Latest Post

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )    लॉक डाऊन सुरु होऊन  ५० दिवस होत आहे  सर्वजण घरात बसून आहेत सर्व व्यवसाय बंद असून अंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डीतही सर्व शांत शांत आहे शिर्डी व परिसरातील फुल शेती धोक्यात आली आहे अनेकांनी फुलबागा तोडल्या आहेत तर काही दररोज फुले सस्त्यावर बांधावर फेकून देत आहेत त्यामुळे शिर्डी व परिसरातील बागकारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे शिर्डीत साईबाबांना मोठ मोठे पुष्पहार पुष्पगुच्छ मोठया श्रद्देने साईभक्त अर्पण करीत असतात पण सध्या साईबाबा मंदिर बंद आहे फुलांचा दररोज भरणारा बाजारही बंद आहे शिर्डी येथून राज्य व परराज्यात दररोज फुल्ल बसने जातात तेही बंद झाले आहेत त्यामुळे  मोठ्या प्रमाणात शिर्डी व परिसरातील फुलबाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत  फुलबागात गुलाब गलांडा गुलछडी झेंडू आदी येथे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असते सध्या बंद असल्याने आर्थिक उलाढाल पूर्णतः बंद झाले आहे त्या मुळे फुलबागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी ) शासनाने अटी व शर्ती टाकून परवानगी दिल्याने लॉक डाऊनचा तिसराताप्पा सुरु झाल्यानंतर परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात मोठ्या  संख्येने कुटुंबासह आपला कामाधंदा सोडून जात आहेत प्रशासनाने त्यांना जाण्यासाठी विविध ठिकाणाहून सरकारी बसेस व श्रमिक रेल्वे सोडल्या असल्यातरी या बस व रेल्वे मध्ये शोषलं डिस्टन्स पाळला जात असल्याने प्रवासी नेहमीपेक्षा कमी प्रमाणात  जात आहेत त्यामुळे अनेक लोकांची  इच्छा असूनही आहे त्या ठिकाणी नाईलाजास्तव राहावे लागत आहे अनेकांनी ग्रामपंचायतचे व नगरपंचायतचे  आरोग्य दाखले काढले आहेत परंतु आपल्या राज्यात जाण्यासाठी वाहने उपलब्ध नाहीत आवश्यक वस्तूची ने  आन करण्यार्या वाहनांमध्ये कोणी घेत नाहीत त्यामुळे अशे परप्रांतीय लोक  पायीच जातांना दिसत आहेत.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )लॉकडाऊनमुळे सर्वजन घरात असतांना व कडक उन्हामुळे हैराण झालेले असतांना राहता तालुक्यातील काही भागात   काल सायंकाळी अचानक पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा जरी मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे व वादळामुळे परिसरात अनेक वृक्ष पडली फांद्या पडल्या काही ठिकाणी छ परावरील पत्रे उडाली काहींचे मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे मात्र सुदैवाने  कुठेही जीवित हानी झाली  नाही मात्र बराच वेळ वीज गायप झाली होती व  काही गावात अंधारात रात्रभर लोकांना  राहावे लागले काही दिवस असाच गडगडाटासह वादळी पाऊस काही ठिकाणी पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे आधीच लॉक डाऊनमुळे  मोठे आर्थिक नुकसान झालेले असतांना या वादळी पावसाने आजून त्यात भर पडू नये अशीच प्रार्थाना या परिसरातील शेतकरी व नागरिक करीत आहेत.

श्रीरामपूर(प्रतिनिधी)- लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर श्रीरामपूर शहरातील दुकाने सुरू करणे अथवा बंद ठेवण्याबाबत फक्त बैठकांचा सिलसिला सुरू आहे. मात्र कोणताही ठोस निर्णय घेण्यात प्रशासनाला यश मिळाले नाही. आधीच अनेक कारणांमुळे अडचणीत आलेले श्रीरामपूरकर बाजारपेठेच्या संदिग्धतेमुळे हवालदिल झाल्याने माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यापारी हितासाठी या विषयात लक्ष घालावे अशी मागणी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, भाजयुमो सरचिटणीस अक्षय वर्पे, मनसेचे सचिव स्वप्नील सोनार यांनी विखे पाटलांची भेट घेऊन केली.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून श्रीरामपूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये दुकाने बंद अथवा सुरू करण्याबाबत  अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. प्रशासकीय पातळीवर सध्या बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तरीही प्रशासकीय भवनात या विषयाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत दररोज बैठकांचा सिलसिला सुरू आहे. वेगवेगळे राजकीय पुढाऱ्यांच्या बैठकांना उपस्थित राहून एकही ठोस निर्णय न झाल्याने व्यापारी वर्गही हवालदिल झाला आहे. एकीकडे सर्वसामन्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. तर दुसरीकडे बाजारपेठेबाबत ठोस निर्णय लांबणीवर पडला आहे. हवालदिल झालेली व्यापाऱ्यांना मदतीसाठी कोणाकडे याचना करावी असा प्रश्न पडलेला असताना त्यांना विखे पाटलांनी आधार देऊन प्रशासनास योग्य त्या सूचना द्याव्या अशी मागणी केतन खोरे यांनी केली.
तर स्वप्नील सोनार व अक्षय वर्पे यांनी सांगितले की, गेल्या आठवड्याभरात वेगवेगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत पाच बैठका श्रीरामपूरात झाल्या मात्र एकही बैठकीत व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला नाही. फक्त राजकीय कलगीतुरा बघायला मिळल्याने सक्षम लोकप्रतिनिधी नसलेल्या श्रीरामपूरची वाटचाल अंधारकडे चालली आहे. व्यापाऱ्यांच्या हितासाठी राजकारण वेगळे ठेऊन भूमिका घेणे गरजेचे आहे अन्यथा बाजारपेठ बकाल होईल अशी भीती अक्षय वर्पे व स्वप्नील सोनार यांनी व्यक्त केली.

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात असलेल्या कंटेनमेंट झोन वगळून महापालिका, नगरपालिका हद्दीतील एकल, वसाहती लगत असणारी, निवासी संकुलातील सर्व दुकाने सुरू राहतील. तसेच नागरी क्षेत्रातील बाजारपेठ आणि व्यापारी संकुल बंद ठेवण्यात येणार असली तरी या ठिकाणच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीची दुकाने सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.दरम्यान जिल्ह्यात नागरी क्षेत्राच्या हद्दीतील सर्व कापड बाजार, आठवडे बाजार, मॉल्स, व्यापारी संकुल, क्रीडा संकुलमध्ये सर्व दुकाने बंद राहणार ठेवण्यात येणार आहेत. तर ज्या ठिकाणी दुकाने सुरू राहणार आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक दुकानदाराने सॅनिटायझरचा वापर करावा. सामाजिक अंतराचे नियम पाळावे. दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांना मास्क आवश्यक असून खरेदी-विक्री करताना त्याचा वापर अनिवार्य. दुकानांमध्ये अनावश्यक गर्दी टाळावी. थुंकणार्‍यांवर स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी. दुकानांमध्ये गर्दी आढळल्यास ते सील करून संबंधित दुकानदारांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

पाथर्डी_कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन कर्मचारी तसेच  मामा एंटरप्राईजेसचे कर्मचारी रात्र दिवस काम करीत आहे.
   पाथर्डी तालुक्यातील मोहज देवढे येथे काही दिवसांपूर्वी कोरोनो पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने तालुक्यासह शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.एकीकडे कोरोनाची भीती व दुसरीकडे जीवनाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पालिका प्रशासन व  ठेकेदार कर्मचारी कुठलिही पर्वा न करता तालुक्याला कोरोना मुक्त करण्यासाठी झटत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह उपनगरात हायप्रोक्लोराईड ची फवारणी सुरू आहे.आज शहरामध्ये ब्लॉर मशिनच्या साह्याने फावरणीचे काम जोमाने सुरू आहे.
यावेळी आरोग्यविभाचे चेरमान प्रवीण राजगुरु म्हणाले की , पालिका प्रशासन हे कोरोना पार्शवभूमीवर चांगले काम करत आहे,तरी जनतेला माझे आव्हान आहे की गरज असेल तरच घरा बाहेर पडा, घरात राहा सुरक्षित राहा व पालिका प्रशासनासला सहकार्य करा.
    फवारणीची सुरवात ही खोलेश्वर मंदिर,ब्राम्हण गल्ली, ते नवी पेठ, अजंठा चौक, तिनहात चौक, पोळा मारुती पर्याय फवारणी करण्यात आली.
    यावेळी आरोग्यविभागाचे  चेरमान  प्रवीण राजगुरु,नगरसेवक रमेश गोरे,नगरसेवक महेश बोरुडे,पालिका प्रशासकीय अधिकारी आयुब सय्यद,शिवा पवार,मामा एंटरप्राइजेस चे मुकादम अक्षय साठे व सोन्याबापू जाधव,अमोल वाघमारे,आदी यावेळी उपस्थित होते.

नाशिक : शहरातील पंचवटी विभागातील कोणार्कनगर भागात राहणाऱ्या एका करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात कोरोना कक्षात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.9) पहाटे घडली. त्यांचा कोरोना चाचणी नमुना अहवाल पॉसिटीव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत नाशिक शहरात करोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील मृतांचा आकडा आता २०वर पोहोचला आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणार्कनगर येथील एका ५१ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यास मालेगाव येथे ड्युटी केल्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. २ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांना सौम्य लक्षणे आढळून आल्यामुळे करोना संशयित म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयातील कक्षात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ.चेवले यांनी ताबडतोब उपचार सुरु केले. ते उपचाराला प्रतिसाददेखील देत होते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांना व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले. अखेर उपचारास त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हे ग्रामीण पोलीस दलाचे कर्मचारी होत. यानंतर दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी जाहीर केले. आले. ---९० पेक्षा अधिक पोलीस कोरोनाग्रस्तनाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त पोलिसांची कुमक याठिकाणी कर्तव्य बजावत आहे. जवळपास आतापर्यंत मालेगाव शहरात कर्तव्य बजावणाऱ्या ९० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget