बेलापूर ( प्रतिनिधी )- पोहण्यास गेलेला दहा वर्ष वयाच्या मुलाचा बेलापूर पढेगाव रोडवर असणार्या खटकाळी गावठाण येथील खाणीत असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असुन या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबत समजलेली हाकीकत अशि की खटकाळी गावठाण येथील आदित्य विकास जगताप वय वर्ष १० हा मित्रा समवेत दुपारी २ .३० वाजेच्या सुमारास पोहोण्यास गेला होता पोहत असताना दम तुटल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला ही घटना परिसरात समजताच सुनिल खरात दादु जागताप बाळू जगताप सुमीत ऋषीकेश जींतेंद्र यांनी पाण्यात शोध घेतला अखेर सायंकाळी सहा वाजता त्याचा मृतदेहा सापडला पोलीस नाईक ढोकणे पोपट भोईटे यांनी त्यास दवाखान्यात हलविले तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषीत केले त्याच्या पश्चात एक भाऊ तीन बहीणी आई आहेत या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Post a Comment