर (वार्ताहर) श्रीरामपूरातील व्यवहार सुरळीत चालू करणेकामी मर्चंट असोसिएशनी प्रशासनाला दिलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांनी त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार लहू कानडे यांच्याकडे केली आहे. करण ससाणे यांनी नामदार थोरात यांच्याशी संपर्क साधून श्रीरामपुरातील व्यवहार सुरळीत चालू होणेकरिता मर्चंट असोसिएशनच्या प्रस्तावावर त्वरित निर्णय घेणेकरिता जिल्हाधिकारी यांच्याशी बोलण्याची विनंती केली. यावर नामदार थोरात यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्या प्रस्तावावर त्वरित निर्णय घेण्याचा सूचना केल्या आहेत.
             गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग अडचणीत सापडला आहे. संकटाच्या काळात श्रीरामपुरातील व्यापारी वर्ग सर्वसामान्य जनतेसोबत राहिला त्यामुळे आता सर्व नियमांचे पालन करुन मार्केट मधील दुकानं चालू करावे याकरिता खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार लहू कानडे यांच्या समवेत बैठका पार पडल्या त्यामध्ये माझ्यासह सर्वच पदाधिकारी उपस्थित होते आणि सर्वांचीच भावना होती की, श्रीरामपूरातील व्यवहार चालू व्हावेत. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार मर्चंट असोसिएशनी आपला प्रस्ताव प्रांताधिकारी अनिल पवार यांच्याकडे सादर केला. तो प्रस्ताव प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे.
             सदरच्या प्रस्तावावर त्वरित निर्णय घेण्यासाठी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांची भेट घेऊन नामदार  बाळासाहेब थोरातांशी फोनवरुन बोलणे करुन दिले आहे.याबत नामदार थोरात यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी आपली चर्चा झाली असून  श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्या प्रस्तावावर योग्य तो निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना मदत करण्याबत सूचना केल्या असल्याचे सांगितले आहे. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे,  माऊली प्रतिष्ठनचे ज्ञानेश्वर मुरकुटे उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget