श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचा प्रस्तावावर त्वरित निर्णय घ्या; महसूलमंत्री थोरातांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना.

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची माहिती
श्रीरामपूर (वार्ताहर) श्रीरामपूरातील व्यवहार सुरळीत चालू करणेकामी मर्चंट असोसिएशनी प्रशासनाला दिलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांनी त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार लहू कानडे यांच्याकडे केली आहे. करण ससाणे यांनी नामदार थोरात यांच्याशी संपर्क साधून श्रीरामपुरातील व्यवहार सुरळीत चालू होणेकरिता मर्चंट असोसिएशनच्या प्रस्तावावर त्वरित निर्णय घेणेकरिता जिल्हाधिकारी यांच्याशी बोलण्याची विनंती केली. यावर नामदार थोरात यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्या प्रस्तावावर त्वरित निर्णय घेण्याचा सूचना केल्या आहेत.
             गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग अडचणीत सापडला आहे. संकटाच्या काळात श्रीरामपुरातील व्यापारी वर्ग सर्वसामान्य जनतेसोबत राहिला त्यामुळे आता सर्व नियमांचे पालन करुन मार्केट मधील दुकानं चालू करावे याकरिता खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार लहू कानडे यांच्या समवेत बैठका पार पडल्या त्यामध्ये माझ्यासह सर्वच पदाधिकारी उपस्थित होते आणि सर्वांचीच भावना होती की, श्रीरामपूरातील व्यवहार चालू व्हावेत. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार मर्चंट असोसिएशनी आपला प्रस्ताव प्रांताधिकारी अनिल पवार यांच्याकडे सादर केला. तो प्रस्ताव प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे.
             सदरच्या प्रस्तावावर त्वरित निर्णय घेण्यासाठी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांची भेट घेऊन नामदार  बाळासाहेब थोरातांशी फोनवरुन बोलणे करुन दिले आहे.याबत नामदार थोरात यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी आपली चर्चा झाली असून  श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्या प्रस्तावावर योग्य तो निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना मदत करण्याबत सूचना केल्या असल्याचे सांगितले आहे. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे,  माऊली प्रतिष्ठनचे ज्ञानेश्वर मुरकुटे उपस्थित होते.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget